माणूसपणाच्या आसपास!
- डॉ. सुधीर रा. देवरे
आपल्याला झाडांत देव पाहता येतो. म्हणजे झाडांची पूजा करायची नाही तर झाडं लावायची. झाडांचं संगोपन करायचं. निसर्गात देव पाहता येतो. म्हणजे निसर्गचक्रात मानवी ढवळाढवळ करायची नाही. माणसात देव पाहता येतो. म्हणजे माणसाला माणसासारखं वागवायचं. एखाद्या माणसाच्या चरित्रातही देव पाहता येतो. ऐतिहासिक पुरूषात देव दिसू शकतो. संतांच्या कृतीत देव असतो. देवाच्या मुर्तीतच फक्त देव असतो असं नाही. मंदिरातच फक्त देव असतो असं नाही. देव्हार्यातच फक्त देव असतो असं नाही. पूजा केल्यानेच फक्त देव प्रसन्न होतो असंही नाही. म्हणून नवनवीन देवस्थाने निर्माण होऊ नयेत.
मिसळपाव