Skip to main content

अधांतर -2

लेखक समीर१२३४५६ यांनी शुक्रवार, 20/05/2016 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
- परंतू नियतीच्‍या मनात मात्र एक वेगळाच डाव ठरलेला होता अलकाचे लग्‍न जुळत नव्‍हते, तिच्‍या वडिलांनी ब-याच ठिकाणी बोलणी करुन पाहिली होती, परंतू सगळीकडे नकारघंटाच ऐकू येत होती. अलकाचे दिसणे वागणे खूपच चांगले होते, परंतू का कोणास ठाऊक सर्व लोक कृष्‍णाला खूृृप घाबरत असायचे. कृष्‍णााला मात्र या गोष्‍टीचा थांगपत्‍ता नव्‍हता, तो आपल्‍या बहिणीसाठी वणवण फिरत असायचा.

एवढीशी गोष्ट

लेखक abhajoshi14 यांनी शुक्रवार, 20/05/2016 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज शेजारच्या घरातून सकाळी सकाळी जोर जोरात भांडी वाजल्याचा आवाज आला. आमच्या शेजारी एक सुखवस्तू आणि गोड कुटुंब रहाते. सासू मुलगा सून आणि त्यांची दोन लहान मुले. एकूण च एक मेकांना धरून आणि सांभाळून असतात. म्हणून च मला जर आश्चर्य वाटले. आमची ही आणि ती सून दोघी एकाच ऑफिस मध्ये आहेत - साहजिकच मला संध्याकाळी सगळा रिपोर्ट मिळाला. सुनेची बाजू - "अहो मी अक्खे घर ह्यांच्या ताब्यात दिले आहे. एकही गोष्टी मध्ये मी लुडबुड करत नाही कि हक्क गाजवत नाही. रोजची भाजी काय करायची हे देखील त्याच ठरवतात. त्यांची मदत तर मला खूप च होते आणि मी ते प्रत्येक वेळेस सर्वांना सांगत असतेच अभिमानाने.

मी अनुभवलेले एव्हरेस्ट ...

लेखक हृषिकेश पांडकर यांनी शुक्रवार, 20/05/2016 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिमेला असलेले महत्वाचे राज्य आहे.महाराष्ट्र आणि कोकण यांच्या मध्ये संपूर्ण सह्याद्रीची रांग पसरलेली आहे.महाराष्ट्रात कळसुबाई हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ५४०० फुट इतकी आहे.महाराष्ट्राला ७०० कि.मी चा समुद्र किनारा लाभला आहे. पांडकर ...धडा वाचणे चालू असताना आपले लक्ष कुठे आहे...न वाचता सांग बरं...

..किती लौकरच आज उजाडलं बाई..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 20/05/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
..किती लौकरच आज उजाडलं बाई.. सजणाच्या मिठीमध्ये कळालच नाही किती लौकरच आज उजाडलं बाई... सजणाच्या प्रेमाला ह्या नाही वेळ काळ झोपलयं पहा कसं कुक्कुलसं बाळ.. झोपमोड त्याची मला करवत नाही.. चांदण्यात न्हालो दोघे काल पुरी रात्र.. अमृताने तृप्त झाली,हर एक गात्र.. वाटे सकाळच कधी उगवणार नाही..! तसा आहे आज छान रविवार सुस्त.. घ्यावी गडे अजुनिया..झोप थोडी मस्त... लावले मी दूर त्याला पिटाळुन बाई.. सजणाच्या प्रेमालाही काळवेळ नाही... किती लौकरच आज उजाडलं बाई + कानडाऊ योगेशु

गाव दत्तक देणे आहे !!

लेखक नितिन शेंडगे यांनी शुक्रवार, 20/05/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
फार जुन्या काळा पासून दत्तक घेणे हा प्रकार आहे. राजे, सरदार किंवा अन्य तत्सम मंडळी ज्यांना मुलबाळ नाही किंवा मुलगा नाही(वंश किंवा गादी पुढे चालवन्यासाठी) ऎसे लोक दत्तक पुत्र घेत. त्याचा सांभाळ करत. पुढे जावून हेच दत्तकपुत्र मालक किंवा राजा होत... सध्याच्या युगात मात्र एक नविन फैशन आली आहे ती म्हणजे गाव दत्तक घेण्याची, आणि ती हिंदी चित्रपट सृष्टीत जरा जास्तच आहे.. एखादा चित्रपट येणार असेल तर त्याला नजरेसमोर ठेवून गाव दत्तक घेतले, श्रमदान केले ऎसे इवेंट केले जातात आणि मीडिया ही त्याला भरपूर प्रसिद्धि देतो. चला चांगले आहे, की लोक अजूनही समाजकार्य करत आहेत.

उपनिषदे (२)

लेखक शरद यांनी शुक्रवार, 20/05/2016 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

तर्राट झालं जी...

लेखक सायकलस्वार यांनी शुक्रवार, 20/05/2016 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
खुळखुळ वाजं खिशातऽऽ भलतंच खुललंया आज... बायकुचं चुकवून ड्वाळं… सुमडीत गाठलंया बार अन् झनानलंऽऽऽ बाटल्यामंदीऽऽऽ अन ग्लासातनं व्हटात गेलं जी तर्राट झालं जीऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽऽऽ.... झिंगून गेलंया सारंऽऽ त्वंडाचं सुटलंया घाण अल्लद झेपावल्यालंऽऽ आभाळामंदी विमान.. ग्यलं व्हटातनं..

वेदनेचा गाव

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 20/05/2016 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
किती दिवसांनी आज वेदनेच्या गावात भरून आलंय आभाळ ठसठसत्या जखमांची खपली काढायला मग त्या ओल्या जखमा वाहतील डोळ्यातून फुंकर मारायला असेलच तुझी आठवण भर दिवसा कसा फक्त अंधारच उरलाय घरभर? होत्यानव्हत्या सगळ्याच पणत्या नेल्यास ना सोबत? त्या पणत्यांच्या उजेडात उजळशीलच तू मला दिसशीलच आणि चमचमणार्या एका वीजेत तुझं आपलं बरय तुझ्यात पाऊस भिनायचा मला मात्र टोचतात रखरखलेल्या धरणीवरचे ओरखडे तू भिनलेला पाऊस खोल खोल जातो मनात तिथं तळाशी गेल्यावर शिल्लक काय दिसते? मी उगाच केलेली तुला नकोनकोशी धडपड? कधीतरी माझ्या वेदनेच्या गावात माझ्यासाठी येउन जा तू पाठवलेल्या पावसानी माझी झालेली वाताहत एकदा बघून जा फक्त इथच

पुस्तक परिचय - लयपश्चिमा

लेखक गतीशील यांनी गुरुवार, 19/05/2016 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
संगीताची आवड हा अतिशय वैयक्तिक विषय आहे. आपण कोणाला जबरदस्तीने एखादा गाणं आवडवू शकत नाही. तसे लहानपणापासून माझ्या घरात शास्त्रीय संगीताची आवड सगळ्यांनाच होती, मी सोडून.!! (मला अजूनही ख्याल गायकी आवडत नाही, पण केवळ वाद्ये जशी सितार, तबला, बासरी वगैरे आवडतात ऐकायला.) मला ताला सुराचे बर्यापैकी भान होते / आहे असे समजतो. नंतर अभियांत्रिकीला गेलो. तिथले वसतिगृह हा काय प्रकार असतो हे जाणकारांना सांगणे न लगे. नाना प्रकारची चित्र विचित्र मुले तिथे एकत्र राहत असतात. तिथे पहिल्यांदा माझ्या डोक्यात पाश्चात्य संगीताचा किडा घुसला. त्यातूनही ROCK n ROLL चा.

राँग नंबर

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 19/05/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशात चंद्र कधीचा डोक्यावर आला होता. घड्याळात १२ चा ठोका वाजूनही गेला होता. ती कधीची हातात फोन घेऊन आकाशाकडे वेड्यागत बघत बसली होती. फोन करावा की न करावा या विचारात! आज त्याचा बर्थ डे! मागच्या वर्षी ती होस्टेलच्या गेट वरून उडी टाकून त्याच्या रूमवर गेली होती. फुल भारी plan होता तो! सगळा ग्रुप जमला होता. मग खूप धमाल केली होती. अशाच एका क्षणी हसता हसता त्याने अचानक तिला I love you म्हटलं होतं. त्याचं सगळंच धक्कादायक आणि अनपेक्षित. कधी काय करेल याचा नेम नाही. हीच spontaneity तिला भावली होती. आणि ती काय लाजली होती!