अदा बेगम - भाग ५
अदा बेगम - भाग ५
-------------------------
पुढल्या एका छोट्या वस्तीच्या अलीकडे , गावाबाहेर एक मारुतीचं देऊळ होतं. देवळाच्या पटांगणात गोसाव्यांचा एक जथा पथाऱ्या टाकून पडला होता. तोच जथा !.... ज्या मध्ये अदा होती.
ती नुसतीच पडलेली होती . तिला झोप येत नव्हती . तिला हिरोजी आठवत होता ... रात्रीच्या गडद निळ्या आकाशात पाहताना तिला वाटत होतं - चांदण्या खूप असल्या तरी चंद्र एकच असतो .
त्या शांततेत तो टापांचा आवाज घुमत होता. सगळेच जागे झाले. बाबुलजी पुढे झाला . त्याने घोडा धरला. घोड्यावर कोणी स्वार पडलेला होता . दोघा गोसाव्यांनी त्याला खाली घेतलं. हिरोजीला.
मिसळपाव