Skip to main content

मित्रा

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 04/09/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
जीवघेण्या बंदुकांच्या फैरी फुटणारे बॉम्ब जीवाच्या आकांताने पळणारे रेफ्यूजी या सार्यांना समजावता येईल रे, पण तू, एका कधीच न संपणाऱ्या समुद्रात निघुन गेलास चिरविश्रांती घेण्यासाठी. तुला कस समजावणार आता !! खैर शांत झोपलेल्या माझ्या छोट्या मित्रा कायम तसाच रहा जिप्सी
काव्यरस

चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (४)

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 04/09/2015 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== भारतभेटीला प्रथमच येणार्‍या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून त्याच्या पत्रांच्या मराठी रुपांतराचा हा प्रयत्न.

तीर्थ

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 03/09/2015 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
तीर्थ कुठले ? इथे कसे? कुणी आणले? काय तो आस्तिक! कोण त्याचा देव? काssssही विचारु नका. तीर्थ घ्या. ठरले एकदा तीर्थ आहे! तर आहे. वाद नको. विचार नको. गंगा काय न् नर्मदा काय.... याच समुद्रात मिसळतात! बसा निवांत. तीर्थ घ्या. बाहेर दंगा आहे फार. जरा मनातच लोळा. आकांत नका मांडू एकांताचा. तीर्थच ठेवा ना उशाला! रात्र टाका पायथ्याला. तीर्थ घ्या. तीर् घ्या.....

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 03/09/2015 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32108 छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: निकाल नमस्कार मंडळी! बाराव्या स्पर्धेचा निकाल जाहीर करायला काही अपरिहार्य कारणाने उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. पाऊस हा तसा सोपा विषय होता मात्र पाऊस कमी झाल्याने की काय कोणजाणे, छायाचित्रे जरा कमी आली. पण तरी काही खूप छान छायाचित्रे बघायला मिळाली. पहिला क्रमांक आला कपिलमुनी यांच्या छायाचित्राचा.

मेडीटेशन्स - चिंतने - मार्कस ऑरेलियस - भाग १

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 03/09/2015 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
"मेडीटेशन / चिंतन " म्हणले की डोळ्यासमोर तीन माणसे आणि त्यांची तीन पुस्तके उभी रहातात : १) मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी - रेने देकार्त ( कार्टेशियन जॉमेट्री फेम ) २) मेडीटेशन्स - मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस ( ग्लॅडीयेटर फेम ) ३) द ऑरेंज बूक ऑफ मेडीटेशन्स - ओशो - आचार्य रजनीश ( संभोगातुन समाधीकडे फेम ) ( पहिल्या काही पानांच्या वाचनावरुन ) देकार्त एकुणच ज्ञान म्हणजे काय ? जाणणे म्हणाजे काय ? असणे म्हणजे काय ?

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादीत पुस्तके सुचवा.

लेखक जेपी यांनी गुरुवार, 03/09/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, या धाग्यावर इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादित पुस्तके सुचवावी ही विनंती. भारतीय लेखकांची इंग्रजीतुन मराठीत अनुवादित पुस्तकेही चालतील. धन्यवाद. प्रतिसादातुन भर टाकेन.

गोव्याची साद - भाग ४ आणि अंतिम.

लेखक किणकिनाट यांनी गुरुवार, 03/09/2015 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याची साद - भाग १ गोव्याची साद - भाग २ गोव्याची साद - भाग ३ ________________________________________________________________________________________ तर आवडत्या समुद्रकिनार्यावरील ३ दिवसांचा आनंददायी मुक्काम संपवून परत उत्तर गोव्याच्या किनार्यांकडे प्रयाण करते झालो. बरेच दिवसात "अँटीक मार्डोळ" रेस्टॉरंटला भेट दिली नव्हती. हे रेस्टॉरंट वेर्णा इंडस्ट्रीयल एरियामधे एन. एच. १७ वरच डी.

अगा ते ब्रम्हकमळ उमलले दारी...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 03/09/2015 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या टेरेसवरच्या छोट्याश्या बागेत अनेक वर्षे एक ब्रह्मकमळाचे (Epiphyllum oxypetallum) रोपटे एक कोपरा पकडून झोपाळू अनामिक सदस्यासारखे चूपचाप पडून आहे. हिमालयात आणि श्रीलंकेत मूळ घर असलेली ही वनस्पती भारताच्या अनेक घरांच्या बागेत रोपट्यांच्या स्वरूपात वाढवली जाते. तिचा भारतापेक्षा थोडा वेगळा प्रकार (Phyllocactus purpusii) मेक्सिको, ब्राझील, इ अमेरिकन खंडातील देशांतही सापडतो. बागेतल्या इतर नखरेल वृक्षवल्लींना सांभाळताना आणि त्यांच्या सुंदर रूपरंगाचे कौतुक करताना या कार्टूनमध्ये रोडरोलर अंगावर जाऊन सपाट झाल्याप्रमाणे दिसणार्‍या बिचार्‍या वनस्पतीकडे बर्‍याचदा लक्षही जात नाही.

कोणी राहत नाही...

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 03/09/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
जाती जन्मतात. जाती शाळेत जातात. जाती प्रौढ़ होतात. जाती जातीशी(च) लग्न करतात. जाती पहिल्या -कधी सोळाव्या रात्री आपल्याच जातीवर चढ़तात. मग अशा रीतीने जाती ..पुन्हा कंटीन्यू होतात. जाती गावा.बाहेरच्या 'म्हारवाड्याला' असतात. --- जाती शहरा.बाहेच्या 'झोपड़पट्टीलाही' असतात. जाती देशा -त्याच्या झेंड्यात असतात. जाती गरीबांच्या कातड्याला कायमचा चिकटलेला सर्वात वरचा 'थर' असतात. जाती अंतयात्रा, जनाज्याला असतात. जाती दंगली. सना-उत्सवालाही असतात. मंदिरा, मशिदी, गुरूद्वारयाला जाती असतात. नेमाटी, दाढी, पगड़ीलाही जाती असतात. जाती रक्षणाला असतात, जाती आरक्षणाला असतात. जाती निवडणुकीला असतात.