दानव
रात्री अचानक जाग आली. दिवा चालूच होता. तशी मला दिवा बंद करुनच झोपायची सवय आहे. पण आता तो कोणीतरी चालू केला होता. कधी माहीत नाही पण मघाचपासून नुसताच चडफडत पडलेलो. धड झोपही नाही जागही नाही. पण आता टक्क जागा झालो. वैतागच आला. साला हा सुश्या उशीरा खोलीवर येतो अन दिवा चालू ठेऊन बसतो. नुसताच बसत नाही तर कधी कधी झोपतोही तसाच. दिवा चालू ठेवूनच. मग मात्र संताप होतो. गाढ लागलेल्या झोपेचं मग खोबरं होतं.
थोडा वेळ चुळबुळ करून मग पांघरुन काढून उठूनच बसलो. तर सुश्याच्या ऐवजी जगदिशच दिसला पुढे. साला एवढ्या रात्रीचं काहीतरी खात बसला होता. नीट बघितलं तर टेबलावर पुडकं ठेवून हा मुठीमुठीनं त्यातला फरसाणा हाणत होता. मग अजूनच वैताग आला. आता याच्याशी बोलायचं तरी काय. कारण बोलून फरक पडेल असलं प्रकरण नव्हतं ते. मागं दोनचार वेळा बोलूनही त्याचा हा तमाशा सुरुच होता. साला गुर्मी घेऊनच वावरायचा.
मग उठून जरा गॅलरीत आलो. बाहेरची गार हवा अंगावर घेत जरा थंड व्हायचा प्रयत्न केला. बराच वेळ उभारलो. मग जरा तणतणच आत आलो. सरळ दिव्याचं बटन बंद केलं. अन पुन्हा आडवा झालो. छातीत जरा धडधडच झाली. म्हटलं हा जगदीश आता भांडणच उकरुन काढतोय की काय. पण तसं काही झालं नाही. त्याच्या तोंडाचा मचाक मचाक आवाज मात्र खोलीभर घुमत राहिला. तरीही सुमडीत तसाच पडून राहीलो. मग हळूहळू डोळ्यावर झापड आली.
झोप लागली की काय असं वाटत असतानाच अचानक पुन्हा दिवा चालू झाला. कायतर धावपळ चालू असल्यासारखं वाटलं. दणकण एक आवाज आला मग उठूनच बसलो. सुश्या उठला होता, अन जगद्याचं गचुरं धरुन त्याला अजून एक फटका मारायच्या तयारीत उभा होता. तेवढ्यात आतल्या खोलीत झोपलेली एक दोघं उठून बाहेर आली.
"आरं ही येडझवं पिऊन आलंय, आन आता माज्याच खाटंवर यीऊन झोपाय लागलयं" सुश्यानं झाला प्रकार पोरांच्या कानावर घातला. जगद्याला कसलंच भान नव्हतं. एक लाथ घातली असती तर भेलकांडत एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडलं असतं. आगीत तेल ओतायला म्हणून मीही त्यांच्यात जाऊन सामील झालो. पण त्याची काही गरजच पडली नाही.
आतल्या खोलीतून बाहेर आलेल्या धिऱ्यानं मग थोडा शांतपणे विचार केला. आधीच आर्धी झोप झाल्यानं त्याचं डोळं जड झालेलं. मग मान हलवत "काढा रं ह्यला भाईर" म्हणत त्याची गादी, बादली, कापडं, हिटर सगळं दरवाज्याबाहेर काढून टाकून दिलं. मग त्या प्येताडालाही बाहेर ढकलून दरवाजा लावून घेतला. दिवा बंद करुन मग सगळीच ढाराढूर झोपली. ते प्येताडंपण कुठं जिन्याबिन्यातच झोपलं असंल. मग राहीलेली झोप कशीबशी संपवली.
सकाळी उठल्यावर रात्रीचं आठवत त्या प्येताडाला शिव्या घालतच सगळ्यांनी आवरलं. बाहेर जाताना त्याचं सामानसुमान दरवाच्यापशीच पडलेलं. पण ते प्येताडं कुठं दिसलं नाही. संध्याकाळी जेव्हा परत आलो, तेव्हा तिथं काही सामासुमान नव्हतं. घरमालकानं त्याची दुसऱ्या कुठल्यातरी खोलीत व्यवस्था केल्याचं बोलण्यातून समजलं.
मग असंच दहा पंधरा दिवस गेलं. खोलीत निवांत झोप लागायला लागली. गारगार हवा खोलीभर फिरत राहिली. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच. पोरं आनंदाची गाणी गातच झोपायला, घोरायला लागली.
दरम्यान खालच्या मजल्यावर एकदमच आठ-दहा पोरं येणार असल्याचं समजलं. त्यांना म्हणे सेपरेटच खोल्या लागणार होत्या. म्हणून मग त्या खोलीतल्या जुन्या पोरांना इकडंतिकडं अॅडजस्ट करायचं म्हणून मालकानं आमच्याही खोलीची चावी घेऊन ठेवून घेतली होती. तसाही आमच्या खोलीतला एक कॉट रिकामाच होता.
तर त्या दिवशी संध्याकाळी मी जेव्हा खोलीवर आलो तेव्हा दरवाजा उघडाच होता. आत बघितलं तर ते प्येताडं नुसत्याच अंडरप्यांटवर त्याच्या खाटंवर मटकुळं करुन बसलं होतं. संताप संताप झाला तिच्यायला. नंतर बाकीची पोरं आली. मग तीही मनातल्या मनात खदखदत चरफरड मूग गिळून गप्प झाली. आपण त्या गावचेच नाही अशा अविर्भावात ते प्येताडं मग उठलं. बादलीत पाणी घेऊन हिटर लावला. आंघोळ केली. कुणाला काही न बोलता कापडं घातली. तसंही ते आधीपासून कुणालाच काही बोलत नव्हतं. मग बुटंबिटं घालून कामावर निघून गेलं. नाइट शिफ्टला. आता ते पहाटे तिनलाच परतणार. जाम वैताग आला.
नंतर मी ती खोलीच बदलून टाकली.
याद्या
4440
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
बरं
असा सगळा प्रकार झाला तर
आजकाल तुमच्या कथा (ही नक्की
हा हा हा , असही लिखाण करता का
काय आहे हो हे ?कथा , लेख ,
?
भाऊ काय हे?
"असो पुढची कथा अशी टाका की
In reply to भाऊ काय हे? by DEADPOOL
च्यामारी, हे भलतच!
ठीके ओ
सहमत. एक छोटा अनुभव म्हणून
In reply to ठीके ओ by नीलमोहर
मला आवडली.
हम्म
In reply to मला आवडली. by तर्राट जोकर
झोपा गपचिप
मिपाकरांना तुमच्या कथा आवडतात
हे मात्र बुन्गात ... !!
In reply to मिपाकरांना तुमच्या कथा आवडतात by यशोधरा