Skip to main content

वादळ

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!

मराठ्यांचा आदर्श.. छत्रपती शिवाजी महाराज...

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
शिवचरित्रावर आधारित रचलेली कविता.. नाही आम्हा भिती कोणा मुघल और निजामाची.. फक्त आहे भूक तळपती मर्द मराठी प्रेमाची.. आले बहु गेले बहु उध्वस्त करण्या धरती.. सर्वांवरती भारी पडला एकला तो छत्रपती.. रक्त मराठी श्वास मराठी मराठी तो बाणा.. शिवनेरीवर बाळ जन्मला स्वराज्याचा राणा.. जिजाऊंचे मार्गदर्शन अन् कोंडदेवांचे शिक्षण.. उभा राहीला बाल मराठा करण्या शत्रूंचे भक्षण.. मित्रांसवे त्या शंभूमंदिरी घेतली शपथ स्वराज्याची.. हिंदूत्वाच्या वीर लढ्याची अन् प्रेमळ सुंदर सुराज्याची.. जिंकूनी प्रथम तोरणागड जगद्जाहीर केली वीरता.. सतराव्या वर्षीच पराक्रम दाविला वार्याने पसरली वार्ता.. आदिलशहाने होऊनी अस्वस्थ ने

वारसा महाराष्ट्राचा

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र.. आपली माय मराठी धर्ती.. आणि या धर्तीवर शिवकाळापासून अस्खलित बोल्ली जाणारी आपली मराठी मायबोली.. याच बोलीने वर्षानुवर्षे जतन केलेला महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि आधुनिक वारसा मी या कवितेतून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेच नाव आहे वारसा महाराष्ट्राचा... वारसा महाराष्ट्राचा हिंदोस्ताँ वंदितो तयाला अशी ही अपुली किर्ती.. निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती..

वेळ ही निराळी (भाग दोन)

लेखक कऊ यांनी शुक्रवार, 21/10/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ ही निराळी भाग दोन ती एक रात्र. त्या एका रात्रीत सर्व काही चेंज झालं.. सर्व काही.. ती वेळ अशी होती की तेव्हा नाती बदलली.. ती वेळ निराळी होती.. पुजा गोरे.. ती मुलगी जी कधीतरी केवल वर जीव ओवाळून टाकायची,तीच पुजा अजय सोबत होती आज.दुपारचं जेवण सुमोने बाहेरून मागवून घेतल.जेवून झाल्यावर पुन्हा आमच्या गप्पा सुरु झाल्या.

जगलो आहे

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 21/10/2016 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
जगलो आहे मनसोक्त डुंबावेसे वाटले पण काठावरतीच जगलो आहे आख्खी भाकर तर सोडाच चतकोर वाट्यातच जगलो आहे नुसतेच पाहणे, वास कसला घेतो गुलाबाच्या काट्यातच जगलो आहे गुरू त्यांचे प्रबळ होते राहू केतूच्या कचाट्यात जगलो आहे सुख एवढेच निखारे नव्हते गरम फुफाट्यात जगलो आहे राजेंद्र देवी

कामाची टाळाटाळ, उत्पादकता, व्यवस्थापन आणि कानबान

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 21/10/2016 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, डिस्क्लेमरः या लेखात बरेच मुद्दे आहेत ज्यावर एक एक कादंबरी होईल, पण थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा. प्रतिसादांमधे चर्चा/प्रश्न उत्तरे यातून आणखी उपयुक्त होईल अशी आशा. धन्यवाद. जशी आपण उत्तरोत्तर प्रगती करतो तसा कामांचा व्यापही वाढत जातो. वेळ आणि शरीरक्रियांवर आपला फारसा ताबा नसतो. मग या सर्वातून काही लोक कसे यशस्वी होतात किंवा ही तारेवरची कसरत फार त्रास न होता कशी संभाळतात?

अरबस्थाना तील दोन बोधकथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/10/2016 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
... .................... कथा क्रमांक एक एका गावात एक माणुस रहात असतो..तो "मै जिंदगी भर रोता ही रहा हूं" टाईप असतो.. तो परमेश्वरावर नाराज असतो..अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही असे म्हणत तो कुढत जीवन जगत असतो... तो विचार करत रस्त्याने जात असता त्याला एक फकीर दिसतो.. तो त्या फकिराला थांबवतो.अन अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही.. असे रडगाणे सुरू करत परमेश्वरावर नाराजी व्यक्त करतो.. फकीर हसतो व म्हणतो..अरे एव्हढेच ना?