आयुर्वेद रुग्णालय सुरु करणे बाबत....
पुण्यामध्ये आयुर्वेद रुग्णालय सुरु करण्याचा विचार करतो आहे,अंदाजे ३००० चौ.मी.जागा उपल्बद्ध होइल असे वाटते आहे. यात पंचकर्माचे दोन सेट अप,फिजिओथेरपी,अक्युपंकचर सेट अप,योगा हॉल्,सहा ते आठ स्पेशल रुम,असा सगळा विचार आहे.
आजपर्यंत पुण्यात खासगी असे एकच आयुर्वेद रुग्नालय आहे,बाकी जी आहेत ती वेगवेगळ्या महाविद्यालयांना सल्लग्न आहेत. ज्यांच्या पिढ्यान पिढ्या आयुर्वेदात गेल्या आहेत अश्या लोकांनीही आजपर्यंत हा विचार केला नाही पण अंगात थोडे सुलेमानी किडे असल्याने हे धाडस करतो आहे,तरी यात काय काय सुधारणा करता येतिल ?
निष्पर्ण
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले,
जिवंतपणाची निशाणी मिटवून माझी मला बोडके करून गेले…
आता वारा त्याला अलगद त्याच्या वाटेवरती घेऊन जाईल,
कुण्या बापुड्या पाखराच्या घरट्याचा ते भाग होईल,
पण मला एकटे करून ते खूप दूर निघून गेले,
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले…
एकटा असलो तरीही मी शोक काही करत नाही,
का करावा शोक जर सांत्वन करायला कोणी नाही,
वाट पहात होतो मरणाची पण तेही पाठ फिरवून गेले,
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले…
एकट्यानेच जर राहायचे असेल तर त्याला जगणेदेखील का म्हणायचे,
साथ देणारे जर कोणीच नसेल तर मग कोणासाठी जगायचे,
मी ज्यांची साथ केली ते मला सोडून
अर्थसंकल्प २०१५
अर्थसंकल्प २०१५ आज संसदेत सादर करण्यात आला. त्यावर विशेष चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे.
खाली सरकारी माहिती चर्चा सुरू करण्यासाठी चिकटवत आहे.
where the rupee comes from, and where it goes to: a quick glance
अर्थसंकल्प कसा वाटला?
प्रत्यक्ष (तात्काळ) आणि अप्रत्यक्ष (दूरगामी) फायदे आहेत का? असले तर काय?
तेच तोट्यांबाबत.
सवंग घोषणा किती आहेत असे वाटले?
वगैरे वगैरे...
अर्थसंकल्प कसा वाटला?
प्रत्यक्ष (तात्काळ) आणि अप्रत्यक्ष (दूरगामी) फायदे आहेत का? असले तर काय?
तेच तोट्यांबाबत.
सवंग घोषणा किती आहेत असे वाटले?
वगैरे वगैरे... अवेळी असे मेघ दाटून येता.....
अवेळी असे मेघ दाटून येता
जुन्या वेदनांनी पुन्हा पाझरावे.
जरी कष्ट झाले विसरण्यास ज्याना
जुन्या त्या क्षणांना पुन्हा आठवावे.....
कितीदा पडावे, कितीदा वहावे
धडे अनुभवांचे किती साठवावे.
किती आर्जवे अन किती ती प्रतीक्षा
किती चातकाने मना समजवावे ....
पुरे ओढ वेडी घनांची अनावर
दुरूनी अता पावसा न्याहळावे..
जपावा मनातील पाऊस थोडा
परी भावनांच्या पुरा थोपवावे....
अवेळी असे मेघ दाटून येता
मनाच्या नभाला जरा आवरावे....
नये
इतके गप्पिष्ट असू नये, माझ्यापाशी बसू नये
हातामध्ये हात घेउनी , नशीब माझे पाहू नये
इतके वेल्हाळ असू नये, माझ्यादारी येऊ नये
नजरेमध्ये नजर मिसळून, ठाव माझा घेऊ नये
इतके जिवलग असू नये, माझ्याठायी वसू नये
श्वासामध्ये श्वास रोधून, अंत माझा पाहू नये
इतके मैत्र असू नये, माझ्याइथे उरू नये
आज आहे, उद्या नाही, नाते माझे जोखू नये !
मराठी भाषा दिन लघुकथा स्पर्धा -निकाल
सप्रेम नमस्कार
मराठी भाषा दिनानिमित्त आपण लघुकथा स्पर्धा आयोजित केली होती.तिला सदस्यांचा छान प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यास आनंद होत आहे.
या स्पर्धेसाठी सदस्यांपैकी स्पा,स्वॅप्स,प्रभाकर पेठकर,इनिगोय, स्पार्टाकस आणि संपादकांमधुन पैसा,लीमाउजेट,अजया,विकास यांनी परीक्षण केले.
परीक्षणाचे थोडक्यात निकष(स्वॅप्स यांच्या शब्दात) पुढीलप्रमाणे:
लघुकथा ही किस्सा आणि कादंबरी यांच्यामधला साहित्यप्रकार म्हणून गणला जातो, तसेच त्याला स्वतंत्र आविष्कार म्हणूनही गणले जाते.
वख्तने किया क्या हसीं सितम
वख्तने किया क्या हसीं सितम
भातुकलीच्या खेळातील राजाराणींची ताटातुट काही नवीन नाही. या विश्वातील व्यापार इतका अतर्क्य, अनाकलनीय, असतो की जे घडत असते ते हताशपणे पहाणे एवढेच माणसाच्या हातात असते. भातुकलीतील लाकडी बाहुल्यांप्रमाणे ! कवी ही घटना कशी हाताळतो हे त्याच्या तरल कल्पनाशक्तीवर, शब्दप्रभुत्वावर, त्याने योजलेल्या कवितेच्या घाटावर, वापरलेल्या शब्दांवर, त्यांच्या चपखलपणावर, अचुकतेवर, काय सांगितले यांपेक्षा काय सांगितले नाही -फक्त सुचवले आहे यांवर अवलंबून असते. तुमचा आक्षेप, " हे तर सर्व कवितांमध्येही अधोरेखितच असते", मान्य आहे.
चांगदेवपासष्टी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)
२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवांना अनेकानेक शुभेच्छा !
माझा मराठाचिये काय बोलु कौतुके ! अमृता तेही पैजा जिंके ! ऐसी अक्षरे रसिके ! मेळवीन !!
मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे/ समृध्दीस्थळे म्हणल्यावर मनात पहिला विचार आला तो माऊलींचाच . संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवदगीतेवर मराठी भाषेतील टीका जी की भावार्थदीपीका अर्थात ज्ञानेश्वरी लिहुन सर्वसामान्य जनांवर जे उपकार केले आहेत त्याचे वर्णन करावे तरी कसे ? जशी जशी ज्ञानेश्वरी वाचत जातो आणि जशी जशी ती उमगत जाते तसे तसे संत ज्ञानेश्वरांना पुरुष असुनही "माऊली" असे का म्हणतात ते कळायला लागते .
मिसळपाव