शिवाजी महाराज आणि स्त्रियांचा आदर
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः
यत्रैतात्सु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः
शिवाजी महाराज कि जय . सगळा आसमंत दुमदुमून गेला या गर्जनांनी . सगळीकडे उत्साह भरून राहिला आहे. शिवाजी महाराज , काय आहे या माणसामध्ये जे इतके वर्ष होऊन गेले म्हणजे अगदी इ.स. १६३० ते १६८० चा काळ तो. आज १९ फेब्रुवारी २०२० , शिवजन्मापासून ३९० वर्ष होऊन गेलीत पण त्यानंतरही इतक्या अठरा-पगड जातीमधे मानान घेतलं जाणार नाव . काय कारण असेल कि इतके शूर-वीर होऊन गेले , इतके शासक होऊन गेले पण शिवाजी महाराजांची पातळी कोणी गाठू शकाल नाही.
मिसळपाव
शिवजयंती उत्सवाच्या पर्वणीत महाराजांच्या पराक्रमाची गाथा लष्करी अधिकार्यांच्या नजरेतून सादर करण्यात विलक्षण आनंद होतो आहे. महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून फत्ते केलेल्या अनेक कारवायातून जगातील लष्करी इतिहासात त्यांचे उत्तुंग व विराट व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. त्यात शायिस्ताखानाला खतम करायची सर्जिकल स्ट्राईक मोहीम अग्रणी आहे.