Skip to main content

आणि आत एक पाऊस..

लेखक पाटिल यांनी रविवार, 14/06/2020 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
हवा कुंद झालीय. आभाळ गच्च भरून आलंय. आणि तुझ्या विरहात, मी कातर झालोय sss. छ्या! काय फालतूगिरीय ही ! त्यापेक्षा हवा बेफाम झालीय आणि कुत्र्यांना सीझनची चाहूल लागलीय, असं बोला. थेट. मुद्द्याचं. रिमझिम पाऊस आणि ओल्या मातीचा सुवास. छि: छि: छि: हे तर अगदीच टुकार झालं. चावून चोथा... थू: बरं मग पावसाळी गझला, निदान मेघमल्हार तरी?? आता मात्र हद्द झाली..! चला फुटा इथून. बाहेर एक पाऊस. वेड्यासारखा. उभा-आडवा. रपारप. दणादण. आणि आत एक पाऊस स्मूथ. घनदाट. ऊबदार. कनवाळू. मेलॅन्कोलीक. हलका हलका असलं काही असेल तर सांगा..
लेखनविषय:

वाचने 3188
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

च्यायला, आधी मी मेकॅनिक वाचले, काही टोटल लागेना, मग परत वाचले तर मेलॅन्कोलीक., मग त्याचा अर्थ शोधला अन मग कविता आवडली पैजारबुवा,