Skip to main content

विक्रांत वरील आयुष्य २

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 05/05/2013 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रांत ( किंवा कोणतीही विमानवाहू नौका) हे एक चालते बोलते शहरच असते. विक्रांत वर बेकरी होती आइस क्रीम तयार करता येत असे. तेथे तीन बेडरूम घरा एवढे कोल्ड स्टोअरेज होते. डॉक्टर म्हणून तुम्हाला तेथे प्रत्येक गोष्टीचे आरोग्यदायी वातावरण ठेवण्याच्या दृष्टीने पर्यवेक्षण फेरी(sanitary round)महिन्यात एकदा करावी लागत असे.यात स्वयंपाक घर जेवणाचा हॉल पासून अन्न आणि शिधा ठेवण्याच्या जागा सुद्धा तपासल्या जात असत.

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०४ : रोतोरुआ - ख्राईस्टचर्च - माऊंट कुक राष्ट्रीय उद्यान

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 04/05/2013 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 04/05/2013 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
----------------------------------------------------------------------------- एक सिगारेट पिणारी मुलगी - http://misalpav.com/node/24641 ----------------------------------------------------------------------------- हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..! आज तो दिसला, तब्बल तीन साडेतीन वर्षांनी .. ट्रेनमध्ये बसला होता.. एका मुलीबरोबर... मुलगी.?? अंह, गळ्यात लायसन झुलत होते तिच्या. सौभाग्याच्या ईतर ही सतरा खुणा, त्याची ताई किंवा वहिनी तर नसावी.. छे.. मग असे खेटून बसले नसते, ते ही ट्रेन बर्‍यापैकी खाली असताना.

आगंतुक

लेखक मूकवाचक यांनी शनिवार, 04/05/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या वर्षाचा हा पहिला महिना. नेमके बोलायचे झाले तर आज एकतीस जानेवारी. गेले तीस दिवस मी प्रचंड दडपणाखाली आहे. केव्हाही काहीतरी अघटीत घडेल अशी भीती आम्हा तिघांनाही सतावते आहे. एकतीस डिसेंबरच्या रात्री 'ती' पार्टी झालीच नसती तर बरं असं आता आम्हा तिघांनाही राहून राहून वाटतं. आम्हा तिघांव्यतिरिक्त त्या पार्टीला हजर असणारा आमचा मित्र रिचर्ड कॅरेक त्यादिवसापासून बेपत्ता आहे आणि त्याचा शोध घेण्याची हिंमत आम्हा तिघांमधेही नाही. त्या दिवशी कॅरेकने सांगितलेली त्याची चित्तरकथा अशक्य कोटीतली वाटेल अशी असली तरी ती पूर्णपणे काल्पनिक आहे असं आम्हा तिघांनाही वाटत नाही.

बुफे,अथवा खड भोजन

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 04/05/2013 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
भोजन नाही हा जमला बुभुक्षितांचा मेळा , आप्त ,स्वजन झाले भोजनासी गोळा , भोजनासी गर्दी झाली भारी , करती पहा कैसी मारामारी , गर्दी करती अन्ना भोवती , जैसी गिधाडे भक्षा भोवती , कोणी करेना कोणाची पर्वा , भ
काव्यरस

व्हेइकल

लेखक अर्धवट यांनी शनिवार, 04/05/2013 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
एसीचा एकसुरी आवाज, आणि हॉटेलच्या खोलीचा पिवळा पंडूरोगी प्रकाश, सेकांदामागून सेकंद, तासामागून तास चालूच.. एकटेपणा शरीरावर चढत जातो शेवाळासारखा. मनावर अंधाराचे थरच्याथर चढत रहातात बुळबुळीत बुरशीसारखे. आतल्याआत आक्रसून जायला होतं, खोल अंधाऱ्या गढूळ पाण्यातल्या कोशातल्या किड्यासारखं. त्या कोशातल्या अंधारातून बाहेरचं रंगीत जग दिसतं, पण कोश सोडता येत नाही, अनामिक आदिम भीती वाटत रहाते... एखादा जरी रंगीत कवडसा पडला तरी, एखादा नवखा जीव उत्सुकतेने पाहू लागला तरी, जीव घाबरतो, अजून आक्रसून घेतो आतल्याआत. तशी हालचाल चालू असतेच, जिवंतपणा असतो, पण तो असतो अतिशय भौतिक, जनावराच्या पातळीवरचा.

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०३ : रोतोरुआ - अ‍ॅग्रोडोम, ते पुईया आणि तारावेरा ज्वालामुखी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 04/05/2013 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 03/05/2013 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
नेपोलियनच्या इजिप्त आणि अन्य देशांच्या स्वार्‍यांमधून त्याला अगणित सोनेनाणे, जडजवाहिर, अमूल्य कलाकृती आणि दुर्मिळ ग्रंथसंपदा लाभली, हे सर्वविदित आहेच. पॅरीसच्या लूव्र संग्रहात यापैकी बहुतांश वस्तू संग्रहित आहेत. छत्रपती शिवाजी महारांजांचे डच चित्रकाराने रंगवलेले चित्र, हे त्यापैकीच एक. नेपोलियनच्या पाडावानंतर काही कलाकृती व इतर वस्तू अन्य लोकांच्या हाती लागून त्या आजतागायत पॅरिसमधील विविध पुराणवस्तू विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. गल्ल्या-बोळातील लहान लहान दुकानातूनही केंव्हा कोणती अमूल्य वस्तू आढळेल, हे सांगता येत नाही.

(जयपूर घटनेच्या निमित्ताने) अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी काय करता येईल?

लेखक Pearl यांनी शुक्रवार, 03/05/2013 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं. जयपूर अपघात पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही अरेरे मदतीसाठी थांबत नाही. अतोनात वाईट वाटले. खूप हेल्पलेस. माणूसकी संपली आहे का खरचं असं वाटत आहे. का झालं असावं असं. आणि असं परत होऊ नये म्हणून काय करता येईल. त्यावेळी काय करता येऊ शकलं असतं.

धरण उषाला कोरड घशाला

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 03/05/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
खिशामध्ये हात घालुन काही तरी खात होता एका हातात हांडा घेऊन घाईघाईने जात होता रखरखीत ऊन्हात वहात होत्या घामाच्या धारा विचारले आम्ही त्याला कुठे जातोयस रे पोरा त्यानेही अगदी सहजतेने आम्हाला उत्तर दिले घरी आहेत आई वडिल तहाणेने व्याकुळलेले कष्ट करुन त्यांना आलेय थोडी कणकण पाण्यासाठी आमची होतेय अशी वनवन शेजारच्या गावामध्ये म्हणे टँकर येतोय दोनदा बघतो तिथे मिळ्तोय का पाण्याचा एखादा हंडा तसं तर धरण पण आहे आमच्या गावाच्या उषाला पण म्हणतात ना धरण उषाला अन कोरड घशाला आमच्या ही बाबतीत असच काही तरी घडलय धरणातले पाणी शेजारच्या जिल्ह्यांना सोडलय तुमच तर काय साहेब बिसलेरी बाटलीवर भागत हांडाभर पाण्यासाठी आम
काव्यरस