Skip to main content

प्रकाशवाट

लेखक यांनी बुधवार, 22/03/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
एका मग्न तळ्याला होता आठवणींचा गहिरा डोह भौवतालच्या पर्वत रंगांना आकाश शिवण्याचा होता मोह ह्या पर्वत रांगांच्या दरीत होते साठवणींचे कवडसे कुठे होते तापवणारे ऊन तर, कुठे झोंबणारे गार वारे कुठे तरी लपून बसल्या होत्या काळ्याकुट्ट रहस्यांच्या गुहा तर कुठे होता पठारावर फिरणारा उनाड मनमोकळा स्वछंदी वारा त्या तळ्याच्या काठून एक पायवाट भविष्यात जाणारी तर एक होती विसाव्याची जागा क्षणभर विश्रांती देणारी विसावा घ्यावा म्हणून जरासा त्या ठिकाणी थांबलो न राहवून गहिऱ्या डोहाच्या पाण्यात जरा डोकावलो पाण्याने काळ्या गर्द रंगाचा साज चढवला होता निळ्याशार पाण्याला काळ करणारा मेघ भरून आला होता गर्द काळे ढ
काव्यरस

गोविंदराव तळवळकर

लेखक विकास यांनी बुधवार, 22/03/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच कळले आणि नंतर वाचले की महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवळकर यांचे ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली. महाराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रीय जगताची स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक-आगरकर, काळकर्ते परांजपे, न.चिं केळकर आदी अनेक दिग्गजांनी एक जडणघडण घातली. त्याच काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सुरवातीस आचार्य अत्रे, ह.रा. महाजनी आदींनी वैचारीक जडणघडण चालूच ठेवली.

पेटुनी आरक्त संध्या...

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 22/03/2017 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे... केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे! मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे... वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे! काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे... सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे! एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी... त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे! मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे! सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी... मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे! —सत्यजित

खिडकी पलीकडचं जग भाग ७ (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 22/03/2017 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://www.misalpav.com/node/39159 भाग 2: http://www.misalpav.com/node/39179 भाग 3: http://www.misalpav.com/node/39196 भाग 4 : http://www.misalpav.com/node/39212 भाग 5: http://www.misalpav.com/node/39222 भाग 6: http://www.misalpav.com/node/39230 भाग ७ लांबच लांब बोळ होता तो.

(ग़ज़ल - म्हटलेच होते)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 21/03/2017 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे(च), म्हणून एखादी ताजी कविता आपणही शोधू म्हटलं. सादर आहे.... (म्हटलेच होते...) सुबक दिसता, दे हृदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते खीर देती ते पुन्हा घेता पुरी मी मीहि चरण्याला विजय म्हटलेच होते एक मिटता नयन अन खुलताही दुसरा उमटते गाली वलय म्हटलेच होते वाटली होतीच भीती या क्षणाची त्या कडीने ना अभय, म्हटलेच होते!! 'परतुनी' जा(ये)ती कशा समजे न रंग्या सासवांना मी प्रलय म्हटलेच होते! -चतुरंग २१-३-१७
काव्यरस

[खो कथा] पोस्ट क्र. ४

लेखक निशदे यांनी मंगळवार, 21/03/2017 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
-------------------- [खो कथा] पोस्ट क्र. १ [खो कथा] पोस्ट क्र. २ [खो कथा] पोस्ट क्र. ३ -------------------- भाग चौथा: आता या सगळ्या राड्यातून फक्त खुदीरामच वाचवू शकेल. मोबाईलवर मेसेज पाहिला. फक्त एक पत्ता लिहिला होता तिथे. पांडवगडाच्या लेण्यांच्या खाली एक झोपडी होती. तिथे जाऊन पोचलो. आत जाऊन बघतो तर खुदीराम बिडीचे झुरके भरत बसला होता. "साल्या, काय केलेस मला? डोक्याला कसला भुंगा लावून ठेवला आहेस?" "मैने क्या किया?

चलच्चित्र

लेखक संदीप-लेले यांनी मंगळवार, 21/03/2017 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
भुर्रकन इथे, भुर्रकन तिथे उडता पक्षी, काढी नक्षी एक गिरकी, एक फिरकी घेत हलकी, गळे पान की सुळूक असा, सुळूक तसा लवलवता, हलतो मासा शीतल धुंद, झुळूक मंद पहाट वारा, गुलाबी शहारा वेगवेगळी, ऊले पाकळी पहाट वेळी, खुलते कळी प्रकाश बिंदू, निशा समय उडे काजवा, ठाय लय

एक 'मळमळ-झल'

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 21/03/2017 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री डब्यात आलेले छोले खाऊन सोडलेली ही 'मळमळझल' पेश-ए-खिदमत आहे. उथळ जळाची खळखळ अटळ वळूची मळमळ कशास या वेटोळ्या कशास रे ही वळवळ सुरी असे ही बोथड उगाच का ही चळचळ? जखम दिसावी गहिरी खरी असावी कळकळ झुळूक वाहत नसली तरी असावी सळसळ इनो जरासा घ्यावा रुकेल तुमची जळजळ भरून येती डोळे प्रवाह वाहे भळभळ कळी कळे का कोणा? करा कशाला खळखळ? कुटाळ टाळा 'स्वामी' विटाळ आहे चळवळ - स्वामी संकेतानंद

ती...

लेखक प्रफुल्ल यांनी मंगळवार, 21/03/2017 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्याचा खुर्दा पडला होता, कधी एकदा २-३ पॅक मारतो असं झालं होत. बिअर बार मध्ये गेलो, बिअर बार कसला सालं बेवडयांची सोय व्हावी म्हणून काहीतरी बांधून ठेवलं होते हेवशीर होत एवढच काय ते चांगलं. एक कोपरा पकडून बसलो तेंव्हा ती दिसली एका खिडकी जवळ बसली होती, लक्ष गेले कि डोळ्यात डोळे घालून बघायची, डोळ्यांमध्ये आतुरता होती. मनात विचार आला का आली असेल इथे, एक पेग झाला तरी ती काय जागेवरून हलली नाही. एकटक माझ्या कडेच बघत होती , माझे ३ पेग संपले काय माहित मला चढली होती कि काय पण तिच्या डोळ्यात आता जास्तच आरव दिसत होती. मी माझे बिल दिल आणि घरी निघालो डोक शांत झाले होते.

-----

लेखक मितान यांनी मंगळवार, 21/03/2017 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
परकी दुःखं दाराशी येतात तेव्हा हळूच कुरवाळावी पाहुण्या आलेल्या मांजराला कुरवाळतो तशी. त्याची पावलं उमटणार नाहीत,नख्या लागणार नाहीत इतपत सलगी करावी... जिव्हाळ्याच्या आवाजात गुजगोष्टी कराव्या त्याच्याच आवाजात बोलण्याचे सुख भोगून घ्यावे.. झेपले तर थोडा दूधभात घालावा म्हणजे ते अजून लाडीगोडी लावेल... कोण कुठले गरीब बिचारे देवा ! आई गं ! अरेरे !
काव्यरस