Skip to main content

प्रथमच एक गझल लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखक psajid यांनी मंगळवार, 22/10/2013 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रथमच एक गझल लिहण्याचा प्रयत्न केला आहे. ओढून ताणून आणलेल्या शब्दापेक्षा त्यामध्ये भावना याव्यात या हेतूने लिहलेली माझी ही पहिली गझल आहे. या गझल मध्ये मी ऱ्हस्व - दीर्घ, नुकता, रदीफ किंवा काफिया या पैकी कशाचाही योग्य वापर केला नाही याची मला कल्पना आहे.
काव्यरस

झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे (विडंबन)

लेखक पल्लवी मिंड यांनी मंगळवार, 22/10/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मंगेश पाडगावकरांची माफी मागून झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे ओळखून आहेत सारे , presenty साठी तुझे फक्त येणे भर दुपारी लेक्चर ला, पेंग तुला का यावा लागताच डोळा तुझा, प्रश्न नेमका तुलाच विचारावा तुझ्याच पेंगुळलेल्या डोळ्यांनी तुझ्याशी असा दगा का करावा तुझ्या निर्भत्सनेचा अर्थही तुला न उमगावा फेकलेल्या खडूचा नेमही चुकावा झोपेतल्या बरळण्याला तुझ्या, कोणी आपला अपमान का समजावा घेता छोटी डुलकी तू, अचानक यावा मोठा वारा अन जागी होऊन तू, करावास कुठे आहे मी चा देखावा अन वर्ग सारा हास्य कल्लोळात बुडावा

उन्नाव मध्ये "पिपली लाइव"

लेखक psajid यांनी मंगळवार, 22/10/2013 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा एक प्रगतीशील देश आहे ज्यामध्ये आधुनिक विज्ञान आणि प्राचीन संस्कृतीचा योग्य मिलाप झालेला दिसून येतो. या भूमीला तपस्वी आणि ईश्वरी अधिष्ठान प्राप्त संत महात्मांचा सहवास लाभलेला आहे. या महान संस्कृतीचा पाया हा बऱ्यापैकी श्रद्धेवरती वसलेला आपल्यास पहावयास मिळतो. मात्र काही काही वेळा ही आंधळी श्रद्धा आधुनिक विज्ञानावरती मात करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश मधील उन्नाव मध्ये याचा आता प्रत्यय येतो आहे. या छोट्याश्या गावाला अगदी आमीरखानच्या "पिपली लाइव" चित्रपटासारखे स्वरूप आले आहे.

आला वर्दी - एक अवलिया.

लेखक नानबा यांनी मंगळवार, 22/10/2013 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
hj कलेने माणसं जोडली जातात असं म्हणतात. संगीत हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. जगभरात अनेक प्रकारचं संगीत बनवलं ऐकलं जातं. अगदी रॉक, पॉप, जॅझ सारख्या पाश्चिमात्य संगीतापासून सुफ़ी, हिंदुस्थानी शास्त्रीय पर्यंत कुठलंही संगीत अतिशय श्रवणीय आहे. अर्थात शास्त्रीय बाज आणि प्रगल्भ परंपरा असणा-या हिंदुस्थानी संगीताची जगावर भुरळ पडली नाही तरच नवल. असाच हिंदुस्थानी संगीताची भुरळ पडलेला एक अवलिया म्हणजे आला वर्दी. मुळचा जॉर्डनचा आणि कट्टर संगीतप्रेमी.

तू …. !

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी मंगळवार, 22/10/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे आहेस तू ? काय करतेस आता ? मी इथे अन तू …. तिथे डोळे भरून येतात आणि झुकतो ग माथा न सावरता … कधी… कधी … रोज…. रोज…. येत असेल सय आठवू नकोस असं कसं म्हणू ? आठवणीत सारखा असतो 'तू……. ' दोघांच्याही साथीला आयुष्यभर …. !!

हिंदु धर्म आणि शाप

लेखक उद्दाम यांनी मंगळवार, 22/10/2013 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदु धर्म आणि शाप हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. स्मित शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित. प्रचंड तिरस्कार मनात घेऊन शाप दिल्यास तो कदाचित फळाला येत असावा की काय असे वाटते. पण मग याने शाप देणार्‍याला काही त्रास नसेल का होत? प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा शाप आहे. हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील. मग आपण स्वतःला क्षमाशील / सहिष्णू वगैरे का समजतो ? शापाला उ:शापही असतात का? ते नेमके कुणाकडून घ्यावेत ?

आजकाल हे असे आहे...

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 22/10/2013 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल असे आहे... खेळाडू "अभिनय" करत आहेत *(मँच फिक्सिंग) खेळाडू अभिनय करत आहेत *(बॉलीवूड मध्ये प्रवेश करून, जाहिरातीत) आजकाल हे असे आहे... अभिनेते राजकारणात शिरत आहेत अभिनेते "राजकारण" करत आहेत आजकाल हे असे आहे... राजकारणी जनतेच्या सेवेचा "अभिनय" करत आहेत राजकारणी सत्तेच्या रणांगणावरचे "खेळाडू" बनत आहेत आजकाल हे असे आहे... बातम्या मनोरंजनाचा वारसा चालवत आहेत मनोरंजन रक्तरंजीत अपराधी झाले आहे * (गुन्हेगारी सिरियल्स) आजकाल हे असे आहे... माणुसकी सैतानाच्या तावडीत सापडली आहे! माणुसकी माणसांच्या शोधात भटकते आहे! आजकाल हे असे आहे... गरीबी श्रीमंती यातला पूल जीर्ण झाला आहे गरीबी श्रीमंती य
काव्यरस

टकाटक

लेखक आतिवास यांनी सोमवार, 21/10/2013 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
परारथना झाली की हजरी घेतेत गुर्जी. घरी बसलेल्यांना पकडून आणाया पोरास्नी पळवत्यात. कंदी कामं असत्यात. तळ्यावरनं पाणी आणा; अंगण झाडा; फळा काळा करा. गमभन लिऊन झालं की पाडे. लंबरपरमानं येकेकाला हुबा करतेत. तेनं वरडायचं, “येक रे ..” की आमी “येकाचा”. धापत्तुर. मंग “येकावर येक अकरा”. पन्नासपत्तुर. गुर्जी येकदम बायेर. च्या प्यायाला, तमाकू खायाला. रोजला तेच. म्या पेंगाया लाग्ली. मंगली वराडली, “आन्जे, पाडे म्हन, नायतर गुर्जीस्नी नाव सांगते बग”. शिवाजीम्हाराज समजतेय सोताला. मंगली वराडली, “साहा रे” म्या हळूच “आटाचा” बोल्ली. कुणाला कायबी नाय समजलं.

आज 'तो' राहिला नाही

लेखक आनंदमयी यांनी सोमवार, 21/10/2013 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
यायचे कुठुनसे तेव्हा ढग दाटुन एकाएकी स्पर्शून जायची मजला प्रीतीची लाट अनोखी उधळीत पेटता श्वास 'तो' कवेत मजला घेई परि आर्त क्षणांना तैशा कधि मेघ बरसला नाही..! अन् आज दाटले मेघ ही सांज कोंडली आहे .. अन् आज अधिर श्वासात ही प्रीत मांडली आहे अन् अवचित आज खुळासा नभि मेघहि बरसुन जाई... पण कवेत मजसी घेण्या, आज 'तो' राहिला नाही! © अदिती जोशी 11.6.2013 http://unaadpaus.blogspot.com
काव्यरस

विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 21/10/2013 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो. सुरुवातीला इंटरनेट हे फक्त वाचनीय होते म्हणजे Read-only.