चित्रपट परीक्षण-"अवतार"
लेखनप्रकार
चित्रपट परीक्षण- अवतार
जगभरातून अवतार या हॉलिवूड चित्रपटाचे प्रेक्षकांकडून स्वागत होते आहे. समीक्षक सुद्धा या चित्रपटाला पसंत करत आहेत. उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड त्याने तोडले आहेत. अर्थात भारतात सुद्धा.
मग या चित्रपटाबद्दल कुतूहल वाटणे साहाजिकच आहे, की असे काय आहे या चित्रपटात?
मीही हा चित्रपट बघितला (२डी) आणि त्या बद्दल सांगावेसे वाटले.
या चित्रपटाची कथा आहे २१५४ सालातली- म्हणजे काळाच्या पुढची.
हा चित्रपट थ्रीडी सुद्धा आहे, (पण फक्त इंग्लीसमध्ये) आणि फक्त आणि फक्त पडद्यावरच अनुभवण्यासाठी आहे.
हॉलिवूडचा चित्रपट असूनही चित्रपटाचे नाव संस्कृत मधला शब्द अवतार वरून ठेवले आहे.
पूर्ण चित्रपटभर स्पेशल इफेक्ट आहेत.
या चित्रपटाची कथा सुद्धा एक पूरणपणे नवीन प्रयोग आहे. आतापर्यंत एलीयन हे आपल्यापेक्षा तंत्रज्ञानात सरस दाखवले गेले होते आणि ते आपल्यावर आक्रमण करत. पण यात आपण एलीयन वर आक्रमण करतो आणि त्यांची जमीन बळकावून त्यात असलेला एक मौल्यवान धातू आपल्याला हवा असतो, आणि एलियन अजून माकड रुपातच आहेत. तेथे अजून डायनॉसॉर (सदृश) आहेत. भरपूर निसर्ग आहे.
यात पॅण्डोरा नावाच्या ग्रहावरची एक अशी अद्भुत दुनिया आहे, की ज्याची आजवर आपण कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल.
यात प्रथमच सी जी आय इमेजेस (कॉंप्युटर निर्मित प्रतिमा) आणि प्रत्यक्ष कलाकार यांचे मिश्रण हे शूटींगच्या वेळेसच केले आहे.
यात हॉरर प्रेमींसाठी जंगलातले काही भीतीदायक प्रसंग आहेत, तसेच डायनोसॉर सारखे अजश्र प्राणी, वेगळे घोडे, विचित्र प्राणी आणि देवाचे चमकणारे फायबर ओप्टीक सारखे तरंगणारे किडे आहेत, रात्री चमकणारे झाडं आहेत, अतिशय महाकाय अजश्र प्रचंड झाडं आहेत. तरंगणारे पर्वत आहेत. अति विशाल पक्षी आहेत. (एकदा पडद्यावर बघाच)
विज्ञान प्रेमी प्रेक्षकांसाठी अजश्र महाकाय रोबोट आहेत, ज्यात मनुष्य बसून त्याला कंट्रोल करतो. (एकदा तरी पदद्यावर बघाच), तसेच २१५४ साली कॉंप्युटर, हेलीकोप्टर कसे असतील हे बघायला मिळते.
अंधश्रद्धा प्रेमीं प्रेक्षकांसाठी साठी यात असे झाड आहे की ज्यात पारंब्यांना वेणी जोडली की पूर्वजांचे आवाज ऐकायला येतात. तसेच "एवा" देवता आहे, जी त्या उडणाऱ्या तंतूमय किटकांद्वारे (पवित्र आत्मे) संदेश देते.
युद्ध आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी यात असे जबरदस्त चित्तथरारक युद्ध आहे की जे श्वास रोखून तुम्ही बघाल.
सुपरहीरो चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी यात शेपटीवाला, वेणीवाला सुपरहिरो सुद्धा आहे.
चित्रपट पाहातांना नकळत जापानी अनिमेटेड रामायणातला राम आणि त्याचे सैन्य याच्याशी अवतार ची तुलना होत होती. थोडे रामायणातले उडणारे पक्षी वगैरे वरून कल्पना उचलली आहे असे मला वाटते.
हा चित्रपट आपल्याला जाता जाता एक संदेशही देवून जातो, की पर्यावरण, निसर्ग यांना नष्ट होवू देवू नका.
टीप-पॅण्डोरावर ओक्सिजन नसतो. पॅण्डोरा वरचा लोकांना नावी म्हणतात
मी या चित्रपटाला पाच स्टार देतो. अप्रतिम चित्रपट. जरूर बघा. कुटूंबासोबत.
थोडक्यात कथा अशी-
२१५४ साली अमेरीकन सैन्य एक यान घेवून पॅण्डोरा ग्रहावर जातं. जॅक सली याचा भाऊ या अवतार प्रोजेक्ट साठी काम करत असतो, पण एका अपघातात मरण पावतो. त्याची जबाबदारी जॅकवर येते. अवतार प्रोजेक्ट काय असतो? तर नावींचे आणि मानवी डीएनए एकत्र करून मानवाचा नावी "अवतार" विकसित करून, त्यांना नावी लोकांमध्ये पाठवून त्यांचे रितीरिवाज, भाषा शिकून त्यांना त्या झाडापासून वस्ती हटवण्यास भाग पाडायचे असते व तो मौल्यवान धातूंच्या खड्यांचा खजिना घेवून पृथ्वीवर यायचे असते. पहीला अवतार "जॅकचा" असतो व त्यासोबत इतर अवतार पाठवले जातात. पहिल्याच दिवशी जॅक एकटाच पॅण्डोरावरच्या जंगलात अडकतो. त्याची भेट नायीत्री शी होते. ती त्याला वाचवते. (त्याचे कारण येथे समजावून सांगण्यापेक्षा पडद्यावर बघणे योग्य राहील) त्यांचं एकमेकांवर प्रेम जडतं. तिकडे जॅक पेटीत झोपला की इकडे अवतार जागा होतो आणि अगदी या उलट सुद्धा होते. पण हा प्रोजेक्ट ज्या ग्रेसी नावाच्या वैज्ञानीकाच्या अधीन असतो तीचा नावींना मारण्याला विरोध असतो. पण सैन्याचे कंट्रोल दुसऱ्याच्याच हाती असते. तो आतातायीपणा करून नावींवर हल्ला करतो आणि... पुढचे पदद्यावरच अनुभवा.
एक कोडे- या चित्रपटात कोठेही २१५४ असा कुणाच्या तोंडून उल्लेख ऐकण्यात आला नाही. पण, हा २१५४ सालचा चित्रपट आहे हे नक्की. चित्रपटात ते कुठे दिसते?
शोधा म्हणजे सापडेल.
उत्तरासाठी मदत- "व्हीडीओ लॉग."
वाचने
5585
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
बरंच ऐकलं आहे या चित्रपटाबद्दल.
बघेनच आता.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
ठीक वाटला.....:)
(विचीत्र अवतारी)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
मेमरी स्टोअर करणारं फायबर ऑप्टिक्स चं झाड आणि नावी लोक्स आणि प्राण्यांमधली युएसबी कनेक्टिव्हीटी सर्वांत जास्त आवडली :)
बाकी कथानकात मॅट्रिक्सच्या तोडीचा नसला तरी स्पेषल इफेक्ट्स मधे सात मजले वरचा चित्रपट आहे .
झकास .. मजा येते ३डी मुव्ही पहायला
- दशावतार
अंधश्रद्धा प्रेमीं प्रेक्षकांसाठी साठी यात असे झाड आहे की ज्यात पारंब्यांना वेणी जोडली की पूर्वजांचे आवाज ऐकायला येतात. तसेच "एवा" देवता आहे, जी त्या उडणाऱ्या तंतूमय किटकांद्वारे (पवित्र आत्मे) संदेश देते.
==========================
नरेंद्र दाभोळकर व त्याम्च्या साथिदारांनि पहावे ..निदर्शने करावित...व अमेरिकेत अंध श्रध्धा निरमुलन कायद्यासाठी ओबामा ला साकडे घालावे...
In reply to अंधश्रद्ध by अविनाशकुलकर्णी
वा वा! १,२,३ जानेवारीला पुण्यात अंनिस ची द्विदशकपुर्ती समारोह आहे. पुडी सोडुन देतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मुळात चित्रपटाची कथा फार काही जगावेगळी किंवा नाविन्यपूर्ण नाही. चित्रपटाचं मूळ बलस्थान त्यात वापरलेलं तंत्रज्ञान आणि त्यायोगे दाखवलेली अचाट आणि भव्यदिव्य दृष्ये एवढंच आहे. पण तेच पाहाण्यासारखं आहे. बाकी पॉलिटिकल कॉमेंटरी आणि इतर संदेश या सिनेमातही आहेतच. हा सिनेमा 'सिनेमा बनवण्याच्या तंत्रज्ञानाचं भविष्य' मानला जातोय.त्यामुळे सिनेमा जरूर बघा.
विशेष सूचना: हा सिनेमा केवळ ३डीच बघावा. उपलब्ध असल्यास आयमॅक्स ३डी बघावा. २डी मधे एवढी गंमत नाही.
In reply to मुळात by घाटावरचे भट
>>उपलब्ध असल्यास आयमॅक्स ३डी बघावा.
हेच म्हणतो... आयमॅक्स ३डी मधे पिक्चरचे ईफ्केट जबरदस्त वाटतात..
तसा सिनेमा पण खुप आवडला, जरुर बघावा असा..
(त्या YZ रणधीर च्या पिक्चरपेक्षा हजार पटीने चांगला).
--टुकुल
In reply to >>उपलब्ध by टुकुल
(त्या YZ रणधीर च्या पिक्चरपेक्षा हजार पटीने चांगला)आबे टुकूल भावा ... कुठच्या कुठे तुलना आहे ही ;) हे म्हणजे .. मर्सिडीज लै भारी ... त्या हातगाडीच्या मानाने तर हजार पटींनी भारी ;) असो ! - ( सांवलियाच्या प्रिमियर शो पाहून ३ तास कॉमात गेलेला) परमविर कपूर
चित्रपट उत्तम आहे. ३डी अनुभव झकास.
कोड्याचं उत्तर असं की तेथे बॉल्गॉगींचं आधुनिक स्वरूप दिसते. ते म्हणजे व्हिडीओ ब्लॉगींग.
हिरो जेव्हा त्या लोकांचे रिती रिवाज शिकतो आणि परत येऊन त्यांची नोंद ठेवतो तो प्रकार म्हणजे व्हिडीओ ब्लॉग आणि ते करतांना पडद्यावर वेळेच्या खाली दिनांक दिलेलं असतं :)
-- (निरिक्षक) नीलकांत
कथानक आणि इफेक्ट्स, दोन्ही अगदी खास...
जेम्स कॅमेरॉन अचाट माणूस आहे!
चित्रपटाला माझ्याही पाच चांदण्या.
हा सिनेमा जर भारतीय लोकांनी जर सलमान व करिश्माला घेवून काढला तर ते मोठ्या पक्षाच्या पाठीवर बसून सैर करतात ..तिथे नक्की गाणे घातले असते..व पाठीवर डांस पण दाखवला असता ......हॉलीवूड च्या तंत्रद्यानाला सलाम .
In reply to हा सिनेमा by अविनाशकुलकर्णी
"पाठीवर डांस"??? पण तो चावला असता तर?
३ डी अनुभव फारचछान आहे, महत्वाचे म्हणजे पुर्ण चित्रपट तीन आयामी आहे, आयमॅक्स वडाळा (बिग सिनेमा) नामी जागा, आमच्या अंगणात आहे म्हणून फस्ट डे फस्ट शो बधीतला होता.
आपला
आर्य
या चित्रपटाचा उगीच एवढा बोलबाला झाला आहे... एवढाही काही खास नाहीये.. फक्त तंत्रज्ञान चांगले वापरले आहे म्हणून काही चित्रपट चांगला नाही होत...
जुने चित्रपट एकत्र करुन हा नविन अवतार बनवला आहे... आणि कल्पनाशक्ति म्हणाल तर तीही काही खास आहे असे म्हणता येत नाही... हॅरी पॉटर, लॉर्ड ऑफ द रिन्ग्स, मॅट्रिक्स आणि अनेक अॅनिमेशन चित्रपट १००० पटीने सरस आहेत...
आकाशात तरंगणारे पर्वत आणि पँडोरा ग्रहाचे चित्रण स्वप्नवत असले तरी त्यात "ऑसम" काय आहे? पिक्सारवाले यापेक्षा उत्तमोत्तम कल्पना लढवतात...
युध्द दृष्ये तर हास्यास्पद आहेत.. आणि तो जेक सली (मेन हिरो), त्याचे कोणी ऐकत नसते; शेवटी तो लाल पक्ष्याची भीती दाखवुन सगळ्यांना एकत्र करतो.. ( :D :D ) आणि तरी सुध्दा बरिच तोडफोड होते....
आणि युएसबी कनेक्टिवीटीबद्दल बोलायचे तर, ती सगळीकडे वापरली आहे, फक्त स्त्री पुरुषांतील निकट संबंधात वापरली नाही.. हे जरा अजब वाटले..
पहायचाच असेल तर ३D मध्ये पहा, त्यातल्यात्यात बरा वाटेल....
मी ३/५ असे अंक देईल... चित्रपट वाईट नाहिये, पण जरा जास्तच गुणगान होत आहे, तेवढ्या लायकीचा नाही वाटला मला.. उगीच नको तिथे पैसे खर्च केले आहेत "ब्लू" सारखे, त्यामानाने स्वस्तातले मराठी/हिंदी सिनेमे कधीही भारी..
जाता जाता, इथेही डोकवा: http://avatarsucks.com
उलट सुलट प्रतिक्रिया वाचून पाहावा की नाही दुविधेत आहे.
बघाच. निराशा होणार नाही...
सिनेमा चांगला आहे, मी ५ नाही, ४ तारेच देईन.
३डी अनुभव मस्तच. पण तरीही आणखी चांगला अनुभव देता आला असता असे वाटते.
आणि, माझ्या अनुभवाप्रमाणे, आयमॅक्स ३डी मध्ये जास्त पैसे देऊन पाहण्यापेक्षा साध्या थियेटर मधील ३डी मध्येच पहावा. त्या लोकांनी आता आयमॅक्स डोमला बदलून सपाट पडदा लावला आहे. :(
चित्रपट चांगला आहे-तंत्रज्ञानाच्या बाबतीत.३D मध्ये बघावा. कल्पनाशक्ती अचाट ताणली आहे असे वाटते.
भेंडी
P = NP
बरंच ऐकलं