Skip to main content

मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 26/12/2009 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही.... दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही, कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही.. रोज रोज गा-हाणे मित्र ऐकून ऐकणार काय ? भर दुपार मैफल माझी साकी कोणी सजवत नाही .. ढगाळ दुपार ओसरून सांज त्यावर कलताना .. रिता पेला रिते मन घेउन गाणे म्हणताना ... मीच मला संगतीला ताल कोणी धरत नाही .... उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही.... -- सागर लहरी ३/८/२०0९
लेखनविषय:

वाचने 1565
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही.... दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही, कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही.. मस्त, अजुन येऊ दे...! -दिलीप बिरुटे

दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही, कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही.. छान आहे binarybandya™