Skip to main content

पहाट बोले …

लेखक उल्का यांनी शनिवार, 30/04/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
आली पहा ती रम्य पहाट पक्षी करिती किलबिलाट कोकिळ घाले मधुर साद; केशर रंगी रविकिरणे शीतलता ही प्रसन्न करे पर्णांना सोनेरी वर्ख चढे; दावुनी अपुली किमया ही काय सांगू पाहते ती? “हार नका मानू कधी!” “तम हा सरला, उठा सारे, चैतन्याचा प्रकाश पसरे, कर्तृत्वाचे रचा मनोरे!” – उल्का कडले

सोलापूरचे कुणी आहे का?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 30/04/2016 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कालच "मिळून सार्‍याजणी-दिवाळी अंक-२०१५" वाचला. त्यातील "सौर उर्जा शेती" ह्या विषयावरील "आय.आय.टी की डोंबल" हा अरूण देशपांडे लिखित लेख वाचण्यात आला. ही शेती अंकोले ह्या सोलापूर शहराजवळच्या गावांत आहे. आज श्री. अरूण देशपांडे ह्यांच्या बरोबर प्राथमिक बोलणे झाले. मी आणि आमची सौ.

असा कसा काळ आला

लेखक gsjendra यांनी शनिवार, 30/04/2016 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
असा कसा काळ आला बापाआधी बाळ गेला असा कसा काळ आला धर्माच्या नावाखाली घोळ साला असा कसा काळ आला खरं बोलणारा वाळ झाला असा कसा काळ आला काळा कावळा शहाळं प्याला असा कसा काळ आला गाढवाच्या गळ्यात माळ घाला असा कसा काळ आला पैसा जगण्याचं मूळ झाला असा कसा काळ आला माणूसच कूठे गहाळ झाला भोसले जी.डी. आत्मशोध काव्यसंग्रह
काव्यरस

तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 30/04/2016 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून , अर्धातास, निमुट उभा रहात, आमच्या गप्पा ऐकणार्या तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते “आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले दमुन झोपले आहेत बिचारे.

तेव्हा मला तू फार फार आवडतेस - प्रवास ३

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 30/04/2016 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा : वरील कवितेतील पात्रांचे विचार्/दृष्टीकोन सर्वस्वी कवीचे आहेत.सदर घटना सत्य आहे का काल्पनिक ह्याबाबतीत कवी मौन बाळगत आहे. ------------------------------------------ गोव्याच्या त्या तत्सम एक्झॉटीक बीच वर उघडाबंब मी.. शार्कच्या नजरेप्रमाणे.. कपड्यांना चिकटलेली.. नितळ शरीरे पाहण्यात बिझी असताना... "अहो जास्त पुढे जाऊ नका. तुम्हाला साडेचार फुटात पोहायची सवय आहे..." असा डायरेक्ट आत्म्याशीच संवाद साधणारा आवाज येतो...! ती तूच असतेस. समुद्राच्या पाण्यात तू अलगद अंदाज घेत उतरतेस.... एक एक पाऊल पुढे टाकत..! अन पावलागणिक ओले होणारे तुझे अंग पाहत... मी स्तब्ध राह्तो...! अन मग हळुहळू त

गो बाय

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 30/04/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
(माझ्या ४ वर्षाच्या मुलीला लिहीलेल एक पत्र जे ती आणिक थोडी मोठी झाली की वाचेल आणिक मला येऊन घट्ट बिलगेल नेहेमी सारखी ) गो बाय तुला येऊन चार वर्ष झाली. तू आलीस म्हणून जगण्याला एक कारण मिळाल अगदी एकूलत एक. आई बापाच्या अकाली जाण्याने मोडून गेलेल्या एका माणसाला उमेद मिळाली. गो बाय तूला आठवतय का. पोटात असताना तू गर्भ सन्स्काराची सी डी ऐकायचीस अगदी शान्तपणे. कधी कधी खूप मस्ती करायचीस आईला लाथा मारायचीस मग मी कसलस स्तोत्र म्हटल की शान्त व्हायचीस अगदी शहाण्या बाळा सारखी. मग ०५/०३/१२ ला तू आलीस अगदी तुझ्या मावशी आजीच्या तारखेला तू आलीस. लोक म्हणाले बहीणीच्या तारखेला तिची आजीच परत आली.

डॉ.कुमार विश्वास..

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शनिवार, 30/04/2016 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
कोई दिवाना केहता है, कोई पागल समजता है, पर इस धरति कि बैचैनी तो बस बादल समजता है मैन तुमसे दुर कैसा हुँ तु मुझसे दुर कैसी है, ये तेरा दिल समजता है या मेरा दिल समजता है. हळुहळू मुक्तक पुढे सरकत जातं आणि आपल्याला कुमार विश्वास या नावाची, त्यांच्या शब्दांची नशा चढु लागते. संपूर्ण माहोल बदलून जातो, नजर पोह्चते तिथपर्यंत जमलेली गर्दी, त्यांच्या टाळ्या-शिट्ट्या, मधेच हास्याचा फवारा आणि या सगळ्यात मनाला भिडणारी डॉक्टरांची शायरी.....काही काळासाठी एक वेगळीच दुनिया निर्माण होते. मग आपल्या समोर पुढचं मुक्तक डॉ.

माझी ज्यूरी ड्युटी ८

लेखक शेंडेनक्षत्र यांनी शनिवार, 30/04/2016 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ७ अनेक तपशिलांनी भरलेल्या वैद्यकीय अधिकार्यांच्या लांबलचक साक्षी झाल्यावर काही किरकोळ साक्षी झाल्या. त्यात त्या ट्रकशी संबन्धित काही माहिती मिळाली. तो किती उंच आहे, आत सीट किती आहेत, कितपत जागा आहे. उंच मनुष्य, बुटका मनुष्य कितपत सहजपणे वावरू शकतो हे एका वाहन तज्ञाने सांगितले. फार काही नवे कळले नाही. आता दुसरी महत्त्वाची साक्ष म्हणजे त्या आरोपीची. त्याची सर्वांनाच मोठी उत्सुकता होती. आरोपी साक्षीदाराच्या पिंजर्यात आला. तो व्यवस्थित इंग्रजी बोलत होता. ३० वर्षापूर्वी तो आर्जेन्टिना देशातून अमेरिकेत आला होता.

आपल्या मालोजीचे कचकून अभिनंदन

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 30/04/2016 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी. शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली. तुझा अभिमान वाटतो मित्रा. अधिक माहिती येथे पहा. a