सैतानाचे स्वर्गीय अन्न
काल बर्याच महिन्यांनी नवर्याला ख्रिसमस इव मुळे सुट्टी होती. मधलाच वार असल्याने नेहमीची विकांताची कामेही नव्हती. त्या आधीच्या आठवड्यातली अॅनिव्हरसरी नेहमीच्या रुटीनमधे हरवली होती. 'हॅपी अॅनिव्हरसरी! जेवायला थांबू नकोस' सांगत त्याने सकाळी ६ लाच घर सोडलं होतं. त्यामुळे काल 'तू अजिबात खाली येऊ नकोस. आज तुला रूम सर्व्हीस!' असं सांगून नवरा सकाळी खाली गेला. हॉट चॉकलेट, बनाना ब्रेडचा ब्रेकफास्ट, जेवायला पाव-भाजी! यम्म! दुपारी ३ वाजता परत स्वारी वरती आली.
'मी तुझ्यासाठी केक करतो, ' कालच्या ज्युलिया अँड ज्युलियाचा परीणाम.
अशा वेळी काही न बोलणे शहाणपणाचे. १० मिनिटं पॅन्ट्रीत खुडबुड करुन, हताश होऊन तो वरती आला.
'आपल्याकडे केक मिक्स नाहिये.' मला माहित असलेली गोष्ट त्याच्यासाठी ब्रेकिंग न्युज होती.
'केक मिक्स' कानावर पडताच तरातरा लेक खोलीत आला. हा घरातला ' ब्रँड न्यू फूडी'. नवखा असल्याने साहजिकच कर्मठ.
'तू मॉम साठी केक मिक्स चा केक करणार?'
'केक मिक्स नाहिये.' नवर्याने परत टेप वाजवली.
लेकाच्या चेहर्यावर मोठ्ठा अनर्थ टळल्यालाचा भाव!
" I have this awesome book. I will guide you. You are going to make a 'real cake'." लेकाने वरदहस्त ठेवला.
दोघे उत्साहात खाली गेले. १५ मिनिटांनी जोडगोळी बटरचा ठोकळा घेऊन वरती. real cake साठी soften butter लागणार होतं. काउंटर टॉप वर तो ठोकळा मऊ व्हायला १२ तास लागतील कळल्यावर दोघांचेही चेहरे पडले. लोणी मऊ करायची युक्ती सांगून त्यांच्या चेहर्यावर परत उभारी आणली. अर्धा तास धडपड केल्यावर एकदाचे लोणी मऊ झाले. तो पर्यंत लेकाचा उत्साह संपला होता.
'आता ही रेसीपी फॉलो कर म्हणजे असा फोटोतल्या सारखा केक होईल' लेकाने guidance दिला.
'पण तू मदत करणार होतास ना'
"I said, 'I will guide you'. " लेकाने आठवण करून दिली.
"आणि हा एकदम सोप्पा आहे. मी नव्हता का केला दोन महिन्यापूर्वी." लेकाने छुपं आव्हान दिलं होतं.
पुस्तक घेऊन नवरा परत guidance साठी माझ्याकडे.
"चल मी येते खाली. तू रेसीपी वाचून कर. मी काय चुकत असेन तर सांगेन. त्या food snob ला दाखवच करुन 'real cake' " आता मलाही चेव आला होता.
पुन्हा उत्साहाने नवरा कामाला लागला. ओवन प्री हीट, व्हीप, मिक्स, फोल्ड....एकेक पायरी पार करत केक आकाराला आला. टायमर वाजला आणि हातात मिटन अडकवून बसलेल्या नवर्याने 'सैतानाचे अन्न' ओवन मधुन बाहेर काढले. चॉकलेट-वॅनिलाचा तो स्वर्गीय दरवळ.........केवळ अवर्णनिय!
नवर्याचा उत्साह दुणावला होता. आता त्याला आयसिंग करायच होतं. अर्धा तास आयसिंग, कोको, वॅक्स पेपर, आयसिंग गनशी झगडल्यावर त्याला काय कसं करायचे ते एकदाचे उमजले. तर मंडळी पेश आहे माझ्या नवर्याचा पहिलाच प्रयत्न डेव्हिल्स फूड केक.....


याद्या
4990
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
सॉल्लिड!!!
सॉल्लिड! मज
+१ मजा आहे
In reply to सॉल्लिड! मज by प्राजु
वा! अभिनंदन
वा वा!
ह्हा ह्हा
In reply to वा वा! by प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ
In reply to ह्हा ह्हा by टारझन
मस्त!
+१
In reply to मस्त! by विकास
+२
In reply to +१ by धमाल मुलगा
+३
In reply to +२ by शाहरुख
डिट्टो
In reply to +१ by धमाल मुलगा
अंमळ सुंदर!!
चतुरंगाशी
In reply to अंमळ सुंदर!! by चतुरंग
हॅपी अॅनिव्हरसरी
!!!
अभिनंदन
केक...!
वाह वाह...
शुभेच्छा
अ प्र ती म
अॅनिवर्सरी बद्दल अभिनंदन!!!
मस्तच ........
धन्यवाद!