लेखकडॉ श्रीहासयांनी गुरुवार, 22/02/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41320
ओपिडी संपत आली होती, आज फारसे पेशंट नव्हते मी रिलॅक्स मुड मध्ये होतो आणि तेवढ्यात एकजण केबिन मधे शिरला .... हातात भली मोठी पिशवी , बरेच रिपोर्ट्स असावेत असा अंदाज आला.
लेखकचांदणशेलायांनी गुरुवार, 22/02/2018 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्या पाखरा नको जाऊ तिच्या गावी
ओघळणाऱ्या आसवांना प्रीत ना ठावी
स्वप्नातले चांदणे विखुरले सभोवती
जखमांवरची मेहंदी पुन्हा रंगून जाती
कंठात माझ्या फुटती ओळखीचे हुंदके
उमलत्या स्पर्शांचे रंग झाले फिके
गंध तुझे गेले वेचून वारे
जळत्या वेदनांचे उठले काळजात शहारे
लेखकखिलजियांनी गुरुवार, 22/02/2018 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
मनी सत्व आता कमी जाहले
मन मनात शोधायले
कुठे काय शोधू ?
नेम नाही तयाचा
मनी शोध घे
शोध त्या अंतराचा
जपावे जपी , पूस तू रे मनाशी
का बाळगी तू हे , दुःख उराशी
जगी कोण सुखी ?, या वनाच्या मनात
दुखी होई तोच , अवघ्या काही क्षणात
असा सारीपाट या वेड्या मनाचा
इथे खेळ चाले सुखदुःखांचा
दुखी मन होई ते वज्रासमान
सुखी मन ते मात्र वाऱ्याप्रमाणं
सुखी मोट मात्र, पाणी नाही तयाला
दुःख असे संगे, मन पोळावयाला
असा हा तो महिमा , वनाच्या मनाचा
इथे चाले खेळ त्या हरीनामाचा
सिद्धेश्वर विलास पाटणकर
लेखकडॉ.नितीन अण्णायांनी गुरुवार, 22/02/2018 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा नव्या दमाने जातो कधी हसाया
दुखणे जुनेच पुन्हा मग लागते दुखाया
करून फस्त कणसे उडून गेले पक्षी
होतील चालू आता ह्या गोफणी फिराया
येतील न ते नक्की घेवून लिंबूपाणी
उंची उपोषणाची जाया नको ही वाया
सांभाळ लक्तरे तू धडूते तुझ्या कुडीची
अभ्यास चालू आहे त्याची गोधडी शिवाया
क्रांतीचे गीत आता ओठात घे तुझ्याही
झाल्या अति या गझला झाल्या पुऱ्या रुबाया
- नितीन अण्णा
लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी गुरुवार, 22/02/2018 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थातच
तूम्ही
भकार,
मकार, गकाराने
सुरु होणारे शब्द उच्चारत
माझ्या एक
सणकन कानफाटीत मारता,
तेव्हा
मी तुमचे
राकट् हात
लालसर डोळे
पहात राहतो.
तुम्हाला पाहुन जीव इतका का घाबराघुबरा व्हावा?
तुम्ही माझे मनगट
कचकन पिरगळून
पाठीत दणका घालता,
पितृभाषा कि काय
तिच्यातच जीव जातो बघा,
बापाचा माल आहे का?
लेखकनिमिष सोनारयांनी गुरुवार, 22/02/2018 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रायणी सावकार यांचे रावणायन नुकतेच वाचून झाले. मला आवडले. खूप छान आहे. आपण सुध्दा जरूर वाचावे. एक वेगळीच अनुभूती आपल्याला हे पुस्तक वाचून मिळेल.
रावणाबद्दल एरवी माहिती नसलेल्या गोष्टी तर कळतीलच पण वाली सुग्रीव आणि तारा यांच्यातील खूपच पराकोटीच्या गुंतागुंतीच्या प्रेम त्रिकोणाचे अद्भुत आणि सतत दोलायमान होणारे खेळ यात वाचायला मिळतील. तसेच तारा आणि मंदोदरी यांच्यातील मैत्रीची कथा या यात प्रकर्षाने पुढे येते.
रावण मंदोदरी यांची प्रेमकथा आणि प्रेम विवाह कसा झाला हे सुध्दा यात आपल्याला कळते.
लेखकशिव कन्यायांनी गुरुवार, 22/02/2018 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
तू
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
हळूहळू लिहित जातोस,
तेव्हा
मी तुझे
राजस हात
लोभस डोळे
पहात राहते.
तुझ्यात इतका जीव का गुंतावा?
तू माझ्या हातांचे
देवनागरी चुंबन
घेऊन म्हणावे,
मातृभाषा कि काय
तिच्यातच जीव अडकतो बघ,
आई गंssss म्हटल्याशिवाय
प्राणसुद्धा जात नाही....
शाईचे बोट धरुन
तू परत रात्रीच्या
शांतप्रहरी
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
तुझेमाझे हितगुज
हळूहळू लिहित राहतोस...
शिवकन्या
लेखकरा.म.पाटीलयांनी बुधवार, 21/02/2018 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate Your Love..)
कथा – २
व्हॅलेंटाईन..
(प्रेमाची नवी नजर..)
ती- "त्या प्रसिध्द पुस्तकाच्या लेखकाने लिहिले आहे की,
' गुलाब आहेच असा सर्वाना आवडण्यासारखा.. पण प्रेमावर फक्त गुलाबाचीच मक्तेदारी का? कधी तरी मोगरा किंवा चाफ्यालाही उमेदवारी देऊन पहावी.. शेवटी सुगंधी ते पण आहेतच ना..!'"
तो- "बरोबरच लिहले आहे की मग.."
ती- "हो मान्य आहे ते पण मला सांगा प्रेमासाठी गुलाबाचं का निवडला असेल.. कारण पुष्पवर्गात तोच एकमेव असेल की ज्याला मिळवण्यासाठी काटेही टोचून घ्यावे लागतात.. म्हणजे प्रेम मिळवायचे असेल तर तुम्हाला अडथळे येणारच हेच सुचवले जात असेल गुलाबाकडून..
लेखकसमयांतयांनी बुधवार, 21/02/2018 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर' ह्या प्रसिद्ध नाट्यपदातील शब्द आहेत 'मन करा थोर!'.
आपण मनोव्यापारातले नाविक आहोत, कोलंबसाने मनोमन 'भारता'ला चंद्र बनवले होते, ध्यास घेतला होता आणि पूर्ण जगाला वळसा घालून त्याने मनाने थोर आहे, हे सिद्ध केले होते. तसेच आता 'सत्त्वा'ला चंद्र बनवून स्वतः चकोर बनत संपूर्ण आकाशगंगेत आपल्याला गरुडभरारी घ्यायची आहे, थोर मनाची व्याख्या पुन्हा नव्याने लिहायची आहे. विश्व आता पृथ्वीपुरता सीमित राहिलेले नाही.
हे सत्व सत्व आहे तरी काय नेमके? ते मनाने माणूसपण जपण्यात आहे.