Skip to main content

वॅलेंटाईन भेट प्रवास...

Published on मंगळवार, 01/02/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
थोडेशे मनोगत : गद्य लिखान लिहायला गेलो तरी पद्य म्हनुनच लिहिले गेले होते हे सगळे ... निम्मित्त कवितेचा धागा असला तरी गद्य लिखान करणार्‍या समस्त मंडळीचा हेवा वाटुन गेला मात्र .. असो वाचायला लेख.. कथा आवडत असणारा मी कवितेचे काहीच कळत नसताना कविताच का करत असतो कायम हे कोडे मात्र ४ वर्षे झाले मलाच उलगडतच नाहि कधी असो मुळ विषयावर येतो .. येथे कथा आहे एका दूर गेलेल्या सखी आणि प्रियकराची .. साधी .. सरळ आठवण पण खुपच मनाला उत्तेजीत करुन जाते .. पहिली कविता खुपच साधी असली तरी थोड्या फार प्रमाणात ती खरीच आहे.
लेखनप्रकार

याद्या 1849

पण...बंड करणार नाही...

Published on मंगळवार, 01/02/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
(मा.सलिलदांच्या कवितेतील काही ओळी त्यांची क्षमा मागुन) भ्रष्ट्राचाराचे कितीही पेव फुटूदे माफीयांना येथे राज्य करु दे घोटाळ्यांची मोठी रास पडुदे काळ्या धंद्यांचे रान माजुदे पण मी मोर्चाही नेणार नाही अन संपही करणार नाही नेत्यांना माझा देश लुटू दे काळ्या पैशांनी बॅंक भरु दे महागाई गगनाला भिडु दे लोकशाहीचा खुनही होवुदे पण मी मनातल्या मनात कधी दंगाही करणार नाही अन याचा निषेध सुध्दा साधा कधी नोंदवणारही नाही मी मनातल्या मनात कुढत माझे आयुष्य जगेन आता भ्रष्टाचार हाच धर्म भ्रष्टाचारी नेते आमचे धर्मगुरु आणि आम्ही त्यांचे अंध अनुयायी..................... खरच सामान्य जनता किती हतबल आहे, सारं काही सहन क
लेखनविषय:

याद्या 1195
काव्यरस

वॅलेंटाईन भेट प्रवास

Published on मंगळवार, 01/02/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
खरे तर हा वॅलेंटाईन भेट प्रवास गद्य म्हणुन लिहायला घ्यायचा असे ठरवले होते तेंव्हा, पण संपुर्ण गद्य आपोआप च पद्य म्हणुनच लिहिले गेले, त्या प्रवासातील एक कविता छान वाटली म्हणुन येथे देत आहे, बाकीचे गद्य विभागातच लिहित आहे.
लेखनविषय:

याद्या 1919
काव्यरस

उडान (२०१० )

Published on मंगळवार, 01/02/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
उडान णमस्कार्स , संबंधितांना टिप : हा लेख उडवायचा असल्यास किमान एकदा सुचित करावे . कारण कळल्यास आजन्म ऋणी राहु. मस्तकलंदर या मुलीने ह्या विषयावर लिहायला प्रवृत्त केल्याने तिचे औपचारिक आभार. डिस्क्लेमर : ह्या प्रकाराला चित्रपट परिक्षण म्हणता येणार नाही. नव्हे तो आमचा प्रांत ( शिवाय जात / धर्म ) नव्हे. काल रात्री जरा फावला वेळ मिळाला. सहज मुव्हीज चं फोल्डर ब्राऊझ करत होतो. सगळे छाणछाण चित्रपट पाहुन झाले होते. " १२७ आवर्स " हा चित्रपट पहाणार होतो .. पण त्याच्या शेजारीच मला "उडान" दिसला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 7000

फक्त पुण्यातच अस होऊ शकत...

Published on मंगळवार, 01/02/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
मध्ये एकदा मी आणि माझा मित्र, काही खरेदी निमित्त शनिपार जवळ गेलो होतो. खरेदी आटोपून झाल्यावर आमच्या पोटातील कावळ्यांना शांत करण्यासाठी आम्ही लक्ष्मिरोड वर पावगी वाड्यातील दुकनात (नाव आठवत नाही) गेलो. आमच्या नशिबाने तिथे पनीर रोल आणि बर्गर चांगला मिळाला (तेवढीच दुकानाची जाहिरात ) म्हणून मग त्यावर यथेच्छ ताव मारला. ते संपवून मग जवळच्याच एका अमृततुल्य मध्ये जाऊन दोन कटिंग सांगितल्या, कारण पुण्यात चहा प्यावा तर अमृततुल्य मधेच आणि ते सुधा कटींगच. चहा आल्यावर त्याचा अस्वाद घेत आम्ही दोघेही त्या दुकानाबाहेर गप्पा मारत उभे असताना, तिथे एक वल्ली समोर येऊन उभी राहिली.

याद्या 6954

वनराणी ..५

Published on मंगळवार, 01/02/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
वनराणी..४ आश्रमाच्या पाकगृहात मी अजून प्रवेश नाही केला आहे. वासंतिका ..!! मनू ऋषींच्या अर्धांगिनी, गुरूभार्याच म्हणायला हवं वास्तविक!; त्या पाकगृह सांभाळतात. माझं भोजन पत्रावळीवर वाढून ठेवतात.. मग मी आणि साऊ दोघी भोजन करतो. मुनीवरही आवर्जून विचारपुस करतात माझी. काय कमी आहे इथे? काहीच नाही. मा', बा' तुम्ही दोघे एकदा येऊन बघा.. तुमची शबरी इथे एका ऋषींच्या आश्रमात राहते आहे. रोजचे स्त्रोत्रपठण ऐकते आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2586

डायरीतले एक पान

Published on मंगळवार, 01/02/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
स्थळः पान्ढरे सदन तारीखः केव्हातरी वेळः कोणतीतरी बघता बघता येथे येउन दोन वर्षे झाली. येथे आल्यापासून बाहेर जाताना घराला कूलूप लावण्याची सवय साफ गेली आहे. येथून परत शिकागोला गेलो की सुरुवातीला कूलूप लावण्यची सवय परत करून घ्यावी लागणार आहे. आजचा दिवस जरा धकाधकीचा गेला. आधी ट्युनिशिया आता ईजिप्त. ह्या लोकाना एकदम पेटायला काय झाले समजत नाही. गुप्तचर खाते काय झोपले होते? उद्या एकेकाची तासायला पाहिजे. सुएझ कनॅल ईजिप्तमधूनच जातो आणि आमचे २०% तेल सुएझ कनॅल मधूनच येते. समजा आमचे मित्र सत्तेवर आले नाहीत तर बॅरलचा भाव २०० च्या वर जाईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3021

दलिया इडली आणि दोसा

Published on मंगळवार, 01/02/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
यावेळी दलिया जरा जास्तच आणला गेला. दलियाची खिचडी घरात कोणाला विशेष आवडत नाही. आणि गोड तरी किती करून खाणार. म्हणुन जालावर दलियाच्या रेसिपी शोधताना दलिया इडली सापडली. दोन तीन ठिकाणच्या रेसिपी एकत्र करून तयार झालेली ही दलिया इडली ! ज्यांना तांदूळ कमी खायचा आहे किंवा चालतच नाही अशा खवैय्यांसाठी ही एक मस्त रेसिपी आहे. ट्राय करा !

याद्या 9755