Skip to main content

मराठी माणसे स्वताची प्रगती स्वःताच करू शकतात

लेखक स्वामि १ यांनी शुक्रवार, 10/05/2019 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपण ही आपली प्रगती करुन घ्याच. मराठी माणूस धंद्यात का माघे? परप्रातीयाचे गणित समजून घ्या. धंद्यामधे सिंडीकेटस असतात, रॅकेट्स असतात तसेच जातीय ग्रुप्ससुद्धा असतात फक्त त्याला चेंबर ऑफ कॉमर्स असे नाव नसते. ते पृष्ठभागावर देखील नसते. ही सिस्टीम इतकी स्मूथ बसली आहे कि आपल्याला रोज पाहून सुद्धा त्यातला जातीय कोन लक्षात येत नाही. ते वाईटच आहे असे म्हणता येईल का याबद्दल वेगवेगळी मतं येतील. असा व्यवसाय केला जातो हे कोणताही अभ्यासक्रमात किव्वा कार्यक्रमात शिकवले जात नाही . हे कुठे पुस्तकातही वाचायला मिळणार नाही . यांचे काम कसे चालते ? ते त्यांच्याकडूनच शिका . माझे अनेक पटेल मित्र आहेत.

माझे मन पाही

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 10/05/2019 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मन पाही विठ्ठल मुर्ती सावळां विठ्ठल उभा पंढरीसी ||१|| नाही मज वेळ जाण्या राऊळा नच पूजा केली कधी काळां ||२|| रमलो संसारी विना विचार भाव भक्तीचा केवळ उपचार ||३|| नमस्कार केला दोन्ही कर जोडूनी पाषाण भेटला उराउरी दुरूनी ||४|| ०९/०५/२०१९

मी मोठ्ठा की लहान?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 10/05/2019 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला कुणी मोठ्ठं समजतच नाही मी लहानाचा मोठ्ठा जसा झालोच नाही ||धृ|| अभ्यास कर अभ्यास कर सतत सांगता निट लक्ष दे बोलतात उठता बसता अभ्यास तर तो होतच असतो त्याशिवाय का मी पास होतो? तरी बोलतात तुला काही समजतच नाही ||१|| अभ्यासाच्या ताणातुन सुटकेसाठी खेळ खेळणे चांगले आरोग्यासाठी बोलणे हे खोटे आहे तुमचे सारे कारण खेळ कोणते खेळावे ते तुम्हीच ठरवावे अशाने ताण कधी कमी होतच नाही ||२|| शाळा म्हणजे काय शाळा आहे!? पुस्तके कित्ती तरी! सोबत वर्कबुक्स आहे ओझे दप्तराचे घेवून सकाळीस निघे टाय, ब्लेझर गणवेशातले काय कामाचे? मला जे समजते ते शाळेतल्या शिक्षकांना समजत का नाही?
काव्यरस

माझं "पलायन" ९: लाँग रन्ससोबत मैत्री

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 09/05/2019 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
९: लाँग रन्ससोबत मैत्री डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

शेजारी

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 09/05/2019 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
"नमस्कार, नुकतेच तुमच्या शेजारी राहायला आलो आहोत. याबाजूला तशी शांतता असते. इथली काहीच माहिती नाही आम्हाला.....इथे वाण्याचं दुकान.... दूध कुठे मिळत.... थोडी माहिती हवी होती." काकूंनी दार उघडल्या उघडल्या त्याने बोलायला सुरवात केली. खराच नवखा असावा तो. नाहीतर एकतर काकूंच्या बंगल्याच्या आत जाण्याचं धाडस त्याने केलं नसतं; आणि गेलाच असता तरी बेल वाजवण्याचा वेडेपणा तर नक्कीच केला नसता. दुपार टळून संध्याकाळची उन्ह उतरायची वेळ झाली होती. दार उघडल्यावर अंधारातून बाहेर डोकावणाऱ्या काकूंच्या डोळ्यांवर उन्हाची तिरीप आली होती. त्यामुळे त्या मनातून चिडचिडल्या होत्या.

व्हिडीयो कोच..

लेखक चिनार यांनी बुधवार, 08/05/2019 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
९३-९४ साली प्रायव्हेट बस ही संस्था अगदी नवीन होती. शिवा ट्रॅव्हल्स, सदानी ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्या नुकत्याच उदयाला आल्या होत्या. अमरावती-अकोला, अमरावती-यवतमाळ वगैरे गाड्या राजापेठ चौकातून निघायच्या. नोकरीसाठी अप-डाऊन करण्याऱ्या लोकांसाठी ह्या गाड्या सोयीच्या होत्या. दिवसभर ऑफिसमधून थकूनभागून घराकडे निघाल्यावर एसटीतुन उभं राहून प्रवास करण्यापेक्षा हे बरं होतं. किंवा दिवसभर खरेदीसाठी वगैरे अमरावतीत आलेल्या कुटुंबांना रात्री गावाकडे परतण्यासाठी सुध्दा ह्या बसेसचा पर्याय उपलब्ध झाला. पण खाजगी क्षेत्र म्हटलं की स्पर्धा आली. स्पर्धा म्हटलं की नवनवीन डावपेच आले.

स्वामि धागे घेऊन येतात

लेखक सोन्या बागलाणकर यांनी बुधवार, 08/05/2019 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामि धागे घेऊन (का) येतात एकएक हट्टी जिलबी जिद्दीने पाडून ठेवतात, प्रत्येक जिलबीमध्ये अनेक बिनबुडाचे मुद्दे मनोरंजन म्हणून ठेवून जातात... स्वामि धागे घेऊन येतात अलंकारिक वाक्ये भिरकावून केवळ डोकेदुखी देऊन मिपाकरांच्या डोक्यात जातात ट्रोलबाजी करून मजा बघत अज्ञाताच्या अंधारात गुडूप होतात...... (दुसऱ्या दिवशी परत) स्वामि धागे घेऊन येतात.... - हे काव्यपुष्प स्वामिचरणी अर्पण

प्रेम...

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 08/05/2019 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगा तुम्हाला वाटतं की नाही कुणीतरी आपल्यावर बेहद्द प्रेम करावं तसे आयुष्यात भेटतात हजारो लोक त्यात आपणही कुणाचं विश्व म्हणून जगावं कुणाच्या नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होतात का कुणाच्या तरी आठवणी तुम्हालाही छळतात का नसेल जाणवलं अगदीच तुम्हाला काहीही जरी भरलेल्या डोळ्यातल्या भावना तरी कळतात का कुणीतरी असेलच की तुमच्यासाठीही झुरणारं तुमचे दुर्गुण माहित असूनही भरभरुन प्रेम करणारं अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . . तुमच्यावर जो प्रेम करतो तोच तुमच्यासाठी योग्य !

96 - प्रेमाचा धवलगिरी

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 08/05/2019 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ. शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’. शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो.