Skip to main content

मृगजळ- एक आभास

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 24/01/2013 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी लहान असताना मृगजळ नावाची कविता बालभारतीच्या पुस्तकात होती. कवीच नाव आणि कवितेच्या ओळी सुद्धा आता आठवत नाही आहेत.हा पण मी तेव्हा प्राथमिक शाळेत असेन तेव्हा कधीतरी होती नेमकी इयत्ता नाही सांगता येत. आमच्या बाईंनी खूप छान शिकवलं होत पण सार काही डोक्यावरून गेल होत. आम्हीच कुठे तरी कमी पडलो कारण त्या वयापर्यंत बाई खूप चांगल्या शिकवायच्या नंतर मात्र हळूहळू शिंग फुटायला लागली.तो भाग तसा वेगळा आहे.

लिंकन

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/01/2013 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी हॉलिवूड मधील सर्वात जास्त अ‍ॅकॅडमी अर्थात ऑस्कर अ‍ॅवॉर्ड्स कुणाला मिळणार याचे उत्तर स्पिलबर्गचा "लिंकन" हा महीना-दिड महीन्यापूर्वी प्रकाशीत झालेला चित्रपट बघताना सहज मिळाले! मध्यंतरी वाचल्याप्रमाणे, डॅनिअल डे लुईस या ब्रिटीश नटास (खाली डावीकडील) स्पिलबर्गने लिंकनचे काम करशील का म्हणून विचारले. त्याने स्पिलबर्गला एक वर्षे थांबण्यास सांगितले. नाराजीने का होईना पण स्पिलबर्ग स्वतःच्या निवडची खात्री असल्याने थांबला. नंतर जो आला तो डॅनिअल डे लुईस नव्हताच....

रंगीत दहशतवाद

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 23/01/2013 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो. पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे.

स्वरमग्न - उस्ताद अमजद अली खाँ (२/२)

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 23/01/2013 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
Ustad_Amjad_AliKhan_Family (अमेरिकेतल्या भारतीय वकिलातीत एका उच्चपदस्थ अधिकार्‍यासमवेत उ. अमजद अली आणि परिवार) सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून 'स्थलांतरित' होत होत हे वाद्य अमजद अलींच्या 'बंगश' घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं.

घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 23/01/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना नाही जमेस काही आयुष्य मोजताना भाळून चालते का लाटेवरी कुणाच्या काळीज सागराचे घेऊन हिंडताना ना घातली हवा तू राखेस एकदाही सारी हयात गेली अंगार शोधताना आहेत कान त्यांच्या भिंतीस जाणतो मी आवाज होत नाही स्वप्नात बोलताना होतो बर्‍याचदा मी माझाच हाडवैरी बेभान अक्षरांचे आसूड ओढताना - उपटसुंभ
काव्यरस

आज नेताजी सुभाष जयंती

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 23/01/2013 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
akherJPG भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या व परकिय सत्तेवर निर्णायक घाव घालण्यासाठी 'आजाद हिंद सेनेला' घेउन शत्रूवर निर्णायक हल्ला करायला निघालेल्या व दुर्दैवाने स्वप्न साकार होण्याआधीच अनंतात विलिन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज त्यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त सादर वंदन.

'लेह' वारी, भाग ५

लेखक मनराव यांनी बुधवार, 23/01/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
'लेह' वारी, भाग १ 'लेह' वारी, भाग २ 'लेह' वारी, भाग ३ 'लेह' वारी, भाग ४ हा भाग टाकायला थोडा उशीर झाला... त्या बद्द्ल क्षमा असावी..... असो.... गरम गरम, चटपटीत मॅगी खाऊन थोडा वेळ बसल्यावर हॉटेलवाल्याचा निरोप घेतला आणि आम्ही दोघे रूमवर आलो. सगळा हिशोब केला आणि नव्या दिवसाची नवी सफर करण्यासाठी झोपी गेलो. सकाळी लवकर ५.३० लाच उठलो.

स्टफ्ड मेथी टिक्कि

लेखक दिपक.कुवेत यांनी बुधवार, 23/01/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
Tikki साहित्यः १. उकडुन / मॅश केलेले बटाटे - २ मध्यम २. हिरव्या मिरच्या - २ ३. बारिक चीरलेली मेथि - १ वाटि ४. पेरभर आलं ५. मुठभर कोथिंबीर ६. कॉर्न फ्लोअर - १ ते २ चमचे आवश्य्कतेनुसार ७. चवीनुसार मीठ ८. तेल - शॅलो फ्राय करण्यासाठि स्टफिंगसाठि: १. मक्याचे दाणे - १/२ वाटि (उकडुन भरडसर वाटणे) २. किसलेले चीज - १/२ वाटि (आपापल्या आवडिप्रमाणे; मी चेडार चीज वापरलय) ३. चवीनुसार मीठ (चीज मधे कितपत आहे त्या प्रमाणात) ४.

एगलेस होलव्हीट पॅनकेक

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 23/01/2013 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
eggless wholewheat pancakes नवीन वर्षातला नवीन प्रयत्न आहे, अंड युक्त पदार्थांचे अंड रहित पर्याय/ पाक्रु शोधून काढायच्या. ही पॅनकेक ची कृती मला, सई खांडेकर - माझी ब्लॉगर मैत्रीण, हिच्या ब्लोग वर सापडली. सामग्री: १ कप गव्हाचे पीठ १ कप रवा ३/४ कप साखर १ चमचा खायचा सोडा १ चिमुट मीठ २ कप दूध १ मोठा चमचा तूप कृती: - सर्व सामग्री एकत्र करा.

जाहिरातीमधील चुकीचे मराठी !!

लेखक अभिजित - १ यांनी बुधवार, 23/01/2013 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात. एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे - 'कन्या परक्याचे धन ' मानून घडवलं व्यक्तिमत्व छान सासरी करताना वाटे सार्थ अभिमान ----------------------------------------------- आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !! अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल. इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता. तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?