मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज 'तो' राहिला नाही

आनंदमयी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
यायचे कुठुनसे तेव्हा ढग दाटुन एकाएकी स्पर्शून जायची मजला प्रीतीची लाट अनोखी उधळीत पेटता श्वास 'तो' कवेत मजला घेई परि आर्त क्षणांना तैशा कधि मेघ बरसला नाही..! अन् आज दाटले मेघ ही सांज कोंडली आहे .. अन् आज अधिर श्वासात ही प्रीत मांडली आहे अन् अवचित आज खुळासा नभि मेघहि बरसुन जाई... पण कवेत मजसी घेण्या, आज 'तो' राहिला नाही! © अदिती जोशी 11.6.2013 http://unaadpaus.blogspot.com

वाचने 1615 वाचनखूण प्रतिक्रिया 6

एस 22/10/2013 - 00:12
तिसरे कडवे किंचित ओढूनताणून आणल्यासारखे वाटले. बाकी सर्व मस्तच. विशेषतः गेयता व नादोमयता, मीटर चांगले आहे. खूपखूप शुभेच्छा.