पाउलखुणा

लेखनविषय:
प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत.. सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा आणि मागोवा .. कश्यासाठी ...? कोणासाठी...? बहुदा एका प्रश्नमालिकेतून पुन्हा दूसर्‍या प्रश्नमालिकेत जाण्यासाठीचा अखंड प्रवास गुरफ़टलेली तर ही रात्र ही आहे .. उदयस्ताच्या रंगात न्हाऊनही कालवंडली आहे बिच्चारी माझे काय मग त्यापुढे.. अता माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर माझ अस्तित्वच संपत चाललय .. पण या रात्रीच्या सोबतीनेच मी जगते आहे..

लतादेवीची आरती

लेखनविषय:
जय देवी जय देवी जय लता देवी शंभर वर्षे माझेही करियर करवी | त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही सारे श्रमले तरी तू गात राही काही विवाद करिता पडले प्रवाही तुझा गायन निर्झर अखंड हा वाही |१| जय देवी... सांगलीवरुनी उड्डाण मुंबई-पंढरी किती गायिकांची भरली शंभरी वीणा, नुपूर आणि आली बासुरी तुझिया वाणी आल्या परा वैखरी |२| जय देवी.... तुझिया कृपेने सारे मंगल होऊ दे पेडर रोडवर माझा बंगला होऊ दे भारतरत्न माझ्या घरी येऊ दे 'कोल्हापूर-नंदन' सुखिया होऊ दे |३| जय देवी...

फेसबुकावरील स्त्रियांचे फोटो..!

नमस्कार, हा खरे तर कौल टाकणार होतो, परंतु कौल टाकताना कौलाची पार्श्वभूमी लिहिण्यास जागा नसते. म्हणून हा काथ्याकूट टाकत आहे.. असो.. तर हा काथ्याकूट कम कौल असा - (केवळ पुरुषांकरता) तुम्ही फेसबुकवर वावरताना नावाने/नाव शोधून विविध स्त्रिया/मुलींच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांचे फोटो आवडीने (चवीचवीने) पाहता का? खरे खरे उत्तर द्या.. १) पाहता का? २) पाहता तर का पाहता? ३) असे ओळखीच्या स्त्रियांचे, खास करून अनोळखी स्त्रियांचे फोटो पाहणे/न्याहाळणे, हे गैर आहे असे तुम्हाला वाटते का? माझी उत्तरे - १) हो. हल्ली फावला वेळ फार कमी मिळतो.

क्षारांमुळे नापीक झालेल्या जमीनी

लेखनप्रकार
कालच्या सकाळच्या Today पुरवणीत एक बातमी होती. क्षारांमुळे नापीक झालेल्या जमीनी बद्दल. त्यात म्हणले होते की "ह्या जमीनी ४० वर्षापासुन पडीक आहेत. हे संशोधकांसाठी आव्हान आहे." सविस्तर बातमी येथे वाचा. http://72.78.249.107/Sakal/2Jan2011/Enlarge/PuneCity/PuneToday/page2.htm काही दिवसांपुर्वी लोकप्रभामधे एक लेख आला होता. त्यात गुजराथमधल्या एका गावाने, कोडिनार त्याचे नाव, या क्षाराच्या समस्येला कसे तोंड दिले याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यातील काही भाग. गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या क्षारग्रस्त ३०० गावांनी विकासाचं एक नवं मॉडेल उभं केलं.

जमात : उच्चभ्रु आणि गुंठामंत्री !!

काही दिवसांपूर्वी आपण माझ्या बरोबर काही आयटी वाल्यांच्या सवयीचा आस्वाद घेतलात. आता अजुन काही जमातीं कडे आपण पहाणार आहोत. सर्वात पहिले : उच्चभ्रू !! (आंतरजालीय भाषेत या जमातीच्या लोकांना हुच्चभ्रू असे ही म्हटल्या जाते.) आमचे कट्टर शत्रुत्व असलेली ही जमात, आपल्याला गल्ली-बोळात सहजासहजी सापडणार नाही, मात्र शनिवारी-रविवारी एखाद्या मॉल मध्ये आरामशीर सापडेल. अंगात , आंग्लभाषेत, आय एम अश्या ऍटिट्यूड धारी अक्षराने सुरु होणारं , अथवा एखादं प्रवचनीय वाक्य असलेले राऊंड नेक चे टी-शर्ट असेल.

मराठी चित्रपट - एकंदरीत साधकबाधक चर्चा..

आत्ताच समीरसूर याचा आयडियाची कल्पना - फिकी मिसळ हा लेख वाचला.. छान परिक्षण..! हे परिक्षण वाचून काही ढोबळ विचार मनात आले ते खाली उतरवत आहे.. सचिन, महेश कोठारेंबद्दल मला काही बोलायचे नाही..माझ्या मते ते दोघेही सामान्य किंवा अतिसामान्य कुवतीचे आहेत..सचिन स्वत:लाच महागुरू वगैरे म्हणवून घेतो याची मौज वाटते..! :) अशिक सराफ -मूळातला खूप गुणी. निर्विवादपणे एक समर्थ अभिनेता. परंतु तरुण वयातही तो बागेत नट्यांमागनं धावतांना कैच्याबैच दिसायचा... मराठी सिनेसृष्टीला या अभिनेत्याकडून खूप काही करून घेता आले असते..! लक्षा आवडायचा मला.. अतिशय गुणी.

आयडियाची कल्पना - फिकी मिसळ

लेखनविषय:
लेखनप्रकार
काल नीलायमला चक्क ब्लॅकमध्ये तिकिट घेऊन 'आयडियाची कल्पना' पाहिला. बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट ब्लॅकमध्ये बघण्याचा योग आला. गर्दी चिक्कार होती. कधी नव्हे ते नीलायमचे पार्किंग फुल्ल झाले होते. हे चित्र बघून नयन सुखावले. सचिनची जादू अजूनही कायम आहे हे निदर्शनास आले. आत गेल्यावर पाहिले तर बाल्कनी गच्च भरलेली होती. प्रेक्षक आतूरतेने चित्रपट सुरु होण्याची वाट बघत होते. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक स्पर्धेने चित्रपट सुरु होतो. नायक जयराम (सचिन) एक हौशी नट असतो. त्याचा नायिकेच्या गाडीमुळे एक छोटासा अपघात होतो.

आघात

लेखनविषय:
लेखनप्रकार
नवीन वर्षातील चित्रपटांची सुरवात सुरवात यंदा (बरेच वर्षांनी) मराठी चित्रपट पहाण्याने झाली. काल विक्रम गोखले दिग्दर्शित "आघात" पाहिला. एका शब्दात सांगायचे तर चित्रपट "आवडला". टिपः यापुढे चित्रपटाची सुरवात दिली आहे. अंशतः रसभंग होऊ शकतो चित्रपट सुरू होतो तो डॉक्टरांच्या प्रतिज्ञा/शपथ ऐकत. कुठल्याही प्रकारच्या नमनात वेळ न घालवता मुळ विषय वेग घेतो. एक २२ वर्षांची मुलगी जिचे लग्न महिन्याभरावर आले आहे तिच्या ओटीपोटात एक गाठ डिटेक्ट झाली आहे.

सॉसी चिली व्हेजिटेबल्स व्रॅप (wrap)

'पोळी भाजी खाऊन खून अगदी कंटाळा आलाय! अरे हो, पण एवढ्या पोळ्या केलेल्या आहेत न. त्याचं काय करायचं? फोडणीची पोळी करू? नको. मला काही तरी मस्त, चमचमीत खावंस वाटतंय. ' जर हा संवाद तुम्हाला ओळखीचा वाटत असेल, तर हि पाक्रु तुम्हाला नक्की आवडेल; आणि नसेल तरी आवडेल. सोप्पी कृती आहे. हा पदार्थ स्नॅक म्हणून किंवा स्प्रिंग रोल सारखं स्टार्टर म्हणून पण देता येतो. आणि हो, हि एक लो कॅलोरी हाय फायबर रेसिपी आहे.
Subscribe to