Skip to main content

बंदोबस्त

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 26/12/2009 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
सुपातली पाखड अंगणात भिरकावून भुलवतेस चार भुरट्या पाखरांना भर दुपारी. गुमसुम गुपचुप. आतून बंद कडी घालतेस दुपारच्या अधमुर्‍या अंधाराची. खिडकी आड भोचक राघू किंचाळतोच, माहीत्येय .. ....... माहीत्येय.. दुपारची दंगल आणि बाहेर बंदोबस्त.
काव्यरस

चित्रपट परीक्षण-"अवतार"

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 26/12/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट परीक्षण- अवतार जगभरातून अवतार या हॉलिवूड चित्रपटाचे प्रेक्षकांकडून स्वागत होते आहे. समीक्षक सुद्धा या चित्रपटाला पसंत करत आहेत. उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड त्याने तोडले आहेत. अर्थात भारतात सुद्धा.

मागणे

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 26/12/2009 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेने अनवाणी जाता ,केला मी इतरांचा हेवा मनात म्हटलं " साधी तरि चप्पल मला दे रे देवा" .... .. पाय घातला चपलेत आणि वाटलं आता जिंकलं जग चप्पल मात्र जुनी पुराणी वाटु लागली लगेच मग म्हटलं "आतi नवीन हवी,सुन्दर आणि सुखदायी तेवढं जर दिलंस देवा आणखी काही मागणार नाही" ........... ते ही मिळालं मग वाटलं एक आता पुरत नाही अजुन एक,अजुन एक हौस काही भागत नाही. हे हवं ..ते ही हवं.. मिळवुन ना तर खेचुन घ्यावं जगामधलं सारं सुख माझ्या पायाखाली हवं उरापोटी धावुन शेवटी, केलंच सारं जमा भोवती पर्वाच केली नाही जरी, तुटली सारी नाती-गोती ..........
काव्यरस

मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 26/12/2009 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही.... दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही, कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही.. रोज रोज गा-हाणे मित्र ऐकून ऐकणार काय ? भर दुपार मैफल माझी साकी कोणी सजवत नाही .. ढगाळ दुपार ओसरून सांज त्यावर कलताना .. रिता पेला रिते मन घेउन गाणे म्हणताना ... मीच मला संगतीला ताल कोणी धरत नाही .... उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही.... -- सागर लहरी ३/८/२०0९

कशाला ?

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 26/12/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र शत्रु सर्व जमले, अन्त्य यात्रेला कशाला ? विसरले सारे मला ते, व्यर्थ मग रडले कशाला ? प्राक्तनाची सर्व नाट्ये , रंगुनी मी खेळलो , खेळ तो खोटाच होता, जिंकुनी मिरवू कशाला ? वेदनेची सर्व गाणी, मीही होती गायिली, भैरवीचे आज गाणे, मी उगा गाऊ कशाला ? -- सागर लहरी १९-१२-२००९

येई येई गा मुकुंदा | जगज्जीवन परमानंदा |

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 26/12/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
येई येई गा मुकुंदा | जगज्जीवन परमानंदा | आम्ही तुझ्या नामछंदा | वेडावलो || तुझिया मायेपासून राही | जगी ऐसे काही नाही | भक्त तुझा सावध पाही | माया मोहा || भवसागरी अफाट जळ | काम लोभाचे नित्य खेळ | तरण्या यातून द्यावे बळ | आम्हा लागी || हवेपणाची हाव तोडी | नकोपणाही तैसा सांडी | नाम किर्तना करुनी होडी | तरावया || नाम तुझे जपे मुख | सदा होय जिव्हे सुख | डोळीयाना होय दुःख | अपार की || जिव्हे तुजला मिळतो हरी | नामजपे या संगत करी | वंचित आहो आम्ही परी | दर्शनासी || घेत नाम देव राया | धरुनी संता तरेन माया | परि या नेत्रा सुखी कराया | दर्शन देई || - सागर लहरी २५.१२.२००९

मराठीचा मुद्दा व साहित्यिकांची भुमीका

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 26/12/2009 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीचा मुद्दा व साहित्यिकांची भुमीका (लेखाचा हेतू केवळ मराठी अस्मितेचाच आहे. परप्रांतीय, नोकर्‍या, राजकारण असली गल्लत न करता वाचावा) मराठी अस्मितेच्या मुद्याला आत्ता राज ठाकरेंनी हातात घेतल्याने उभारी आली आहे. त्या आधी शिवसेनेने हे काम केले होते. नंतरच्या काळात शिवसेना आपल्या मुळ मुद्यांपासून भरकटली. त्यानंतर कोणीही मराठीचा मुद्दा हातात घेतलेला नव्हता. राजकारणी लोक केवळ वारा आला तशी पाठ फिरवणारे व सत्तेत येण्याची वाट पाहणारे असतात ही आताशा काळ्या दगडावरची रेख झालीय. त्यात मराठी अस्मितेचा अगदीच नेभळट होता. विदर्भात मराठीच बोलली जाते.

नाताळच्या सुट्टीत मुलांना (आणि त्याबरोबर पालकांना) बघायला आवडतील अशी संस्थळे

लेखक अजय भागवत यांनी शुक्रवार, 25/12/2009 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
[ह्यातील एक-दोन संस्थळे आज पाहिली तेव्हा उघडत नव्हती..पण नंतर उघडून पहावीत.]

सैतानाचे स्वर्गीय अन्न

लेखक स्वाती२ यांनी शुक्रवार, 25/12/2009 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल बर्‍याच महिन्यांनी नवर्‍याला ख्रिसमस इव मुळे सुट्टी होती. मधलाच वार असल्याने नेहमीची विकांताची कामेही नव्हती. त्या आधीच्या आठवड्यातली अ‍ॅनिव्हरसरी नेहमीच्या रुटीनमधे हरवली होती. 'हॅपी अ‍ॅनिव्हरसरी! जेवायला थांबू नकोस' सांगत त्याने सकाळी ६ लाच घर सोडलं होतं. त्यामुळे काल 'तू अजिबात खाली येऊ नकोस. आज तुला रूम सर्व्हीस!' असं सांगून नवरा सकाळी खाली गेला. हॉट चॉकलेट, बनाना ब्रेडचा ब्रेकफास्ट, जेवायला पाव-भाजी! यम्म! दुपारी ३ वाजता परत स्वारी वरती आली. 'मी तुझ्यासाठी केक करतो, ' कालच्या ज्युलिया अँड ज्युलियाचा परीणाम. अशा वेळी काही न बोलणे शहाणपणाचे.