तरीसुद्धा ...
सारं तसं ठीक आहे संथ जीवन चालले आहे
तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे ।
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
दूर तू गेलीस त्याला एक तप उलटून गेले
पाण्यासारखे क्षण सुद्धा इकडे तिकडे वहात गेले
तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे ।
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
लग्न संसार मुलं-बाळं दोघं गुंतून गेलो आहोत
रुळलेल्या वाटेवरुन खड्डे टाळत चालत आहोत
तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे ।
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
मेघ कधी बरसत नाही , दूर ही निघून जात नाही
सावली देणं टाळत नाही, साथ देणं विसरत नाही
मनाच्या आभाळात होतीस तिथेच तू आहेस
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
विलंब शुल्क.
माझे भ्रंमण संचाचे महिन्याला बील ( देयक) येत असते आणि मी किती पैसे भरायचे हे पाहुन संकेतस्थळाच्या साह्यानेच भरत असतो. यावेळेस नकळतच मी सर्व रकाणे पाहत होतो, उदा. मागचे देयक, भरलेले पैसे, या महिन्याचे देणे, किती तारखेपर्यंत भरावयाला हवे आणि न भरले तर विलंब शुल्क. यात पाहता पाहता माझ्या लक्षात आले की देयक ४०० रुपये होते आणि विलंब शुल्क १०० रु जास्त असे दाखवलेले होते.
सहज सहज हिशोब करता लक्षात आले की अंदाजे २० % विलंब शुल्क म्हणून लावलेले होते, पूर्वीही वीज देणे / दूरध्वनी चे देयक रु.१५० असेल तर ५ / ७ रु विलंब शुल्क असे.
मोबाईल कंपन्या इतके विलंब शुल्क कसे लावु शकतात याचाच मला अचंबा वाटत आहे.
प्रतिशब्द
"मंडेला ऑफिसला जायला खूप बोर होतं यार…"
"यावेळेस दिवाळी कोणत्या डेटला येतेय?"
"अक्खा विक मला ऑफिसमध्ये खूप उशीर झाला… इतका लोड आहे कामाचा. वर्क प्रेशर आहे. सगळेच टेन्शनमध्ये आहेत. "
हि आपल्या रोजच्या बोलण्यातली अगदी साधीसुधी वाक्ये. ऑर डेली लाईफमधली युज्युअल सेंटेंसेस. ह्यात मराठी किती आणि इंग्लिश किती ते पहा. आपल्या कळत नकळत आपण आपल्याच भाषेतले साधे सोपे शब्द बाद करत चाललो आहोत. हे मराठीचं रडगाणं ऐकवायला मी सांगत नाहीये.
मत्कविता चालली ही!
मनवनात पातलीस..
मन्मनात मधुगडबड
मन्मानस-हंसिनीस
हृत्कोमल मधुबडबड!
(मत्कविता चालते ही
आगगाडी जर धडधड
मद्रसिका का करिसि
व्यर्थ अशी ती रडरड ?)
: मिलिंद पदकी
काव्यरस
कुरुडुमळे आणि मुलबागल
कुरुडुमळे हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, बेंगलोरपासून अवघ्या १०० किमीच्या आत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच. कौडिण्य ऋषींनी येथे एका टेकडीवर तपश्चर्या केलली. बेंगलोरहून कोलार आणि तेथून जवळपास तीस किमी हायवेवर जायचे. मुलबागल हायवे सोडून तीन किमीवर आगे. मुलबागालहून कुरुडुमळे अवघ्या आठ किमॆवर आहे..
ह्या गावात एक गणपतीचे आणि एक सोमेश्वराचे मंदिर आहे.
गणपतीची मूर्ती अंदाजे बारा (काहि ठिकाणी चौदा लिहिले आहे) फूट उंचीची असून एका अखंड शाळिग्राम दगडात कोरली आहे. ही मूर्ती किती जुनी आहे ह्याची कुठेही नोंद नाही. चौदाव्या शतकापर्यंत हा गणपती उघड्यार होता.
ढ
ढ
आळस देत मान वर काढता आली असती
जग म्हणजे काय ते बघता आलं असतं
हुशारपणाचं ओझं जरा हलकं झालं असतं
कधी वाटतं ढ असतो तर बरं झालं असतं ||धृ||
पुस्तकांच्या उगाचच राशी जमल्या नसत्या
गणित बिणीत गोष्टी मुळीच गमल्या नसत्या
धरल्या असत्या रोज खपल्या हाता पायांवर
क्रिकेट खोखोच्या मॅचेस रोज रंगल्या असत्या
कट्ट्यावर मग गप्पा मारत बसता आलं असतं ||१||
शाळेपुरतीच नसते हुशारपणाची जोखड
नोकरीमध्ये सुद्धा होत रहाते धडपड
डिग्र्या हव्या, पोझिशन हवी, पैसे हवे नाही का!
हुशार असून वाया गेला लागायला नको शिक्का
तेंव्हा वाटत असून बरंच काही करता येत नसतं ||२||
ढ असणं कधी कधी वरदानच मुळी असतं
तुमच्याक
काव्यरस
हात झाले काळे!
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव बुधवारी कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी म्हणून निश्चित झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २००५ मध्ये कोळसा खाणींचे वाटप झाले होते. कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को समूहास ओडिशातील तालिबारा दोन व तीनमधील खाणींचे वितरण करण्यात आले होते. यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. त्यात मनमोहन सिंग यांना आरोपी करण्यात आले नव्हते. गतवर्षी ऑगस्टमध्ये सीबीआयने सादर केलेला 'क्लोजर' अहवाल न स्वीकारता न्यायालयाने मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्याची सूचना केली होती. या पाश्र्वभूमीवर मनमोहन यांना बुधवारी विशेष न्यायालयाने 'आरोपी' म्हणून समन्स पाठवले.
मिसळपाव