हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!
-----------------------------------------------------------------------------
एक सिगारेट पिणारी मुलगी - http://misalpav.com/node/24641
-----------------------------------------------------------------------------
हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!
आज तो दिसला, तब्बल तीन साडेतीन वर्षांनी ..
ट्रेनमध्ये बसला होता.. एका मुलीबरोबर... मुलगी.?? अंह, गळ्यात लायसन झुलत होते तिच्या. सौभाग्याच्या ईतर ही सतरा खुणा, त्याची ताई किंवा वहिनी तर नसावी.. छे.. मग असे खेटून बसले नसते, ते ही ट्रेन बर्यापैकी खाली असताना.
आगंतुक
नव्या वर्षाचा हा पहिला महिना. नेमके बोलायचे झाले तर आज एकतीस जानेवारी. गेले तीस दिवस मी प्रचंड दडपणाखाली आहे. केव्हाही काहीतरी अघटीत घडेल अशी भीती आम्हा तिघांनाही सतावते आहे. एकतीस डिसेंबरच्या रात्री 'ती' पार्टी झालीच नसती तर बरं असं आता आम्हा तिघांनाही राहून राहून वाटतं. आम्हा तिघांव्यतिरिक्त त्या पार्टीला हजर असणारा आमचा मित्र रिचर्ड कॅरेक त्यादिवसापासून बेपत्ता आहे आणि त्याचा शोध घेण्याची हिंमत आम्हा तिघांमधेही नाही. त्या दिवशी कॅरेकने सांगितलेली त्याची चित्तरकथा अशक्य कोटीतली वाटेल अशी असली तरी ती पूर्णपणे काल्पनिक आहे असं आम्हा तिघांनाही वाटत नाही.
बुफे,अथवा खड भोजन
भोजन नाही हा जमला बुभुक्षितांचा मेळा ,
आप्त ,स्वजन झाले भोजनासी गोळा ,
भोजनासी गर्दी झाली भारी ,
करती पहा कैसी मारामारी ,
गर्दी करती अन्ना भोवती ,
जैसी गिधाडे भक्षा भोवती ,
कोणी करेना कोणाची पर्वा ,
भ
काव्यरस
व्हेइकल
एसीचा एकसुरी आवाज, आणि हॉटेलच्या खोलीचा पिवळा पंडूरोगी प्रकाश, सेकांदामागून सेकंद, तासामागून तास चालूच..
एकटेपणा शरीरावर चढत जातो शेवाळासारखा. मनावर अंधाराचे थरच्याथर चढत रहातात बुळबुळीत बुरशीसारखे. आतल्याआत आक्रसून जायला होतं, खोल अंधाऱ्या गढूळ पाण्यातल्या कोशातल्या किड्यासारखं.
त्या कोशातल्या अंधारातून बाहेरचं रंगीत जग दिसतं, पण कोश सोडता येत नाही, अनामिक आदिम भीती वाटत रहाते...
एखादा जरी रंगीत कवडसा पडला तरी, एखादा नवखा जीव उत्सुकतेने पाहू लागला तरी, जीव घाबरतो, अजून आक्रसून घेतो आतल्याआत.
तशी हालचाल चालू असतेच, जिवंतपणा असतो, पण तो असतो अतिशय भौतिक, जनावराच्या पातळीवरचा.
नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी
नेपोलियनच्या इजिप्त आणि अन्य देशांच्या स्वार्यांमधून त्याला अगणित सोनेनाणे, जडजवाहिर, अमूल्य कलाकृती आणि दुर्मिळ ग्रंथसंपदा लाभली, हे सर्वविदित आहेच. पॅरीसच्या लूव्र संग्रहात यापैकी बहुतांश वस्तू संग्रहित आहेत. छत्रपती शिवाजी महारांजांचे डच चित्रकाराने रंगवलेले चित्र, हे त्यापैकीच एक.
नेपोलियनच्या पाडावानंतर काही कलाकृती व इतर वस्तू अन्य लोकांच्या हाती लागून त्या आजतागायत पॅरिसमधील विविध पुराणवस्तू विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. गल्ल्या-बोळातील लहान लहान दुकानातूनही केंव्हा कोणती अमूल्य वस्तू आढळेल, हे सांगता येत नाही.
(जयपूर घटनेच्या निमित्ताने) अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी काय करता येईल?
जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं.
जयपूर अपघात
पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही अरेरे मदतीसाठी थांबत नाही.
अतोनात वाईट वाटले. खूप हेल्पलेस. माणूसकी संपली आहे का खरचं असं वाटत आहे. का झालं असावं असं. आणि असं परत होऊ नये म्हणून काय करता येईल. त्यावेळी काय करता येऊ शकलं असतं.
धरण उषाला कोरड घशाला
खिशामध्ये हात घालुन काही तरी खात होता
एका हातात हांडा घेऊन घाईघाईने जात होता
रखरखीत ऊन्हात वहात होत्या घामाच्या धारा
विचारले आम्ही त्याला कुठे जातोयस रे पोरा
त्यानेही अगदी सहजतेने आम्हाला उत्तर दिले
घरी आहेत आई वडिल तहाणेने व्याकुळलेले
कष्ट करुन त्यांना आलेय थोडी कणकण
पाण्यासाठी आमची होतेय अशी वनवन
शेजारच्या गावामध्ये म्हणे टँकर येतोय दोनदा
बघतो तिथे मिळ्तोय का पाण्याचा एखादा हंडा
तसं तर धरण पण आहे आमच्या गावाच्या उषाला
पण म्हणतात ना धरण उषाला अन कोरड घशाला
आमच्या ही बाबतीत असच काही तरी घडलय
धरणातले पाणी शेजारच्या जिल्ह्यांना सोडलय
तुमच तर काय साहेब बिसलेरी बाटलीवर भागत
हांडाभर पाण्यासाठी आम
लहानपण देगा देवा....
बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात ते अगदीच काही खोटं नाही. आणि या काळात सर्वात जास्त सुख मिळतं ते मे महिन्यातल्या किंवा दिवाळीतल्या सुट्टीत गावी गेल्यावर! त्यातल्या त्यात दिवाळीपेक्षा मे महिन्यात मिळणारी लांबलचक सुट्टी मिळाली म्हणजे आनंदाला उधान यायचं फार!! याचं कारण म्हणजे बहुतेक सगळी नातेवाईक मंडळी त्यांच्या कच्च्याबच्च्यांसह या काळात गावी आवर्जून यायची. वार्षिक परीक्षा संपलेली असायची आणि डोक्यावरचं एक मोठ्ठं ओझं आणि मनावचं एक अनामिक दडपण शतपटीने उतरलेलं असायचं.
मिसळपाव