Skip to main content

लदाख सायकल ने : उप्शी ते लेह (भाग १२)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी बुधवार, 10/02/2016 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
उप्शी सिन्धु नदीच्या किनारी आहे. एक रस्ता सिन्धु nadi बरोबर वरती जातो. तर दुसरा रस्ता २०० किमी पुढे जाउन चीन सीमारेषे वरती हनले गावात जाऊन मिळतो. तिथे आपला एक मित्र मिलिट्री मध्ये आहे. त्याला मी सांगितले होते कि, मी तुला भेटायला येणार आहे. पण हि प्रवासाला निघण्याच्या आधीची गोष्ट आहे. आता ५ घाट पार करून इतका जीव गेला कि अजून २०० किमी नाही जाऊ शकत. आणि ह्या रस्त्या वरून जाण्यासाठी लेह मधून परमिट घेणं आवश्यक आहे. उप्शी मध्ये १०० रुपयाला एक बिस्तर मिळालं. त्याच बरोबर मोबाइल व कैमरे चे चार्जिंग पण फुल झाले.

भिंतीपल्याड जग असतं...

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 10/02/2016 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
a छायाचित्र जालावरून साभार भिंतीपल्याड जग असतं, निरखावं की कड्या काढून दार सताड उघडावं की पुढे जायचा वसा कधी टाकू नये ठेच लागली जराशी तर लंगडावं की आहे त्यातच समाधानी रहावं, पण इच्छित साध्य करण्या थोडं झगडावं की घेऊ द्यावा मनालाही निर्णय त्याचा मनाला जे आवडतं ते, निवडावं की सदासर्वदा चांगुलपणा अळणी होतो अधनं मधनं जरा जरासं बिघडावं की निसटून जातो काळ हातून तरीसुद्धा जमेल तितकं आपण घट्ट पकडावं की भिंतीपल्याड जग असतं निरखावं की कड्या काढून दार सताड उघडावं की - अपूर्व ओक
काव्यरस

आयडीचे डू-आयडीस पत्र

लेखक नीलमोहर यांनी बुधवार, 10/02/2016 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं. नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो. मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' ....

एका कातरवेळी ……….

लेखक एकप्रवासी यांनी बुधवार, 10/02/2016 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
(कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी, अदभूत, अविश्वसनीय, रोमांचकारी.) रम्य अश्या ह्या सुवर्णमय सायंकाळी नभामध्ये ह्या ढगांची मांदियाळी दाटते चैतन्य मनामध्ये कातरवेळी पाहून हि निसर्गाची होळी रंगपेक्षाही किती सुंदर भरले जातात निसर्गाचे रंग पाहून हा रंगांचा सोहळा भरून येते हे अंतरंग
काव्यरस

अपूर्ण कविता .....

लेखक मयुरMK यांनी बुधवार, 10/02/2016 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
येण्यास जन्मा थोडा उशीर झाला अन जीवनी सगळाच गोंधळ झाला ! उशीर का झाला ? गोंधळ का झाला ? पूर्वजन्मीच्या जीवनाच्या जगण्याचा करता करता हिशोब पाप-पुण्याचा शोधताना चुका मागच्या जन्मांच्या वेळ खूप गेला अन थोडा उशीर झाला....! आता हिशेबात चुका नाहीत करायच्या असा प्रामाणिक निश्चय मनाशीच केला - मंदिरात जायला थोडा उशीर झाला अन मंदिराचा दरवाजाच बंद झाला ! उशीर का झाला ? दरवाजा बंद का झाला ? देवाच्या देवळात जाताना देवपुजेआधी माझ्यासाठी व माझ्याच स्वकियांसाठी काय मागावे ,काय नको ?
काव्यरस

मी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)

लेखक Anand More यांनी बुधवार, 10/02/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ _________________________________________________ शाळेसमोर उभा होतो. Reunion चौथ्या मजल्यावरील सभागृहामध्ये होतं. मी जिममध्ये केलेल्या सरावाचे स्मरण करत जिना चढून वर गेलो. मुलींनी छान रांगोळी वगैरे काढली होती. खुर्च्या मांडल्या होत्या. स्टेजच्या मागे पडद्यावर Reunion चा फ्लेक्स लावला होता. काही जण माझ्या आधीच येउन बसले होते. हुबळी वरून किरण, पुण्यावरून स्वाती, राज, सारंग, अनघा, मीनल, मुंबई वरून ओंकार असे कोण कोण कुठून कुठून आले होते. मुली साड्या नेसून तर मुलं झब्बे बिब्बे घालून, सगळे छान दिसत होते. त्यांच्या सगळ्यात, सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ टी शर्ट घातलेला मी वेगळा दिसतोय असे मला वाटू लागले. पण मग माझे लक्ष जरा बारीक झाले. अनेकांची पोटे माझ्यापेक्षा जास्त सुटली आहेत, कित्येकांच्या केसावर काळाने आपला हात फिरवला आहे हे दिसू लागले. मला थोडे माणसात आल्यासारखे वाटू लागले. ग दि मांच्या "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" या उक्तीचा प्रत्यय येऊ लागला. मी तिला शोधत होतो. अजून कुठे दिसत नव्हती.

नवर्‍याचे नवविधवेस पत्र

लेखक तर्राट जोकर यांनी बुधवार, 10/02/2016 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं पत्र मिळालं, कसं कुठे ते विचारु नको... सांगतो सावकाश. मी गेलो आणि त्याचा तुला आनंद झाला हे ऐकून माझ्या काळजाला चिरा पडतील असं का वाटलं तुला? त्या आधीच पाडल्यात, माझ्या लाडक्या दारूने. रात्री माझा काही उपयोग नव्हता म्हणालीस का..? आता सर्व स्पष्टच करतो. तुझ्याजवळ आलं की तू सतराशेसाठ कारणं द्यायचीस, आज काय तर एकादशी, मग काय चतुर्थी, कधी अंगारकी, मंगळवार, शिवरात्र, अगदी काहीच कारण सापडलं नाही तर तुझं डोकं तरी दुखायचं. आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात.