मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेडीटेशन्स - चिंतने - मार्कस ऑरेलियस - भाग १

प्रसाद गोडबोले · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"मेडीटेशन / चिंतन " म्हणले की डोळ्यासमोर तीन माणसे आणि त्यांची तीन पुस्तके उभी रहातात : १) मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी - रेने देकार्त ( कार्टेशियन जॉमेट्री फेम ) २) मेडीटेशन्स - मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस ( ग्लॅडीयेटर फेम ) ३) द ऑरेंज बूक ऑफ मेडीटेशन्स - ओशो - आचार्य रजनीश ( संभोगातुन समाधीकडे फेम ) ( पहिल्या काही पानांच्या वाचनावरुन ) देकार्त एकुणच ज्ञान म्हणजे काय ? जाणणे म्हणाजे काय ? असणे म्हणजे काय ? वगैरे मुलभुत प्रश्नांना हात घालतो , मार्कस ची मेडीटेशन्स खर्‍या अर्थाने चिंतन आहे , आणि आमचा ओशो नेहमी प्रमाणेच तुमच्या भाबड्या श्रध्दां-समजुतींना सुरुंग लावत ध्यानाच्या वेगळ्या पध्दती सुचवतो . तीन्ही पुस्तके कित्येक दिवस टेबल / कॉम्पुटर वर पडुन होती , पण एके दिवशी गावडे सरांशी झालेल्या एका चर्चेत मार्कस ऑरेलियस च्या एका चिंतनाचा उल्लेख झाला , पुन्हा एकदा कुतुहल चाळवले गेले आणि पुस्तक वाचायला घेतले ! मार्कस च्या पुस्तकातील सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हा माणुस कोठेच ' उपदेश' केल्याचा आव आणत नाही , रादर , त्याची चिंतने खर्‍या अर्थाने एखाद्या तत्वज्ञाचा स्वतःशीच चाललेला संवाद आहे की जो तुम्हालाही अंतर्मुख करुन जातो ! छोटे छोटे पॅराग्राफ आहेत की जे दिवसभर डोक्यात फिरत रहातात , आणि कदाचित अखंड वाचत चिंतन करत राहिल्यास तुमचे संपुर्ण जीवन बदलुन टाकतील की काय असे वाटत रहाते !! ( खरेतर पुस्तक संपुर्ण वाचुन झाल्यावर लेख लिहायचा विचार करत होतो पण गेले २ -३ दिवसात आलेले महान लेखन पाहुन तो विचार सोडला . =)) येथील ईंग्रजी भाषांतर विकी सोर्स साईट वरुन कॉपी केले आहे . ( मुळ लेखन ग्रीक मध्ये आहे ( लॅटीन नाही ) ) . https://en.wikisource.org/wiki/The_Thoughts_of_the_Emperor_Marcus_Aurelius_Antoninus/Book_I विकी सोर्स वरील लेखन प्रताधिकार मुक्त असते की नाही ते माहीत नाही , तसे नसल्यास अर्थाच सारे इंग्रजी पॅराग्राफ संपादित करावेत अशी संपादकांना विनंती करीत आहे ! शिवाय सर्वच चिंतनांवर लिहायचा विचार नाही , जे भावले त्यावर काहीबाही खरडत आहे . जसे जेवढे तोडके मोडके उमगले तसे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे .... आणि हो , हा चिंतन टाईप च लिहायचा प्रयत्न आहे , चुन कोठे लाल रंगाचा वापर दिसल्यास मोठ्ठ्या मनाने माफ करा.... अधिकार नसता लिहिले ! क्षमा केली पाहिजे !!) _________________________________________________________________________________________

मेडीटेशन्स - चिंतने - मार्कस ऑरेलियस - बूक १

4. From my great-grandfather,[4] not to have frequented public schools, and to have had good teachers at home, and to know that on such things a man should spend liberally. मी माझ्या खापर पणजोबांकडुन मी शिकलो की - कधीही सरकारी शाळात जाउ नका , त्यापेक्षा घरीच चांगले शिक्षक बोलवा , त्यांच्या कडुन शिक्षण घ्या , शिक्षण ही अशी गोष्ट आहे की ज्यावर माणसाने मुक्तहस्ताने खर्च केला पाहिजे! खरेच होम स्कुलींगचा गांभिर्याने विचार केला पाहिजे आहे ! पोरांन्ना सामान्य शाळात पाठवुन म्यॅ म्यॅ करणार्‍या मेंढरांच्या कळपात पाठवण्याला काय अर्थ आहे ? कपडे लत्ते , हॉटेलिंग , दारु पार्ट्या , गाड्या , बिड्या , वगैरे कित्येक गोष्टींवर वायफळ खर्च करताना आपण अजिबात विचार करत नाही मग , ज्ञान , जे की अन्न वस्त्र निवारा पेक्षाही मुलभुत गरज आहे ते प्राप्त करताना आखडता हात का घ्या ? 10. From Alexander[10] the grammarian, to refrain from fault-finding, and not in a reproachful way to chide those who uttered any barbarous or solecistic or strange-sounding expression; but dexterously to introduce the very expression which ought to have been used, and in the way of answer or giving confirmation, or joining in an inquiry about the thing itself, not about the word, or by some other fit suggestion. मी अलेझांडर , वैय्यकरणी , कडुन शिकलो की - सतत चुका शोधण्याचा दृष्टीकोन सोडुन द्या , एखादा बोलताना चुक करत असेलच तर त्याला शांतपणे त्याची चुक समजावुन द्या , समोरचा बोलण्यात कसा चुकला ह्यावर लक्ष देण्या पेक्षा त्याने जी काही इन्क्वायरी केली आहे त्याला उत्तर द्या , त्यातल्या व्याकरणाच्या चुकीकडे दुर्लक्ष करा ! 13. From Catulus,[12] not to be indifferent when a friend finds fault, even if he should find fault without reason, but to try to restore him to his usual disposition;... मी कॅटॅलस कडुन शिकलो की - मित्राने जर एखादी चुक दाखवुन दिली तर त्या कडे कधीही दुर्लक्ष करु नका , जरी तो मित्र विनाकारण चुक काढत असेल तरीही !! ह्या सार्‍या कडे दुर्लक्ष करुन मित्राचा विश्वास परत प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. 17. To the gods I am indebted for having good grandfathers, good parents, a good sister, good teachers, good associates, good kinsmen and friends, nearly everything good. देवा , मी तुझा मना पासुन आभारी आहे की तु मला इतके चांगले आज्जी आजोबा , आई वडील , भाऊ बहीण , शिक्षक , सल्लागार , नातेवाईक आणि मित्र , जवळपास सर्वच इतके उत्तम दिलेस ! _____________________/\_________________

मेडीटेशन्स - चिंतने - मार्कस ऑरेलियस - बूक २

1. Begin the morning by saying to thyself, I shall meet with the busybody, the ungrateful, arrogant, deceitful, envious, unsocial. All these things happen to them by reason of their ignorance of what is good and evil. But I who have seen the nature of the good that it is beautiful, and of the bad that it is ugly, and the nature of him who does wrong, that it is akin to me; not [only] of the same blood or seed, but that it participates in [the same] intelligence and [the same] portion of the divinity, I can neither be injured by any of them, for no one can fix on me what is ugly, nor can I be angry with my kinsman, nor hate him. For we are made for co-operation, like feet, like hands, like eyelids, like the rows of the upper and lower teeth.[1] To act against one another, then, is contrary to nature; and it is acting against one another to be vexed and to turn away. प्रत्येक दिवसाची सुरुवात करताना मनाला म्हण की - आज मी एकदम कृतघ्न , खोटारड्या , मत्सरी , फसव्या , गर्विष्ठ् असामाजिक अशा लोकांन्ना भेटणार आहे ! जे लोक असे आहेत ते असे आहेत कारण त्यांन्ना सत्याचे आणि असत्याचे , चांगल्याचे अन वाईटाचे ज्ञान नाही , पण मी , की ज्याला सत्याचे स्वरुप लक्षात आलेले आहे की जे नितांत सुंदर आहे आणि असत्याचे स्वरुप लक्षात आहे की अत्यंत घाण आहे , त्याच मला हेही लक्षात आले आहे की जो असे वाईट वागत आहे त्याचे स्वरुप हे माझ्याशीच सलग्न आहे , माझ्या शिवाय भिन्न नाही ! फक्त रक्ताच्याच नात्याने नव्हे तर जो दैवी अंश माझ्यात आहे तोच त्याच्यातही आहे ह्या नात्याने ! आणि म्हणुनच तो माणुस माझे काहीच नुकसान करु शकत नाही आणि मीही त्याच्यावर रागावु शकत नाही किंव्वा त्याचा द्वेषही करु शकत नाही . आपले दोघांचेही अस्तिव एकामेकाच्या सहकारासाठी आहे जसे की दोन हात दोन पाय दोन डोळे अत्यंत हार्मनी मध्ये काम करत असतात तसे ! एकामेकांच्या विरोधात काम करणे अनैसर्गिक आहे तसेच एकामेकांच्या हार्मनी शिवाय काम करणेही अनैसर्गिक आहे !! विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव | सुख दु:ख जीव भोग पावे || 5. Every moment think steadily as a Roman and a man to do what thou hast in hand with perfect and simple dignity, and feeling of affection, and freedom, and justice, and to give thyself relief from all other thoughts. And thou wilt give thyself relief if thou doest every act of thy life as if it were the last, laying aside all carelessness and passionate aversion from the commands of reason, and all hypocrisy, and self-love, and discontent with the portion which has been given to thee. Thou seest how few the things are, the which if a man lays hold of, he is able to live a life which flows in quiet, and is like the existence of the gods; for the gods on their part will require nothing more from him who observes these things प्रतेक क्षणी विचार कर , एक रोमन म्हणुन , एक माणुस म्हणुन - जे कर्म तुमच्या हातात आहे ते अत्यंत पर्फेक्शनने , आदराने स्वतंत्रपणे , प्रेमाने न्यायाने आणि सर्वात महत्वाचे की संपुर्ण एकाग्रतेने कोणत्याही दिस्ट्रॅक्ट्शन शिवाय , पार पाडले पाहिजे . आयुश्यातील प्रत्येक क्षण असा जग की जणु काही तो आयुष्याचा अंतिम क्षण आहे निष्काळजी पणा दुर सारुन , अहंकार स्वार्थ विरोधाभास दुर सारुन , केवळ तर्काला धरुन आणि सर्वात महत्वाचे की जे कर्म हाती आले आहे त्याविषयीची अतॄप्तीची भावना दुर सारुन ! आणि मग लक्षात येईल की साधे सोपे आयुष्य जगण्या साठी किती कमी गोष्टींची गरज असते ते ! अशा प्रकारे आयुष्य जगणार्‍या माणसांकडुन प्रत्यक्ष देवांनाही अजुन कसलीच अपेक्षा रहात नाही !! नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्चमानवः ।आत्मन्येवच सन्तुष्टस्तस्य कार्यंनविद्यते॥ नैवतस्यकृतेनार्थो नाकृतॆनेहक्श्चन । नचास्यसर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः ॥ तस्मादसक्तःसततं कार्यंकर्मसमाचर।असक्तोह्याचरन् कर्म परमाप्नोतिपूरुषः॥ 6. Do wrong[2] to thyself, do wrong to thyself, my soul; but thou wilt no longer have the opportunity of honoring thyself. Every man's life is sufficient.+ But thine is nearly finished, though thy soul reverences not itself, but places thy felicity in the souls of others. अत्मघात मित्रा , अत्मघात करत आहेस तु स्वतःला ! पण आता तुला हे जास्त काळ करायची संधी मिळणार नाही , प्रत्येकाचे आयुष्य पुरेसे आणि मर्यादित असते ... आणि तुझे तर जवळपास संपत आलेले आहे पण अजुनही तु स्वतःच्या आत्म्यात आनंद शोधत नाहीयेस अजुनही तुझी वृत्ती अंतर्मुख नाहीये अजुनही तुला इतरांच्याच आनंदावर वेळ घालवणे महत्वाचे वाटत आहे ! उध्दरेत आत्मना आत्मानं नात्मानंवासादयेत ।आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः || 8. Through not observing what is in the mind of another a man has seldom been seen to be unhappy; but those who do not observe the movements of their own minds must of necessity be unhappy. दुसर्‍यांच्या मनात काय चालले आहे हे न ओळखणे हे बर्‍याच वेळा दु:ख्खाचे कारण असु शकते , पण जे स्वतःच्याच मनात डोकावुन पहात नाहीत ते तर नक्कीच दु:ख्खी असतात !! 14. Though thou shouldest be going to live three thousand years and as many times ten thousand years, still remember that no man loses any other life than this which he now lives, nor lives any other than this which he now loses. The longest and shortest are thus brought to the same. For the present is the same to all, though that which perish is not the same; and so that which is lost appears to be a mere moment. For a man cannot lose either the past or the future: for what a man has not, how can any one take this from him? These two things then thou must bear in mind; the one, that all things from eternity are of like forms and come round in a circle, and that it makes no difference whether a man shall see the same things during a hundred years, or two hundred, or an infinite time; and the second, that the longest liver and he who will die soonest lose just the same. For the present is the only thing of which a man can be deprived, if it is true that this is the only thing which he has, and that a man cannot lose a thing if he has it not ! समजा , कल्पना कर की तु हजार किंव्वा त्याही पेक्षा जास्त... दहाहजार वर्ष जगणार आहेस , पण तरी माणुस हा कायम स्वतःचेच आयुष्य गमावत असतो जो ते सध्या जगत आहे ( आणि ठरवले तरी तो दुसर्‍यांचे आयुष्य गमावु शकत नाही ) आणि म्हणौनच असे मोठ्ठे आयुष्य काय की अगदी छोटे आयुष्य काय , दोन्ही समानच आहेत ! दोन्ही आयुष्यात "अत्ताचा क्षण " हा समानच आहे ! आणि म्हणुनच आपण जे गमावत आहोत तो केवळ एक क्षण आहे अत्ताचा ( की जो २००० वर्षांपुर्वी मार्कस ने लिहिताना गमावला आणि अत्ता जो मी टायपिंग करताना गमावत आहे आणि तुम्ही वाचताना गमावत आहात ! ) जोक्षण हातातुन निघुन गेला किंव्वा जो क्षण अजुन आलेलाच नाही तो गमावणे शक्य नाही माणसाने दोन गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत की - अनंत भासणार्‍या सार्याच गोष्टींचे स्वरुप समान आहे भले ते माणसांच्या लक्षात येवो न येवो आणि दुसरे की असे चिरंजीव जगणारा आणि अत्यंत अल्प स्वल्प जगणारा दोघेही समानच गोष्ट गमावत आहेत ! कारण " अत्ताचा क्षण " ही कच गोष्ट माणसाच्या हातातुन हिरावली घेतली जाऊ शकते कारण तीच एक गोष्ट आहे की जी माणसाच्या हातात आहे ! जी गोष्ट तुमच्या हातातच नाही ( भुतकाळ आणि भविष्य काळ ) ती तुमच्या हातातुन कशी बरे हिरावुन घेता येईल !!! ________________________________________________मर्यादेयं विराजते _____ Enough for the day ! ( क्रमशः )

वाचने 8080 वाचनखूण प्रतिक्रिया 47

सतिश गावडे 03/09/2015 - 23:48
मार्कस ऑरेलियस हा इसवी सणाच्या दुसऱ्या शतकात होऊन गेलेला स्टोइसिझम या ग्रीक तत्वज्ञान शाखेतील तत्वज्ञ. खरं तर तो एक ग्रीक सम्राट होता, दिवसा युद्ध करणारा आणि रात्री चिंतन करणारा. स्वताचा स्वत:शीच संवाद करणारा. याच संवादाची त्याने दैनंदिनी स्वरूपात नोंद केली. काळाच्या ओघात काही नोंदी गहाळ झाल्या. ज्या उरल्या त्या नोंदी म्हणजे आज उपलब्ध असणारे मेडिटेशन्स.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 07/09/2015 - 17:28
मार्कस हा रोमन सम्राट होता, ग्रीक नव्हे. बाकी तत्त्वज्ञानाचे तूर्त अध्ययन नसल्याने ही पोचपावती फक्त. सकृद्दर्शनी रोचक वाटते आहे.

प्यारे१ 03/09/2015 - 23:59
वाह! वाचून एक प्रकारची शांतता मनाला लाभली. थोडीशी बोजड वाटते भाषा पण वर्थ इट. माणूस होण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकायला मिळतंय. गावडे सर आणि प्रगो,अत्यंत आभार.

अर्धवटराव 04/09/2015 - 03:52
प्यारे भौंनी खास रेकमेण्ड केला हा धागा. सहज चाळायला म्हणुन घेतला आणि खरच खुप आवडला. सर्वात महत्वावं म्हणजे उगाच आध्यात्माच्या अंगाने न जाता कॉमनसेन्स अपील करणारे विचार आहेत ( इतक्या साध्या सुंदर विषयाची इथे वाईट वाट लागायची पुर्वी ) पु.भा.प्र. ( इंग्रजी वाचायचा कंटाळा येतो. मराठीत कोणि असं भाषांतर करुन दिलं तर सोने पे सुहागा :) )

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ 04/09/2015 - 03:58
मुद्दाम सांगितलो. अध्यात्माची 90% तयारी या सामान्य ज्ञान मध्ये असते. पर्सनॅलिटी डेवलपमेंट आणि मॅनेजमेंट वगैरे विषयामध्ये आपला बराच वेळ जातो. एकदा ते मुद्दे पक्के झाले की Q1,Q3 चे क्वाड्रेन्ट फिक्स झाले की रिकामा वेळ मोकळा वेळ मिळतो. जो सर्वस्वी आपला असतो मग काय, भिड बाप्पू!

नाखु 04/09/2015 - 09:29
अम्हा अडाण्यांसाठी मायमराठीत अनुवादल्याबद्दल विशेष आभार. वाखु साठवली आहे ! वाफाळता चहा आणि असे तत्वज्ञान फुरसतीत आणि सावकाश घ्यावे असे मुवींच्या "बाबा-प्रवचनात" वाचले आहे. मंडळ पंखा नाखु

नीलमोहर 04/09/2015 - 10:22
" अखंड वाचत चिंतन करत राहिल्यास तुमचे संपुर्ण जीवन बदलुन टाकतील की काय असे वाटत रहाते !!" १००% सहमत, खूपच छान विचार आहेत, खरोखर मनावर घेऊन आचरणात आणले तर रोजच्या जगण्यातील बरेच प्रश्न सुटतील आणि आयुष्य सहज सोपे होऊन जाईल.

In reply to by नीलमोहर

सुबोध खरे 04/09/2015 - 12:03
अखंड वाचत चिंतन करत राहिल्यास मग "जगायचं" कधी ? जाऊ द्या. या तत्वज्ञानात काही आपलं मन रमत नाही. हो. आपली पट्टी काळी दोन. उगाच पांढरी पाच मध्ये गायचा प्रयत्न कशाला करायचा? मित्र बित्र जमवून मिसळ खा तर्री प्या भाजलेल्या घशावर आइस क्रीम कुल्फी मलई खा आणि बुड वर करून थंड झोपा यातच आमचा परमोच्च आनंद आहे.

In reply to by सुबोध खरे

द-बाहुबली 04/09/2015 - 13:44
मित्र बित्र जमवून मिसळ खा तर्री प्या भाजलेल्या घशावर आइस क्रीम कुल्फी मलई खा आणि बुड वर करून थंड झोपा यातच आमचा परमोच्च आनंद आहे.
अगदी हेच म्हणतो मी आता लिहायच्या फंदात पडत नाही उगा तो प्रतिसाद अद्रुश्य होइल की काय अशी काल्पनीक भिती वाटते.

In reply to by सुबोध खरे

नीलमोहर 04/09/2015 - 15:09
"मार्कस च्या पुस्तकातील... अखंड वाचत चिंतन करत राहिल्यास तुमचे संपुर्ण जीवन बदलुन टाकतील की काय असे वाटत रहाते " - असा त्या वाक्याचा पूर्ण संदर्भ आहे. अखंडचा अर्थ एवढा शब्दशः नाही घ्यायचा हो, जमेल तसं,जमेल तेवढं करत रहायचं एवढंच. जगणं सोडत नसतंच कोणी, ते तसंही चालू असतंच. वाचन चिंतन हा देखील जगण्याचा भागच आहे. अर्थात 'जगणं' या गोष्टीची प्रत्येक व्यक्तिची व्याख्या वेगळी असते. कसंही करून आपले ज्ञान वाढवणे, स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणणे इ. गोष्टींमध्ये रस आहे त्यामुळे या गोष्टी पटतात एवढंच. बायदवे आईसक्रीम खात खात वाचणे हा आवडता छंद आहे. :)

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 04/09/2015 - 11:29
अरेच्चा हे वाचायचं राहुनच गेलं होतं तत्वज्ञान विषयीचे लेख वाचायला सहसा खुप कंटाळा येतो पण हा लेख वाचताना तसं काही वाटलं नाही.
जरी तो मित्र विनाकारण चुक काढत असेल तरीही !! ह्या सार्‍या कडे दुर्लक्ष करुन मित्राचा विश्वास परत प्राप्त करण्याचा प्रयत्न करा
हे तर काही दिवसापुर्वीच अनुभवले होते. दुसरा भाग लिहिला आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रसाद गोडबोले 04/09/2015 - 12:20
दुसरा भाग लिहिला आहे का?
हो . मुळ पुस्तकात टोटल १२ बूक्स आहेत , जसे जसे वाचत जाईन आणि समजत जाईल तसे तसे लिहित जाईन ! सर्वांचे मनापासुन आभार :)

यमन 04/09/2015 - 11:41
बुद्धीदारिद्रया मुळे चार वाक्य पुढे परत तीन वाक्य मागे असं होतेय . पण ह्या विषया वर माहिती करून घ्यायला नक्की आवडेल .
जे कर्म तुमच्या हातात आहे ते अत्यंत पर्फेक्शनने , आदराने स्वतंत्रपणे , प्रेमाने न्यायाने आणि सर्वात महत्वाचे की संपुर्ण एकाग्रतेने कोणत्याही दिस्ट्रॅक्ट्शन शिवाय , पार पाडले पाहिजे . आयुश्यातील प्रत्येक क्षण असा जग की जणु काही तो आयुष्याचा अंतिम क्षण आहे
हा विचार इतका प्राचीन आहे आणि इतक्या जुन्या काळापासुन यावर गंभीर चिंतन होत आहे हे वाचुन आश्चर्य वाटले. आपल्या वर्तमान काळातील क्रीयेत तल्लीनता साधणे ही फार सुंदर बाब आहे. वरील बाब आधुनिक पॉझीटीव्ह सायकॉलॉजी चा एक महत्वाचा टॉपिक आहे. त्याला फ्लो या नावाने संबोधले जाते. Mihaly Csikszentmihalyi यांनी या विषयावर अनेक वर्ष गहन अभ्यास करुन फ्लो द सायकॉलॉजी ऑफ ऑप्टीमल एक्सपेरीयन्स नावाचे अप्रतिम पुस्तक लिहिलेल आहे. वर्तमानातील कृत्यात गढुन जाणे एक सुंदर तरल तल्लीनता फ्लो साधणे हे कीती महत्वाचे आहे ते कसे साध्य करता येते. फ्लो चा काय परीणाम होतो आदि बाबी फार सुंदर रीतीने त्यांनी उलगडुन दाखवल्या आहेत. फ्लो म्हणजे मात्र फक्त एकाग्रता नव्हे तर त्या सहीत इतर बरेच काही त्यात येते. वरील लेखातील तत्ववेत्याच्या लिखाणातुन ही तसेच जाणवत आहे. मात्र इतक्या प्राचीन काळात इतका प्रगल्भ विचार म्हणजे रोचक बाब आहे. फ्लो मध्ये टाइमसेन्स बदलतो अनेक तास घालवले तरी फारच थोडा वेळ गेला असा प्रत्यय फ्लो मध्ये काम करत असलेल्या व्यक्तीला येत असतो, सेल्फ कॉन्शसनेस हि सकारात्म्करीत्या विरुन जातो. आपणही आपल्या जीवनात सहसा आपल्या आनंदविषयात अशी तल्लीनता अनुभवतो. हि तल्लीनता सातत्याने साधण्याचा प्रयत्न आनंददायी असतो. विकीपेडीया वरील फ्लो या संकल्पने वरील लेख ही सुंदर आहे. एकदा वाचुन बघावा. यातील दुसरा मुद्दा डिस्ट्रॅक्शन चा हा देखील अत्यंत कळीचा मुद्दा सध्याच्या वर्तमान काळात झालेला आहे. आपल अटेन्शन हे कीती वेगवेगळ्या मार्गांनी वेधल जात आहे. व त्याचा किती वाइट परीणाम आपल्या मनावर होत असतो. याचा सुंदर उहापोह नुकताच एका पुस्तकात वाचला याचे नाव द वर्ल्ड बियॉन्ड युवर हेड ऑन बिकमींग इंडीव्हीज्युअल इन अ‍ॅन एज ऑफ डिस्ट्रॅकशन -मॅथ्यु बी क्रॉफर्ड. यात लेखक म्हणतो की जशी हवा पाणी हे मुलभुत रीसोर्सेस आहे तसेच आपल अवधान आपल अटेन्शन हे देखील एक व्हॅल्युएबल रीसोर्स आहे आणि या इंडीव्हीज्युअल अटेंन्शन वर सातत्याने मार्केट चा जाहीरातींचा मारा करुन आजच्या आधुनिक जगात कशा पद्दतीने डिस्ट्रअ‍ॅक्शन केल जात आहे आदि फार प्रत्ययकारकतेने दाखवलेल आहे. या सततच्या डिस्ट्रॅक्शन चा मनावर येणारा ताण, कमी झालेला पेशन्स आदि बाबी नंतर सर्वात शेवटी त्यावर चा उपाय ही उलगडुन दाखवलेला आहे. त्यात तो स्कील्स डेव्हलपमेंट वर भर देतो. १-https://en.wikipedia.org/wiki/Flow_%28psychology%29 २-http://www.matthewbcrawford.com/new-page-1-1/ यावर नंतर सविस्तर लिहीतो.

द-बाहुबली 04/09/2015 - 13:48
आयुश्यातील प्रत्येक क्षण असा जग की जणु काही तो आयुष्याचा अंतिम क्षण आहे
अतिशय बिंडोक अवास्तव विधान आहे हे. समजा मला हा क्षण खराच शेवटचा आहे हे काही जादुमुळे जर लक्षात आले तर मी जे काही करेन ते कधीही प्रत्येक क्षण शेवटचा मानुन जगताना करुच शकणार नाही. मानणे आणी असणे यात जमीन आसमानचे अंतर असते... बर्‍याच ठीकाणे हा फंडा मारलेला असतो तद्दन पुस्तकी अन तकलादु. :(

In reply to by द-बाहुबली

अर्धवटराव 04/09/2015 - 19:58
याठिकाणी शेवटचा क्षण म्हणजे द ओन्ली मोमेण्ट असा घ्यायचा असतो, द लास्ट मोमेण्ट म्हणुन नाहि ( असं मला वाटतं )

In reply to by अर्धवटराव

द-बाहुबली 05/09/2015 - 17:34
द ओन्ली मोमेंट... हम्म असा क्षण पकडणं खरच अवघड. आणी तो जगत राहणे म्हणजे निव्वळ आंतरिक मौनच. मी स्वतः प्रॅक्टीकली एक दिवस शेवटचा दिवस म्हणून जगुन बघायचा मनःपुर्वक निर्धार व प्रयत्न केला अन इतका खर्च करुन बसलो की... तो दिवस शेवटचा असता तर बरे झाले असते म्हणायची पाळी अख्खा महिना आली. तेंव्हा पासुन प्रत्येक क्षण असा जगा की तो शेवटचा आहे म्हटलं की किव करावीशी वाटते. जर्जर अथवा भ्रमिष्ट लोकच हे करु शकतात ज्यातुन प्रचंड उर्जा व तिचा व्यय या पलिकडे काही हाती येते असे वाटत नाही. पण तुमचे विवेचन जास्त योग्य वाटत आहे.

In reply to by द-बाहुबली

आनन्दा 10/09/2015 - 18:51
वस्तुतः "शेवटचा दिवस"चा अर्थ सोपा आहे. मी जर उद्या जगात नसेन तर माझ्यावाचून जगाचे काही अडलेले नसावे. आणि आत्ता जरी मला मरण आले तरी मी अत्यंत तृप्ततेने मरणाला सामोरे जाईन अशी माझी तयारी असावी असे अभिप्रेत आहे. त्यामुळे जर तुम्ही खरेच शेवटचा दिवस पाळायला सुरुवात केलीत तर तुम्ही अत्यंत व्यवस्थित आणि नियोजनबद्ध वागाल. कारण तुम्हाला प्रत्येक क्षण "पूर्ण" जगायची सवय लागेल.

सुबोध खरे 04/09/2015 - 20:39
आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आपला वाढदिवस आहे आणी आपल्या वार्षिक सुट्टीचा(ANNUAL LEAVE) शेवटचा दिवस आहे असे जगा असे आमच्या सरांनी शिकवले. चांगले कपडे मी बर्याच वेळेस काहीही कारण नसताना घालतो. कुणाच्या लग्नाला जाताना माझ्याकडे कडक नवा शर्ट नसतो असे माझ्या बायकोचे म्हणणे आहे. पण दुसर्याच्या लग्नाला आपण का कडक कपडे घालावे हा प्रश्न तिला निरुत्तर करतो. रोज एखादा सुगंध लावूनच दवाखान्यात जातो. आयुष्य हा एक सण आहे आणी तो साजरा करायला शिका.

प्रचेतस 04/09/2015 - 21:06
कशी काय वाचवतात राव असली जड जड पुस्तकं तुम्हाला. आम्हाला तर असले तत्वज्ञान झेपतच नाही. साक्षात भगवद्गीता सुद्धा महाभारताचा एक लहानसा भाग म्हणूनच आमच्या वाचण्यात येते.

In reply to by प्रचेतस

प्रसाद गोडबोले 07/09/2015 - 12:25
कशी काय वाचवतात राव असली जड जड पुस्तकं तुम्हाला
वल्ली तात्या , आम्हाला तरी ह्यात काही जड दिसत नाही . सोप्पे तर आहे ... थोडे समराईझ करतो ... १) पोरांन्ना शाळेत शिकवण्या पेक्षा घरीच चांगले शिक्षण दिले पाहिजे २)दुसर्‍याच्या चुका शोधण्या पेक्षा त्याचा मुद्दा समजुन घेतला पाहिजे . ३) मित्राने टिका केली तरी त्यावर न रागावता शांतपणे त्यावर विचार केला पाहिजे ४)आई वडील नाते वाईक मित्र गुरु ह्यांच्या विषयी कायम आदर भाव ठेवला पाहिजे . ५)दुसरा माणुस कितीही वाईट वागत असला तरीही आपण वाईट वगले नाही पाहिजे , त्याच्या विषयी सहानुभुती धारण केली पाहिजे ६)कोणतेही काम करताना संपुर्ण एकाग्रतेने केले पाहिजे ७)दुसर्‍याच्या आयुश्यात डोकावण्या पेक्षा स्वतःच्या आयुष्यावर आनंदावर लक्ष एकाग्र केले पाहिजे ८)आणि आयुष्यात जो जो काही क्षण आपण जगत आहोत तो पुर्ण पणे मनापासुन जगला पाहिजे !! आता ह्यातील ९०% गोष्टी तर आपणही करत असतोच की ! ह्यात अवघड काय आहे ? फक्त अचुक शब्दां मध्ये लिहायचे झाले तर भाषा जरा किचकट होते इतकेच ! असो ... आमचे अपले निरर्थक अत्मरंजन ! अवांतर :ह्यावरुन आठवले , लहानपणापासुन आपल्याला शिकवले जाते की १ हा शुन्या पेक्षा मोठ्ठा आहे , १ > ० ....पण this statement requires proof , as "1" , ">" , "0", all are just symbols !! हे पहा प्रूफ : https://answers.yahoo.com/question/index?qid=20090208193402AAY9ZWH =))))

In reply to by प्रचेतस

प्रसाद गोडबोले 07/09/2015 - 15:13
ही समरी अगदी 'निसो' स्टाइल झाली असं वाटत नाही का?
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ? =)) बाकी असाच लोभ असु द्यावा - प्रगो

कैलासवासी सोन्याबापु 04/09/2015 - 21:40
लोकं सेल्फ हेल्प बुक्स का वाचत असावेत? ते ही एकदम savy शिव खेरा अन ऑल अमच्यामते जगातले सर्वात पहिले सेल्फ हेल्प बुक म्हणजे सार्थ दासबोध

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

द-बाहुबली 05/09/2015 - 17:44
लोकं सेल्फ हेल्प बुक्स का वाचत असावेत? ते ही एकदम savy शिव खेरा अन ऑल
मलाही सेल्फ हेल्प बुक प्रकरण कधीच झेपले नाहीये. लेखकाची तुंबडी भरायची. अन जोपर्यंत पुस्तक खाळी ठेवत नाही तोपर्यंत जगातल्या अद्भुत ज्ञानाची गुरुकिल्ली आपल्याला मिळाली या हर्षोन्मादात पाने वाचुन काढायची आता आपले आयुष्य बदलणार याची कल्पना करायची अन.. पुस्तक संपल्यावर पहिल्याच आठवड्यात लक्षात येते सगळाच भास. पुस्तकातिल फंड्याने आपल्या आयुष्यात काही घंटा फरक पडत नाही... सर्व काही जिथले तिथेच आहे... आपण स्वतःला नक्किच सेल्फ हेल्पने बदलु शकत नाही मग आयुश्य कशाला बदलेल घडेल... मग हळु हळु लक्षात आलं की माझा हा विचार वास्तव आहेच पण तुमच्या माझ्यतच एक शिवखेरा, सुंदर पिचाइ, मोदी, ओबामा, ब्रुस ली , बुध्द, अंबानी दडलेले असु शकतात एखाद्या पुस्तक वाचनाने ज्यांच्यात जे आधिच विकसीत होत आहे ते स्पार्क/ इग्नाइट होणे इतकाच या पुस्तकांचा उपयोग असतो, ज्यांच्यात ते नाही त्यांना या पुस्तकातुन कसाअच फरक पडत नाही... म्हणूनच ही पुस्तके छापली जावीत अन त्यात दासबोध, ज्ञानेश्वरी, शिवचरीत्र, हुमुव्ड माय चिज, रिच डॅड पुअर डॅड असा फार भेदाभेद करणे व्यर्थ आहे. हे इग्नाइट होणे मह्त्वाचे.. कारण कर्मफलाप्रमाणे** प्रत्येकजण स्वतःचे नशीब घेउन आला आहे नाहि का ?

In reply to by जेपी

पैसा 07/09/2015 - 16:10
कमीत कमी शब्दात मोठी प्रतिक्रिया! आता संक्षिप्त 'मेडिटेशन्स' वाचताना हे सगळं "अवघड आहे" असंच वाटलं. वाचायला खूप छान. पण आपण प्रत्यक्षात यातलं किती करू शकतो?

सुबोध खरे 07/09/2015 - 13:37
१) पोरांन्ना शाळेत शिकवण्या पेक्षा घरीच चांगले शिक्षण दिले पाहिजे २)दुसर्‍याच्या चुका शोधण्या पेक्षा त्याचा मुद्दा समजुन घेतला पाहिजे . ३) मित्राने टिका केली तरी त्यावर न रागावता शांतपणे त्यावर विचार केला पाहिजे ४)आई वडील नाते वाईक मित्र गुरु ह्यांच्या विषयी कायम आदर भाव ठेवला पाहिजे . ५)दुसरा माणुस कितीही वाईट वागत असला तरीही आपण वाईट वगले नाही पाहिजे , त्याच्या विषयी सहानुभुती धारण केली पाहिजे ६)कोणतेही काम करताना संपुर्ण एकाग्रतेने केले पाहिजे ७)दुसर्‍याच्या आयुश्यात डोकावण्या पेक्षा स्वतःच्या आयुष्यावर आनंदावर लक्ष एकाग्र केले पाहिजे या पहिल्या सात गोष्टी जमल्या असत्या तर आम्ही संतपदालाच नसतो का पोहोचलो? काय राव तुम्ही पण? मग हे तुमचे प्रवचन वाचायची आवश्यकता पडली असती का? ८)आणि आयुष्यात जो जो काही क्षण आपण जगत आहोत तो पुर्ण पणे मनापासुन जगला पाहिजे !! हां, ही आठवी गोष्ट मात्र पटली आणि ती करत असल्यानेच आयुष्य सुखात जात आहे.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद गोडबोले 07/09/2015 - 14:00
हे तुमचे प्रवचन
सर्वप्रथम , मी कोणतेही प्रवचन देत नाहीये . मार्कस ऑरेलियस ने ही जेव्हा मेडीटेशन्स लिहिली तेव्हा ती त्याची वैयक्तिक डायरी होती जाचे नाव "टू मायसेल्फ " असे होते . मी देखील कोणी तरी माझे लेखन वाचावे अन माझे कौतुक करावे म्हणुन लिहित नाहीये . तसे असते तर लेखनाची सुरुवात " मी बोटीवर होतो तेव्हा " अशी केली असती मी =)))) कोणालाही लेखन वाचावे असे आग्रहाचे निमंत्रण नाही , वाचायचे असल्यास वाचा , आवडले तर सोडुन द्या , नाही आवडले तरीही तद्दन बकवास म्हणुन सोडुन द्या , मला काही फरक पडत नाही कारण इदं न मम , आणि ज्युपिटरवासी मार्कसलाही काही फरक पडत नाही आणि तो आज जिवंत असता तरीही फरक पडला नसता !!! 6. Do wrong to thyself, do wrong to thyself, my soul; but thou wilt no longer have the opportunity of honoring thyself. Every man's life is sufficient.+ But thine is nearly finished, though thy soul reverences not itself, but places thy felicity in the souls of others. आपल्या हेही लक्षात आले असेल की मी मोजक्याच लोकांन्ना प्रतिक्रिया देत आहे कारण ते मला विचार करायचा वेगवेगळ्या डायमेन्शन्स दाखवत आहेत ... आपणाला प्ररिक्रिया ह्या साठी दिली की आपणही विचार करायची अजुन एक डायमेन्शन दाखवली आहे , माझ्या अल्पस्वल्प अभ्यासानुसार त्याला एपिकुरेनियनिझम असे म्हणतात , ह्या बाजुने आधी बर्‍याचवेळा आणि अत्ता परत एकदा विचार केल्यानेंतर मला जाणवले आहे की मला ह्या डायमेन्शन ने विचार करण्यात रस नाही ... इथुन पुढे आपल्या दोघांचेही टंकनाचे कष्ट आणि वेळ वाचवण्यासाठी ही प्रतिक्रिया !! धन्यवाद ! अवांतर : मी काऊंट = १० फक्त :(

In reply to by सुबोध खरे

प्रसाद गोडबोले 08/09/2015 - 13:10
इगो प्रोब्लेम
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ इगो प्रॉब्लेम कसला आलाय , मला मोजक्याच मी मी करणार्‍या स्वमतांध दांभिक लोकांशी वाद घालायला फार अवडतो ! तेवढेच अपले निरर्थक अत्मरंजन =))
जाऊ द्या सोडून द्या
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ

ज्ञानोबाचे पैजार 07/09/2015 - 13:46
चिंतने आवडली. अजूनही वाचायला आवडतील. पुभाप्र पैजारबुवा,

राही 07/09/2015 - 16:03
लिखाण आवडले. शेवटचा क्षण यावर मतभिन्नता दिसली. आपल्याकडेही म्हटले आहे की 'गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत्'. याचा अर्थ असा नाही की पुढचा क्षण तुझा नाही, तर तू उरलीसुरली चैन करून घे. उलट, तुझी कर्तव्ये पार पाडण्यासाठी तुला मिळालेला प्रत्येक क्षण मोलाचा आहे, तस्मात पुढचा क्षण उगवेल की नाही याची वाट न बघता स्वकर्तव्यपालनासाठी आताच्या क्षणाचा तू पुरेपूर वापर कर. वर्तमान महत्त्वाचे आहे आणि ते क्षणाक्षणाने हातून निसटते आहे, तेव्हा त्यावर झडप घाल. ग्रॅब इट. अधिक वाचायला आवडेल. कल करना वह अज कर ले, अज करना वह अब | चीडियाँ चुग गयीं खेत, पछतावे क्या रोवत है ||

पक चिक पक राजा बाबू 27/08/2016 - 22:17
मला वैयक्तिक फारसे प्रभावी वाटले नाही हे विचार, यापेक्षा कितीतरी अल्टीमेट तर ओशो नी लिहिले आहे, ओशो जीवन जगण्याच्या पद्धतीलाच आव्हान देतो,तुम्ही ओशो वाचायला सुरुवात करता तेव्हा जीवना बद्दलचे दृष्टिकोनच बदलून जातात.ओशो म्हणतात,तुम्हाला जेव्हा पूर्ण ज्ञानाची प्राप्ति होते,त्याच वेळी तुमचा मृत्यू होऊन जातो.त्यानंतर आसक्तिची समाप्ति होते.मि ओशो ला गमतीने ड्रग डीलर म्हणतो, ओशो ची नशा उतरवायला परत ओशोच वाचायला लागतो.जीवनाबद्दल चेअत्यंत कठीण तत्वज्ञान ओशो अत्यंत तार्किक पद्धातिने samjaoon सांगतो त्याला तोड़ नाही.

संदीप डांगे 28/08/2016 - 10:40
अरेच्चा! मी ह्या धाग्यावर का ब्रे प्रतिक्रिया दिली नाही? असो. धागा उत्तम. बाकी, स्कोअरसेटलींगबद्द्ल उठसूठ रडारड करणारे इथे स्वतःच ते करतांना बघून मनोरंजन झाले.