पुण्यश्लोकी जे मुनी वाल्मीकी
गदिमा होऊन आले लोकी
लाख मनांना वेड लाविती
बाबुजी रामायण गाती
नित्य उपासक ते प्रतिभेचे
भाविक पूजक स्वर-शब्दांचे
चरित सांगती जगतपित्यचे
तारे हे सूर्या ओवाळिती
बाबुजी रामायण गाती
हे भक्तीचे कोरीव लेणे
कोजागिरीचे धवल चांदणे
ह्रद्यकुपीतून आले गाणे
संगती लाखो जन रंगती
बाबुजी रामायण गाती
फुलापरि ते शब्द उमलती
सुगंध पसरे विश्वाभोवती
इतुके याचे वेड लाविती
नास्तिका भक्ती रस पाजती
बाबुजी रामायण गाती
पूर्णपणाची कृतार्थ चौकट
कसे जगावे पुरुषोत्तमपट
विस्मयकारक अतिव उत्कट
ऐकुनी श्रोतुजन नादती
बाबुजी रामायण गाती
मुग्ध जाहले लाखो जनमन
तृप्त मानसे भरले लोचन
मूर्त पाहिले प्रभूचे जीवन
सवे गाली ओघळ्ती
बाबुजी रामायण गाती
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3303
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता
छान
मस्तच