उत्प्रेक्षा
उपमा आणि उत्प्रेक्षा यात फ़रक काय ?. प्रस्तुत आणि अप्रस्तुत यातील साम्य दाखविणे हा दोघांचाही उद्देश. उपमेमध्ये सादृश्यवाचक शब्द सम, परी, प्रमाणे , जैसे वगेरे असतात. उत्प्रेक्षेमध्ये हे जणुं काही, कीं , भासे असे असतात. वरवर पहाता हा फ़रक किरकोळ वाटेल. तर मग थोडॆ खोलात जाऊं.
उपमेय हे जणु काय उपमानच आहे अशी जेव्हा संभावना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. संभावना म्हणजे उत्कट कोटीचा संदेह.असे बघा, कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचे ज्ञान तीन प्रकाराचे असू शकते. [१] निश्चित ज्ञान. खरे असेल वा खोटे, पण शंकेला वाव नाही. [२] संदिग्ध. दोनही बाजू ख़या असतील वा खोटया असतील असे वाटते.