Skip to main content

...असे आजोबा!

लेखक हृषीकेश पतकी यांनी शनिवार, 24/06/2017 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल उघडले कपाट तेव्हा पुन्हा भेटले मला आजोबा | असण्याहूनही नसण्यामध्ये नवे वाटले मला आजोबा ||१|| शुभ्र साजि-या वस्त्रांमधूनी होते लपले असे आजोबा | इंचघडीतून अलगद ज्यांनी आम्हा जपले असे आजोबा ||२|| पुस्तकातल्या श्लोकांमधला सुस्पष्ट असा तो ध्वनी आजोबा | पत्ररुपाने अक्षर होऊन अन् भिडणारे मनी आजोबा ||३|| कधी हास्याची झुळूक आणि कधी गोष्टींची लाट आजोबा | आकार आम्हाला देताना शिस्तीचा परिपाठ आजोबा ||४|| कधी दुपारी बहरुन यावा तो संवादिनीचा सूर आजोबा | पण सायंकाळी सात वाजता चिंतेचे काहूर आजोबा ||५|| कपाट केले बंद तरीही आठवणींचे ठसे आजोबा | विचार करता काव्य स्फुरावे होते आमचे असे आजोबा ||६|| जपून
काव्यरस

अनवट किल्ले १२ : स्वराज्याची कोयरी, रांगणा उर्फ प्रसिध्दगड ( Rangana, Prasidhhgad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 23/06/2017 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुर जिल्ह्यातून अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरतात, पैकी एतिहासिक हणमंत्या घाटावर नजर ठेवून आहे, एक प्रचंड पसरलेला कुंकवाच्या कोयरीच्या आकाराचा एक किल्ला, "रांगणा". जणु स्वराज्याच्या कुंकवाचा हा रक्षकच. तळ कोकण, अर्थात सध्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन रक्षक आहेत. सिंधुसागराची सीमा सांभाळायचे काम शिवाजी महाराजांची निर्मिती असलेला सिंधुदुर्ग ईमाने ईतबारे करतो आहे तर सह्याद्रीच्या मुख्य रांगेत खडा होउन रांगणा कणकवलीपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत नजर ठेवून आहे. ई.स.

कार्टूननामा-०१(1/2)

लेखक औरंगजेब यांनी शुक्रवार, 23/06/2017 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत वाह्यात , भयंकर वांड अशा शिनोसुके बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याचं वय आहे ५ वर्षे. हा जपानच्या कासुकाबे शहरात राहतो.  ह्याच्या आईच नांव मित्सी(मिसाई) आणी वडलांचे नांव हॕरी(हिरोशी). ह्याला एक धाकटी बहीण पण आहे , तिचं नाव हिमा(हिमावारी). तुम्ही आत्तापर्यंत ओळखलंच असेल की मी आपल्या लाडक्या शिनचॕनबद्दल लिहिलं आहे. ब-याच जणांच्या लहानपणच्या आठवणींचा बराचसा भाग ह्याने व्यापलेला आहे. ह्याच्या व्रात्यपणा मधे हसवण्याची कला दडलेली आहे.

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ८)

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 23/06/2017 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
निर्गमन केल्यानंतर नव्या भूप्रदेशात जर व्यक्तीच्या इच्छा आकांक्षांना हवे तसे वातावरण मिळाले तर व्यक्ती तिथेच स्थायिक होणे स्वाभाविक असते. मातृभू / पितृभू यांची ओढ असली तरी बसलेले बस्तान मोडून अश्या व्यक्तींनी केवळ मातृभूमीप्रती प्रेमापोटी किंवा कर्तव्यापोटी परत यावे अशी अपेक्षा धरणे म्हणजे त्यांचे माणूसपण नाकारण्यासारखे आहे.

वारी हो वारी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 23/06/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
होता आषाढी कृष्णमेघांची दाटी मन केवळ विठूसाठी आक्रंदे । चालती पाऊले दिशा पंढरीची वारकरी आम्ही नाहू आनंदे । घोष एक गजर एक एक नाम जीव पिसावला या मधुर नादे । ना जुमानू आता ऊन पावसासी मार्ग क्रमु पांडुरंगाच्या आशिर्वादे । पडता दिठीस चरण ते सावळे जैसे भ्रमर प्राशी तो मकरंदे । वारीस न जाताही मनाने वारीमय हळवा अवघा महाराष्ट्र विठ्ठल छंदे ।

गूढ (भाग 4)

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 22/06/2017 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024 गूढ भाग २: http://www.misalpav.com/node/40034 गूढ भाग ३: http://www.misalpav.com/node/40049 भाग ४ सूर्य मावळतीला लागला होता. थंडीचे दिवस असल्याने खूपच लवकर अंधारून आले होते. चंद्रभान गाडीने गावात शिरला तोवर चांगलाच उशीर झाला होता. पारावर आता कोणीच दिसत नव्हते. मात्र दूर देवळात आरती चालू असल्याचा आवाज येत होता. त्या आवाजाच्या दिशेने चंद्रभानने गाडी वळवली.

मेन्युकार्ड - लघुकथा

लेखक प्रतिक कुलकर्णी यांनी गुरुवार, 22/06/2017 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन शहर, नवीन भाषा. सगळं नवीन होतं माझ्यासाठी. चारही बाजूला हजार मैलांपर्यंत कोणीही ओळखीचं नाही. मी रेल्वेमधून उतरलो. गर्दीच गर्दी होती. भरपूर लोक होते. कानावर पडणारी भाषा अगदीच वेगळी. सगळीकडे लिहिलेलं त्या वेगळ्या भाषेतच होतं.

मनालीतली मौज ...

लेखक भटकीभिंगरी यांनी गुरुवार, 22/06/2017 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
मार्चनंतर उकाड्याचा तडाखा वाढु लागला.. आणी हिमालयाची शिखरे साद घालु लागली ..खरतर हिमालयातुन परततानाच परत कधी कुठे यायच त्याच प्लॅनिंग सुरु होत . पण लवकरच परतण्याच आश्वासन मनाला आणी हिमालयाला देउनच मी जड अंत:करणाने हिमालयाचा निरोप घेते.. यावेळेस काही फार मोठा प्लॅन नव्हता .गावात रहायचे, येथिल जीवनपध्द्ती जाणुन घ्यायची, निसर्गसहवासचे सुख उपभोगायचे, छोटामोठा ट्रेक करायचा . असे ठरउन निघाले ..कुलु-मनाली दरम्यान हायवेलगत अनेक छोटी छोटी गावे वसली आहेत. यातील बरिच युथ हॉस्टेल ट्रेक दरम्यान ओळखीची झाली आहेत.

अंबा घाट- माहिती हवी आहे.

लेखक सतिश पाटील यांनी गुरुवार, 22/06/2017 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
पावसात २- ४ दिवस निवांत भटकायला अंतरजालावर कोल्हापुर - रत्नागिरी मार्गावरील अंबा घाटाविषयी वाचले. हुल्लाड्बाज दारुड़े अणि गोंधळी पर्यटक यांच्या नजरेत हा भाग अजुन आला नाही असे वाटते. मागच्या वर्षी अंबोली घाटात गेलो होतो, पण स्वतःची गाडी न न्हेता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचे ठरवले त्यामुळ राती १० वाजता मुंबईतुन रेलवे पकडली आणि कणकवलीला उतरून यष्टि पकडून संध्याकाळी ४ वाजता अंबोलीला पोहोचलो. पण नुसताच २४ तास पाउस अणि धुके त्यामुळ अंबोली फिरता आली नाही. तिथल्या स्थानिक होटलवाल्याने गणपतीनंतर येण्याचा सल्ला दिला. तेव्हा तिथल्या माळरानावर खुप सुंदर फुले उगवलेली असतात कास पठारागत.

शेजाऱ्याचा डामाडुमा - सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक तथ्ये - नेपाळ भाग १०

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 21/06/2017 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग येथे वाचता येतील : शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमधे मर्यादित लोकशाहीचा पहिला प्रयोग - नेपाळ भाग ९ शेजाऱ्याचा डामाडुमा - सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक तथ्ये - नेपाळ भाग १० आशियात इतरत्र अनेक जागी आहे तसा नेपाळच्या लोकशाहीलाही अगदी स्थापनेपासूनच अस्थिरतेचा शाप आहे. १९५१ च्या पहिल्या लोकशाही सरकारपासून ते आज २०१७ पर्यंत काठमांडूमधील सिंघदरबारच्या भिंतींनी तब्बल ४६ वेळा पंतप्रधानपदाचे शपथ ग्रहण बघितले आहे. म्हणजे एका पंतप्रधानांचा कार्यकाळ साधारण १७ महिने!