Skip to main content

मागे वळुन पाहताना..

लेखक मन्या ऽ यांनी बुधवार, 20/05/2020 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळून पाहताना.. मागे वळुन पाहताना एक निरागस चेहरा दिसतो मज मनसोक्त खळखळुन हसताना मागे वळुन पाहताना तोच चेहरा दिसतो मज भेदरलेल्या डोळ्यांनी आसपास पाहताना मागे वळुन पाहताना लोकांचे चेहेरे न्याहाळताना तो चेहरा दिसे मज ओंगळवाण्या नजरा सहन करताना मागे वळुन पाहताना ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे पाहिले मी मुखवटे एकावर एक चढवताना मागे वळुन पाहताना स्वतःला आरशात बघताना पाहिले आहे मी स्वतःचीच किळस करताना मागे वळुन पाहताना ते स्पर्श सहन करताना पाहिले आहे मी स्वतःलाच तीळ तीळ तुटताना मागे वळुन पाहताना रोज रोज मरताना पाहिले आहे मी स्वतःलाच नैराश्याच्या खाईत झोकताना मागे वळुन पाहताना आज

प्राक्तनवेळा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी बुधवार, 20/05/2020 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजाच्या पुसती रेषा अंधार जसा दरवळतो. काळीज कुणाचे रडते चंद्र कुणाचा विव्हळतो. काळाकडे घ्याव्या मागून त्या हळव्या प्राक्तनवेळा. विस्मृतीस कराव्या अर्पण सुगंधी दुःखांच्या माळा. रंगीत करावे डोळे श्वासांना यावी भरती. उगवून पुन्हा जन्मावे पाऊस पडल्यावरती. -कौस्तुभ

रत्नाकर मतकरी : अ‍ॅडम - नव्या आवृत्तीच्या निमित्ताने

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 20/05/2020 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नाकर मतकरी : अ‍ॅडम - नव्या आवृत्तीच्या निमित्ताने नुकतंच ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा धागा निघालेला आहे, आणि मिपाकरांनी त्यावर भावना व्यक्त केल्या आहेत ! मतकरींच्या कथा वाचताना अचानकपणे अक्षर दिवाळी अंकात त्यांच्या अ‍ॅडम या कादंबरीची भेट झाली ! त्यातील शृंगारिक वर्णने वाचून चळायला झालं. सुरुवातीच्या काही पानांनंतर कादंबरीचे मनाचा ताबाच घेतला. दक्षिण भारताच्या पार्श्वभूमीवरील पात्रांनी मनात घर केले.

हसण्या उसंत नाही

लेखक कौस्तुभ भोसले यांनी बुधवार, 20/05/2020 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
हसण्या उसंत नाही रडण्यास अंत नाही. निळे सावळे जगणे मजला पसंत नाही. बहरली जरी झाडे हा तो वसंत नाही. दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. सांगुन थकलो मी, पण दुनिया ज्वलंत नाही. -कौस्तुभ शुद्धसती मात्रावृत्त

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सहावा) ३०.१०.२०१९ दावनगिरी ते सिरा

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी बुधवार, 20/05/2020 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सहावा) ३०.१०.२०१९ दावनगिरी ते सिरा सकाळी सहा वाजता दावनगिरीच्या पोलीस गेस्ट हाऊस मधून राईड सुरू झाली. . रस्त्यावर वाहने तुरळक होती. सरळसोट क्षितीजाकडे जाणार रस्ता, शेवटी एका बिंदूपाशी संपत होता. जणूकाही पुढील वाट आसमंतातील असावी. त्या वाटेवर काळे निळे ढग आमच्या स्वागताची तयारी करत होते १५ किमी वरच्या 'बिनधास्त' ढाब्यावर आलो.

उप्पीट मात्र बरे झाले

लेखक मनस्विता यांनी मंगळवार, 19/05/2020 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: https://www.misalpav.com/node/46836 रवा होता खमंग भाजला तरीही उप्पीट मात्र बरे झाले फोडणीत मोहरी तडतडली तरीही उप्पीट मात्र बरे झाले उडीद डाळ त्यातच परतली तरीही उप्पीट मात्र बरे झाले आधणातल्या रव्याला दणकून वाफ आणली तरीही उप्पीट मात्र बरे झाले डिशमधल्या उप्पीटावर खोबरे-कोथिंबीर सजली तरीही उप्पीट मात्र बरे झाले मीठ, साखर, लिंबू सगळी भट्टी पर्फेक्ट जमली तरीही उप्पीट मात्र बरे झाले काय, कॉफी करू का? अर्थातच कर तरीही उप्पीट मात्र बरे झाले बाकी स्वयंपाकात आहे निपुण, स्तुती करणार कशी उप्पीट मात्र...

कोरोना

लेखक Sneha Kalekar Ghorpade यांनी मंगळवार, 19/05/2020 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
कसा काय देवराया, हा कहर झाला कोरोनाचा न भूतो न भविष्यती,असा खेळ पाहिला आयुष्याचा किड्यामुंग्यांसारखी माणसं मरू लागली जिकडेतिकडे यातून लवकर सुटका कर देवा, एवढ़े कळकळीचे साकडे कधी नव्हे ती आता,सर्वांना नाती कळू लागली आयुष्यभराची देवा, अद्दल घडवलीस चांगली माझ्यासारखं कुणीच नाही, असं "माणूस" मिरवीत होता फुकटच्या "हुशारया" आणि नुसता "गुर्मीत" होता आणलंस थोडं शुद्धीत,फिरवलीस तुझी काठी व्याकूळ झाला माणूस, आपल्याच माणसांसाठी चांगलाच धडा शिकवलास, आम्हाला असंच हवं होतं "मी"पणाच्या अहंकारात,विसरून गेलो नातंगोतं कोरोनाच्या या लढाईतून देवा, तूच आम्हाला तारून नेऊ शकतोस पूरे कर देवा आता, किती लेकरांचा

ती अन् पाऊस..

लेखक मन्या ऽ यांनी मंगळवार, 19/05/2020 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
ती अन् पाऊस.. खूप दिवस झाले आता पावसात चिंब चिंब भिजून भरलेलं सावळ ते आभाळ नजरेत सामावणारी ती भिजावं का थोडतरी? ह्या येत्या पावसात चिंब चिंब घेऊ न्हाऊन असा विचार करणारी ती गेले कित्येक दिवस दिवस? छे!
काव्यरस
Taxonomy upgrade extras

कडं २

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 19/05/2020 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
तपकिरी रंगाचं बांड कुत्रं ते. इवल्याशा झुडपाच्या सावलीत अंग चोरून बसले होते. दुपारचं लाही लाही करणारं ऊन. रानवटीचे खुरटे झोंबरे काटे. वारा सुटला तरी तापलेल्या झळया लाग्याव्यात. वाळलेली कुसळं आणि सुदूर पसरलेल्या येड्या बाभळी. चढउतार असलेला खडकाळ प्रदेश. पहावे तिकडे मृगजळेच दिसावी. लखोबाची वाडी अशी भरदुपारी शांत निवांत सुस्तावून जायची. भरगच्च जेवलेल्या ढेरपोट्या म्हाताऱ्यासारखी. बांड्या कुत्र्याचा डोळा लागणारंच होता की भरधाव वेगानं एक गाडी त्याच्या पुढून निघून गेली. कुत्रं थोडं भांबावलं. आणि आयतीच नामी संधी शोधत गाडीच्या मागे तुटून पडलं. जोरजोरात भुंकत गाडीच्या मागे धाव धाव धावलं. मग थकलं.

कुल्फीच्या बिस्किटाच्या पापलेटाची कोशिंबीर

लेखक माहितगार यांनी सोमवार, 18/05/2020 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
आदाब आदाब, मोहतरम आम्ही माहितगार है. हम मिसळपाववर कोणतेबी वीषयपर खीस पाडणे मे माहिर है. मगर आज ज्या गोष्टीपे खीस करेंगे ती गोष्टच अशी रम्य काल्पनिक कथा आहे की, आम्ही किती खीस पाडेंगे तरी आमची खिसी कोशिंबीर वाटेल आता ज्यांना मूळ अनुवादच भारी आवडलाय त्यांना आमची खिसी फ्रुट सॅलड सारखी सुद्धा लाजवाब लागू शकती है! कारण उसमे मूळ कथासे अधिक इन्ग्रिडीएंटची तरफ ध्यान दिलाया आहे. आता म्हणाल की कोणते इन्ग्रिडीएंट? तर कुल्फी आहे, बिस्किट आहे, पापलेट आहे.