कशाला ?
मित्र शत्रु सर्व जमले, अन्त्य यात्रेला कशाला ?
विसरले सारे मला ते, व्यर्थ मग रडले कशाला ?
प्राक्तनाची सर्व नाट्ये , रंगुनी मी खेळलो ,
खेळ तो खोटाच होता, जिंकुनी मिरवू कशाला ?
वेदनेची सर्व गाणी, मीही होती गायिली,
भैरवीचे आज गाणे, मी उगा गाऊ कशाला ?
-- सागर लहरी १९-१२-२००९
लेखनविषय:
याद्या
983
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
चुचु
कविता