मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अस्पर्शिता..

सस्नेह · · जे न देखे रवी...
काव्यरस
अस्पर्शिता एक राधा मानसीं दडून आहे.. रिक्त रुक्ष ओंजळीच्या रसतळीं भरुन वाहे.. वठला जरी तरु तो वैशाख अग्निदाहे.. नि:शब्द भावनांचे तृण-अंकुर गर्भि वाहे.. वनवास वाटचाल पायातळीं निखारे.. अंतरी परि चित्ताच्या श्रीहरी नित्य पाहे.. होरपळे तनु विरहाचा वैशाख-दाह साहे... हृदयी परि गोविंद मीलनाची आस आहे..

वाचने 3529 वाचनखूण प्रतिक्रिया 6