Skip to main content

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी मंगळवार, 11/07/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . . त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . . त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . . आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . . पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . . संपादकाला काही येईना . . येईना . . . गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुची पार्टी आहे सत्तेत . . . सत्तेत . . . तरी मनाने विरोधकातच बसलेत . . बसलेत . .

ताम्हिणी घाटात एक रात्र

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 11/07/2017 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
एक सौदीवाला , एक कुवेतवाला आणि एक ओमानवाला अशा तीन मित्रांची ओळख फेसबुकवर झाली २०१० मध्ये ... एक समान धागा म्हणजे तिघेही कोकणातले... सहासात वर्षात फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वर धमाल मस्ती चाललेली ... पण तिघांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला तो या वर्षी फेब्रुवारीत ... त्याच वेळी ठरले की या पावसाळ्यात कुठेतरी जंगलात एक रात्र काढायची... आम्ही गेली ३/४ वर्षे चालवलेल्या "भुताटकी"पेज ला नवीन स्टोरीज साठी काहीतरी मटेरियल सुद्धा मिळेल ही अपेक्षा ;) तर शेवटी होता होता ८-९ जुलै तारीख अन ताम्हिणी घाट फिक्स झाले . आम्ही दोघे रत्नागिरीकर पहाटेच्या रत्नागिरी दादर पॅसेंजर ने सकाळी १० ला कोलाड ला पोहोचलो .

आक्रमक चीनचा धोका

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 11/07/2017 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानला शिव्या देण्याची भारतीय नेते आणि जनता यांना तशी सवय झाली आहे. किंबहूना पाकिस्तानला शिव्या दिल्याशिवाय आमची देशभक्ती सिद्धच होत नाही. शत्रू जेवढा छोटा तेवढ्या शिव्या जोरात. हा भारतीयांचा ढोंगीपणा नेहमी पहायला मिळतो. चीनबद्दल मात्र आमची ब्र काढायची हिम्मत नसते, तिथे आम्ही भारतीय पेग गिळून गप्प बसतो. असो. पाकिस्तानबद्दल सध्या पुरे.

’हॅरी पॉटर’: कास्टिन्ग (भाग १)

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 11/07/2017 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
’हॅरी पॉटर’ म्हटलं कि सर्वात आधी आठवतात तीन नावं – अभ्यासात सर्वात हुशार असलेली हर्मायनी ग्रेंजर, थोडासा मस्तीखोर, घाबरट आणि एका उंदराच मालक असलेला रॉन विजली आणि द स्टार ऑफ द फिल्म अर्थात ’हॅरी पॉटर’ .... ही तीन पात्र ज्यांनी पडद्यावर रंगवली ती आता ३० च्या घरात आहेत. हर्मायनी रंगवली ती ब्रिटिश अभिनेत्री एमा वोट्सन या ब्रिटिश अभिनेत्रिने. पहिल्या भागात काय cute दिसते ती. रॉन विजली उभा केला तो रुपर्ट ग्रीन्ट याने. सुरुवातीला अगदीच वेंधळा वाटत असला तरीही पहिल्या भागाच्या शेवटी बुद्धिबळाचा डाव खेळताना काय सुंदर अभिनय केलाय पठ्ठ्याने.

बोब्बी..एक लोककथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 10/07/2017 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
बोब्बी..एक लोककथा एका गावात एक ब्राह्मण रहात असतो..त्याला ३ सुंदर कन्या असतात.पण त्या तिघित पण वाचा दोष असतो म्हणजे तिघिहि बोबड्या बोलायच्या.. मुली लग्नाला आलेल्या असतात.. मुलाकडचे मुलिस पसंत करायचे पण ्ति बोबडे बोलायला लागली कि नकार द्यायचे. नकार घंटा ऐकुन बिचारा पिता दुखी होत असे.. त्या गावात एक लग्नाळु ब्राह्मण येतो.. वधुपिता ब्राहमण त्याला हेरतो व त्याची आपुलकिने चौकशी करतो.. व त्याला सांगतो कि मला ३ लग्नाळु मुली आहेत ..दिसायला सुंदर ग्रुहकृत्य दक्ष आदी आहेत तिघी पण पाठच्या आहेत आपणास जी पसंत असेल तिच्याशी मी आपले लग्न लाऊन देईल.. लग्नाळु ब्राह्मण त्या प्रस्तावाला होकार देतो... आनंदित झाले

ती पण आता पुसट वाटू लागलीय

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी सोमवार, 10/07/2017 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
विचारांच्या गर्दीत शोधातोय मी कुणाला तिला कि मला स्वतःला ? विचारांच्या गर्दीत शोधातोय मी कुणाला तिला कि मला स्वतःला ? ती पण आता पुसट वाटू लागलीय अवती भवति तिच्या विचारांची गर्दी झालीय स्वतः शोधतोयं त्या मनाला ज्याने साद दिली होती पूर्वी तिच्या भावनांना आढे वेढे घेवून लग्नाचे पेढे वाटले कमी होते कि काय म्हणून राहत्या घराचे दरवाजे पण छाटले छाटून सर्व खिडक्या अन दारें एक सुंदर घरकुल थाटले टाकली भिंत मध्ये उभी पल्याड ते सर्व नातलग अल्याड माझे दोन छकुले जीवलग त्यांनाच घेउनि पुढे जायचे त्यांनाच बघुनी स्वतःशी लढायचे अन लढता लढता कायमचे जायचे सिद्धेश्वर विलास

II शहराकडून "बा" चा फून आला II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी सोमवार, 10/07/2017 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
शहराकडून "बा" चा फून आला केल्या केल्या विचारू लागला कोण टाकून गेला लेंडूक आपल्या शेतामंदी ? म्या म्हटलं माझ्याशिवाय हाय कोण इथं ? तुमास्नी ह्ये कोण बोललं तिथं ? "बा"ने घपकंन हासडून शिवी लावली गाडीस चावी निघाला परतीस गावाकडं म्या बी धावलो धपाधप लेंडूक शोधाया शेताकडं घेता वास चहूकडं नाक साफ चोंदून गेलं च्या मारी माझ्या अपरोक्ष कोण ह्ये शेत शिंपून गेलं ? घेतली कुदळ फावडी हाती कराया खाली वर माती फुलं पसरली चहुकडं जागोजागी लावली उदबत्ती सूर्य ढळाया लागला चंद्रमा दिसाया लागला कुदळ चालूच व्हती लेंडकांसाठी अचानक एक मनात इचार आला रोम रोमांच उभा झाला दुरुन

ओटी

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी सोमवार, 10/07/2017 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
ओटी .... !! पंढरी- रोजसारखाच आजही त्याला घरी जायला तसा उशीरच झाला होता. बरोबरच होतं म्हणा, आजकाल सुट्ट्या चालू असल्यामुळे लोकांची ये जा वाढलेली असणं अपेक्षितच होतं. त्यात याची ड्युटी कोकण पट्ट्यावर , म्हणजे पाहायलाच नको. थकून जायचा बिचारा , पण तो थकवा फार काळ काही टिकायचा नाही , सुट्टीवर ... मामाच्या गावी जाणारी लहान लहान मुलं , त्यांचा तो उत्साह ... थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. अन त्यात आज गजर्याचा दिवस होता, उद्या सुट्टी म्हणजे आज मजा करायला मोकळा होता तो. आजची ड्युटी संपली होती, आता रोकड आणि उरलेली तिकिटं परत केली की चंद्री कडे जायला हा मोकळा. * * * * * * * “काय मावशे ??

दुहेरी ब्राह्मण ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 10/07/2017 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
लेख प्रस्तावना: ग्राहकाच्या दृष्टीने सहसा एका चांगल्या विक्रेत्याकडून असलेली अपेक्षा, ग्राहकाची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन विक्रेत्याने योग्यते मार्ग दर्शन आणि साहाय्य करावे अशी असते. पण प्रत्यक्षात एस्कीमोंच्या गळ्यात फ्रीज, टकल्याच्या गळ्यात कंगवा लटकवणारा, मातीस सोने म्हणून विकणारा किंवा आधी तर्कसुसंगत समजावून द्या, समजले नाही तर पैसे द्या (करप्ट करा) आणि तेही शक्य नसेल तर ग्राहकास कन्फ्यूज करणारा तो विक्रेता अशा प्रकारची इमेज जनमानसात उभी रहाण्यास बाकी समाजा सोबत बहुतांश विक्रेते स्वतःही जबाबदार असतात.