भेसळखोरांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्याला जिवंत जाळले
पेट्रोल आणि डिझेलमधील भेसळ रोखण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना भेसळखोरांनी पेट्रोल आणि रॉकेल टाकून जिवंत जाळण्याची क्रूर घटना मनमाडपासून जवळच असलेल्या पाणेवाडी परिसरात घडली. य़ात सोनावणे यांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाणेवाडी येथे भारतातील सर्वात मोठे पेट्रोल आणि डिझेलचे साठे आहेत. या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते. ही भेसळ होत असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना कळाली. आपल्या पथकासह सोनावणे या ठिकाणी गेले. त्यावेळी पेट्रोल-डिझेल माफिया यांच्या बाचाबाची झाली.
याद्या
7367
मिसळपाव