Skip to main content

काय वजन असतं क्षणांना!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 03/04/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
काय वजन असतं क्षणांना! आज अन्वयच्या 'केजी-वन' चा पहिला दिवस! तिला कधीपासूनच्या आवडणाऱ्या 'बिग येलो स्कूल बस' ने आज शेवटी ती शाळेपर्यंत गेली, मी ही गेलेलो मागे मागे, अमृताचा सल्ला ऐकला, जाऊन बघून ये हं ती नित जात्ये की नाही शाळेत, शाळेत उतरल्यावर माझ्यासारखे उत्साही पालक मंडळी ही तिथे हजर होतीच, मी कुतुहलतेनॆ तिचा फोटो कढायला जरा तिच्या जवळ गेलो, त्यांची छान रांगेची 'ट्रेन' करवत शाळेची एक कार्यकर्ती त्यांना शाळेत घेऊन जात होती… मी फोटो काढला तेव्हढ्यात अन्वयाने मला पहिले आणि हसली smile emoticon मी ही तिला पाहुन हसलो… अमृताने सांगितलेला सल्ला पाळला, पण तिचा आतपर्यंत पाठलाग करायची माझी खाज महा

(छटाक) नंतर

लेखक नाखु यांनी रविवार, 03/04/2016 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

दानव

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/04/2016 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री अचानक जाग आली. दिवा चालूच होता. तशी मला दिवा बंद करुनच झोपायची सवय आहे. पण आता तो कोणीतरी चालू केला होता. कधी माहीत नाही पण मघाचपासून नुसताच चडफडत पडलेलो. धड झोपही नाही जागही नाही. पण आता टक्क जागा झालो. वैतागच आला. साला हा सुश्या उशीरा खोलीवर येतो अन दिवा चालू ठेऊन बसतो. नुसताच बसत नाही तर कधी कधी झोपतोही तसाच. दिवा चालू ठेवूनच. मग मात्र संताप होतो. गाढ लागलेल्या झोपेचं मग खोबरं होतं. थोडा वेळ चुळबुळ करून मग पांघरुन काढून उठूनच बसलो. तर सुश्याच्या ऐवजी जगदिशच दिसला पुढे. साला एवढ्या रात्रीचं काहीतरी खात बसला होता.

देवाचे स्थान कुठे ।।

लेखक माहीराज यांनी शनिवार, 02/04/2016 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
मान कुठे, सन्मान कुठे, सद्भावाचे भान कुठे, ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. पुजा आमची नित्याची, नैवेद्य ही नित्याचेच श्रद्धेपोटी उगाच आमुचे वादविवाद ही नित्याचेच वाटून घेतले देवही आम्ही माणुसकीचे गान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. जाती धर्माची वर्गवारी करून घेतली आम्ही जागा प्रत्येक मंदिराची वाटून घेतली आम्ही एक नियती सार्‍यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..
काव्यरस

चिंकीचे ना (आवडते सूप)

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 02/04/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
कित्येक वर्षांनी चिंकी घरी आली होती. आता ती मोठी झाली होती. वाटलं होत तिचे बालपणाचे नखरे संपले असतील. पण कुठचे काय, सौ.ने मटार आणि गाजराची सुखी भाजी केली होती. ताट वाढल्यावर भाजीतले गाजर वेचून तिने अलग केले आणि म्हणाली मावशी मला गाजर आवडत नाही. न जाणे का मला दुर्बुद्धी सुचली आणि म्हणालो. चिंकी गाजर डोक्याकरता चांगले असतात. करमचंद नेहमी गाजर खात-खात मोठ्या-मोठ्या अपराध्यांना हुडकून काठायचा. "टीवीवर सर्व खोट दाखवितात. माझे किनई १०वीत ९५ टक्के मार्क्स आले होते, ए मावशी तुझे किती आले होते ग! विचारत तिरक्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले." तिच्या गुगलीवर माझी विकेटच उडाली.

सावल्यांची सरमिसळ होते ..

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 02/04/2016 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक ना कारण सबळ होते पण तुझे जाणे अटळ होते हे कसे नाते दुराव्याचे जे कधीकाळी जवळ होते कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

मी अजून जिंकलो नाही

लेखक अभिषेक पांचाळ यांनी शनिवार, 02/04/2016 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात ना , अंत भला तो सब भला , हेच खरे . सुरुवातीलाच एखाद्या गोष्टीला वाईट न म्हणनेच बरे वाईट शेवट असेल , तर तो शेवट नाही सुरुवात असेल नवी , एक वाईट अंत नाही शेवट हा नेहमी गोड असतो , वाईट नसते काही सुरुवातीलाच शेवट पाहण्याची , आपण करत असतो घाई हरलास तू , असं कुणी बोलत असेल अपयशाच्या तराजुत , तुला तोलत असेल त्याला जिंकलास तू , असं प्रेमाने सांगावं अभिनंदन करुन , थोडंसं समजावावं म्हणावं , जिंकला आहेस तू , मी हरलो नाही शर्यत संपली नाही , कारण मी अजुन जिंकलो नाही - अभिषेक पांचाळ
काव्यरस

आम्ही मनमौजी

लेखक सुधीरन यांनी शनिवार, 02/04/2016 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला वसंत ऋतु आला नाचुया खेळूया झूला झुलूया आम्ही सारे आहो मनमौजी मजेत आपण सारे फिरुया ।।१।। कशास बाळगू तमा जगाची कशास काळजी आज उद्याची दिवस हा आजचा मजेचा रात्र ही धुंद नशेची ।।२।। तरुण आम्ही नव्या युगाचे भोक्ते सा-या सुखांचे नका पाडू बंधनात आम्हा आम्ही चाहते स्वातंत्र्याचे ।।३।। कमी पडेल धरती ही थिटे पडेल आकाश ही मनात आणता आम्ही रूप पालटू या जगाचे ।।४।।

हिवाळ्यातला लदाख - सैनिकांची परेड आणि युद्ध संग्रालय (भाग ८)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शनिवार, 02/04/2016 18:09 या दिवशी प्रकाशित केले.

हिवाळ्यातला लदाख - सैनिकांची परेड आणि युद्ध संग्रालय (भाग ८)

मागील पानावरून ............ राजमहाला मध्ये कोणीच नव्हतं. राजमहाल जास्त मोठा नव्हता. राजमहाला भोवती फिरलो. तर माहित पडले कि, एक खोली बंद आहे. खोली पण खूप उंच दिसत होती. खात्री पटली कि, नक्कीच याच्या आत मध्ये ती मूर्ती असणार. तिथे कुणाला तरी विचारावे तर तिथे मी एकटाच होतो. त्या खोली ला कुलूप लावले होते. दोन तास तिथे घालवले. तेवढ्या वेळेत पण तिथे कोणीच आले नाही. नाराज होऊन परत ठिक्से ला जाण्यासाठी बस ची वाट पाहू लागलो.

आणि मी चहाचे बजेट मांडतो.....

लेखक राजू यांनी शनिवार, 02/04/2016 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
आई शप्पथ !!! आपण मानले बुवा ह्या बजेट तयार करणाऱ्यांना. आणि विशेष म्हणजे.... ते समजुन घेऊन त्यावर टिका किंवा स्तुती करणाऱ्यांना. एक चहा... बरंका ...