Skip to main content

निःश्‍वास

Published on 15/12/2007 - 22:20 प्रकाशित मुखपृष्ठ
निःश्‍वास दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3047

एक दिवस...

Published on 15/12/2007 - 20:26 प्रकाशित मुखपृष्ठ
पूर्व लाजरी सोनेरी पहाट फुलला दिवस निळा प्रकाश... भारवले ढग विजांच्या रेषा काळे पक्षी जग भकास... कुंद हवा सरला साज निजला दिवस सांज उदास...
लेखनविषय:

याद्या 3296

जाहिर आवाहन

Published on 15/12/2007 - 18:35 प्रकाशित मुखपृष्ठ
श्रीमंत तात्या साहेब (मिसळपाववाले) यांना जाहिर आवाहन तात्या..... पुन्हा एकदा सर्वांकडुन हस्ताक्षर गोळा करुन आपले अनमोल बहुमोल विनामोल निष्कर्ष जाहिर करावेत महेन्द्र

याद्या 3561

नियंत्रणा बाहेर चाललेला ड्रुपल

Published on 15/12/2007 - 01:40 प्रकाशित मुखपृष्ठ
ड्रुपलने मराठीत लिहिण्याची सोय करून देऊन जालावरच्या मराठी वापरामध्ये क्रांतीच घडवून आणली. पण आता त्याही पूढे जाऊन ड्रुपलमध्ये नुसतेच मराठी लिहिण्याची सोय नसून ड्रुपल स्वत:च मराठीत बोलू लागला आहे. तांत्रिक बिघाडामूळे तो जे प्रतिसाद उडवतो त्यावर ड्रुपल आता, ' पंचायतीवरील सदस्यांकडे काही सदस्यांनी व्य नि पाठवून तक्रार केल्यामुळे पंचायतीने आपल्या अधिकारांचा वापर करत येथील काही लेखन आणि त्याला आलेले संबंधित प्रतिसाद उडवले आहेत!' कळावे, (लोकनियुक्त) मिसळपाव पंचायत समिती अशी सही देखिल ठोकून देतो.

याद्या 5849

विनोद

Published on 15/12/2007 - 01:38 प्रकाशित मुखपृष्ठ
(मैल वरुन साभार) गुरूजी: अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? चिंटु: माहित नाही गुरूजी. गुरूजी: अरे असे काय करतोस पुस्तकात लिहिले आहे की....१५४२-१६०५ चिंटु: मला वाटले तो अकबराचा मोबाईल नंबर आहे.
लेखनविषय:

याद्या 5759

देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर (दौलतबाद)

Published on 15/12/2007 - 00:04 प्रकाशित मुखपृष्ठ
मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.

याद्या 23429