मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झट्पट झन्झनित फिश करि...............

पियुशा ·
(बर्याच दिवसापासून विचार करत होते कोणती डिश देऊ ? आमच्या आजीला सर्दी झालिये, मग माशाचा रस्सा वरपायाचा गरम गरम म्हणून मासे बनविन्याचा योग आला आणि मला लिहिन्याचाही.......... ) झटपट तर्रिवाली फिश करी ....... मी चोपड़ा मासा वापरला आहे तुम्हाला जो आवडतो तो स्वच्छ धुवून काटे काढून त्याचे पिस करून घ्या. साहित्य :- मासे पावून किलो , ९-१० लसून पाकळ्या, १/२ -१ इंच आल , कोथिम्बिर , खोबर किसलेल ३-४ मोठे चमचे , 2 मध्यम टमाटर , १ चमचा मीठ, लाल तिखट (आवडीनुसार)तेल ,जीर हिंग ,कडीपत्ता, चुटकीभर हिंग आणि थोड़ी हळद...

कासाराचा गोईंदा

यकु ·
लेखनप्रकार
काल पुण्याहून अचानक गज्याचा फोन आला आणि मी दहा बारा वर्षे मागे गेलो. गज्या म्हणजे आमच्या गोविंदकाकाचा मुलगा. हा गोविंदाकाका आमचा पोरासोरांचा गोविंदकाका असला तरी अख्ख्या पंचक्रोशीत त्याला कासाराचा गोईंदा हे एकच नाव होतं. तो आमच्या लहानशा गावात राहून चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू (स्नो!) असल्या वस्तू विकायचा धंदा करायचा. हा धंदा करण्याची त्याची रीतही त्याच्यासारखीच जगावेगळी. तो हे सामान वाहून नेण्यासाठी घोडा वापरायचा! सतत फूर्रर्र ऽऽ फूर्रर्रऽऽ करणारा आणि बांधला असेल तिथे लीद टाकून त्या आवारात विचित्र वास पसरवणारा घोडा.

न पटणारे शब्द.....

५० फक्त ·
न पटणारे शब्द..... मला हे शब्द बाजीप्रभुंचे असतील असं वाटत नाही, अगदी कितीही काव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तरी सुद्धा. सरणार कधी रण प्रभो तरी हे कुठ्वर साहु घाव शिरी बाजीप्रभुंचा इतिहास पुन्हा लिहावा ह्याची गरज नाही,त्या महात्म्याला माझे कोटि कोटि दंडवत. महाराजांना विशाळगडाकडे पाठ्वुन दिल्यानंतर मागुन येणा-या विजापुरी सेनेचा नायनाट करण्यासाठी घोडखिंडीसारख्या अतिशय अवघड ठिकाणाची निवड करणा-या त्या सेनानीच्या मनात असे विचार येणंच शक्य नाही.

मुलांची कोडी

शरद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शब्द कोडी मुलांकरता माझी धाकटी नात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊ लागली तेंव्हा सर्व आजी-आजोबांच्या मनात असते तशी [निरर्थक] भीती माझ्या मनातही निर्माण झाली " आता हीच्या मराठीचे काय ?" शेजारची मुले-मुली मराठीच होती पण तीही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधलीच! तेंव्हा आता ही जबाबदारी आजी-आजोबांचीच असे ठरवून एक ठरवले की तीच्याशी बोलतांना आपण इंग्रजी शब्द टाळावयाचे. तीलाही तसेच सांगावयाचे. पण एवढे पुरेसे वाटले नाही. . वर्ष दोन वर्षे गेली. मग आम्ही एक निराळा खेळ सुरु केला. तीला तीन-चार अक्षरांचा मराठी शब्द द्यावयाचा व त्यापासून, त्यातील अक्षरे घेऊन निरनिराळे शब्द बनवावयाचे.

कामाच्या ठिकाणचे स्नेहसंबंध

शुचि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
केवढी गरज असते व्यक्तीला समाजाभिमुख रहाण्याची, अन्य लोकांशी निकट स्नेहसंबंध वृद्धींगत करण्याची. आपण जेव्हा गप्पा मारतो, मन उघडं करतो तेव्हा, कोणीतरी आपलं बोलणं सहानुभूतीपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं. कोणाबरोबर तरी विचारांची देवाण्-घेवाण व्हावी, वादविवाद व्हावेत आणि विरंगुळ्याचे ४ क्षण आपल्या वाट्याला यावेत , आपल्या बरोबर समोरच्या व्यक्तीचादेखील विकास व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा असते. तीच गोष्ट भेटवस्तूंची.

(एक बाई ठेवावी म्हणतोय!)

पिवळा डांबिस ·
लेखनविषय:
काव्यरस
ह्या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल :) एक बाई ठेवावी म्हणतोय.... एक बाई ठेवावी म्हणतोय, करायला गरमागरम भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर, जोडी जुळत नाही हो दुसरी!! शुभ्र दळलेली जवार बनवी होऊनि तदाकार अस्सल मर्‍हाटी भाकर सुबक, पातळ, गोलाकार एक बाई ठेवावी म्हणतोय दिसायला असु द्या कशीतरी नसो अंगी बाकी काही गुण फक्त भाकरी मिळो ऊनऊन तर एक बाई ठेवावी म्हणतोय! (मित्रहो, तुमचा काय सल्ला?) :)

एक बायको करावी म्हणतोय

गणेशा ·
लेखनविषय:
एक बायको करावी म्हणतोय सुंदर .. सालस .. सावरी .. तिचे शब्द असावे तिळगुळ अन ओठांवरी काळसर तिळ नाजुक नक्षीदार ... असावे डोळे पाणीदार नजर धारदार .. असावी मराठी बाणेदार एक बायको करावी म्हणतोय सुंदर .. सालस .. सावरी .. भोळ्या या राजाची बाकी इच्छा नाहि दूसरी ... ----- शब्दमेघ ( १४ डिसेंबर २०१०) नोट : ऑफिसटाईम संपला आहे ,हणुन एक-दोन कडवी राहिली आहेत .. तरी अपुर्ण का असेना द्यावी म्हंटले कविता .. तेव्हद्याच्या अपुर्ण असलेल्या इच्छेस अर्पण म्हणता येइल ( असेच लिहिले आहे .. मजेने ह.घ्या)

गच्च मिठी शहारलेली

गणेशा ·
काव्यरस
हळुवार कातरवेळी गच्च मिठी शहारलेली चंदेरी किणार ल्यालेली आकाशी ओढणी रंगबिरंगी तव गालावर रेशमी किरणांची केशरी लाली जांभुळनयनात हरवली गच्च मिठी शहारलेली सोहळा रजनीगंधाचा स्पर्श रेशमी आनंदी .. लाजुनी दडला सूर्य ओठांची निशब्द बोली.. ---- शब्दमेघ (१४ डिसेंबर २०१०) * अवांतर : १. जांभुळनयन हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे, कदाचीत आश्चर्य वाटु शकते, पण माझ्या एका मैत्रीणेचे मोठे काळे पाणीदार डोळे पाहुन मला नेहमी जांभळाचीच आठवण यायची .. ही कविता त्या जांभुळनयनांना अर्पण ....

फिटे अंधाराचे जाळे (छायाचित्रे)

५० फक्त ·
लेखनविषय:
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश या ओळी मी दोन वर्षांपुर्वी काढ्लेल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन सादर करीत आहे.