Skip to main content

भ्रांत....?

लेखक psajid यांनी शुक्रवार, 30/08/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुना एकांत मनांत भ्रांत, कसे जगावे तुझ्यासवे ? तू गुणांची 'माया' मनाची, ओंजळ फुलांची सुगंधित ! प्रेम मनांत मन बंधनात, विरह आघात पिढ्यानपिढ्या ! मन पारवा ओला गारवा, तरी हा आघात वारंवार ! खंबीर होई विरुद्ध लढाई, तन बंबाळ जखमांनी !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी (सान्गली)
काव्यरस

गुरुंजींचे भावं विश्व! भाग-३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 30/08/2013 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुंजींचे भावविश्व! भाग २-http://www.misalpav.com/node/25318 ... पुढे ... हा सवाल-जबाब टाकलेला आमचा कोल्हापुरी मित्र वाणीनी तिखट असला,तरी मनानी अगदी लोण्यासारखा मऊ आहे.एकदा बाहेरगावी एका "अठवडी" कामाला गेलो असतांना,रात्रीचं जेवण झाल्यावर सोबतीनं तंबाखू मळता मळता मला एक मजेशीर प्रश्न विचारून गेला , "आत्म्या.. हा आपला धंदा आणी ह्यातली ही आपल्यासारखी मानसं..कोणच्या पन क्षेत्रात गेली,तरी अशीच हिट'ला जातील का रं !?

वेगळी आहे

लेखक कैलास गायकवाड यांनी शुक्रवार, 30/08/2013 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
पारदर्शक वागण्याची आंधळी स्थित्यंतरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे खोल गर्तेतील जाणिव उन्मळावी सारखी संपल्यावरती पुन्हा इच्छा बळावे आणखी सूर्य,तारे,चंद्र सारे टांगलेली झुंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे सुप्त इच्छा गुप्त होता लुप्त झाली वादळे लाट येते लाट जाते की किनारी आदळे वेदना,दु:खे ,निराशा माजली अवडंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे ओलसर अंतर्मनातिल पापणी तर कोरडी धडधडत शिरते उरी संवेदना माजोरडी पोट भरल्यावर कशाने वासरागत हंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे वादळाने वादळागत वादळावे वादळा मी मला जपणार अन जपणार हा गोतावळा जीव गेला ,जावु दे त्याची कुणाला खंत रे वेगळी आहे धरित्र

गोविंदा २०१३

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 29/08/2013 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी दहीहांडीचा उत्सव पाहता येईल की नाही अशी जरा शंका होती...पण तस काही झालं नाही.ऑफिसातुन घरी आल्यावर बॅग ठेवली आणि लगेच दहीहांडी पाहण्यासाठी आणि तीचे फोटो तुमच्यासाठी काढण्यासाठी खाली पळालो.

Come on बारक्या.....fight!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 29/08/2013 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज २९ ऑगस्ट - आपला राष्ट्रीय क्रीडा दिवस. लहानपणी .. म्हणजे लपाछपी, चोर - पोलीस, आप्पारप्पी, लगोरी वगैरे खेळांतून "ग्रॅज्युएट" होऊन "स्पोर्ट्स" ह्या प्रकारांत गणले जाणारे खेळ खेळायला लागलो तेव्हा......त्या पांढरे कपडे घालून तांबड्या चेंडूनी खेळायच्या खेळानी वेड लावलं आणि आयुष्यात पहिल्यांदा हिरव्यागार मैदानांवर पाऊल पडलं. कपिल देवसारखी अॅक्शन करणं... "वन डाऊन" बॅट्समन असल्यामुळे हेल्मेटखाली संजय मांजरेकरसारखी पट्टी बांधणं वगैरे चावट उद्योग चालू होते. अझरुद्दीन, इम्रान, रिचर्ड्स वगैरे हीरोज होते... शाळेतून पळून जाऊन मित्राच्या घरी टीव्ही बघणं व्हायचं... सगळं यथास्थित चालू होतं.

स्वप्न

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 29/08/2013 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच आसवांना मी रोखुनी पहावे ह्रुदयात गुंफ़लेले ते गीत मी पुसावे समजाविते मला मी, ते एक स्वप्न होते काट्यात गुन्तलेले ते एक फ़ुल होते माझ्यासमोरुनी तो मार्गस्थ सुर्य झाला माझी दिशा तरिही तम होवुनीच उरली फ़सवेच हे तरन्ग मी मानले जीवाचे नजरेसमोर माझ्या,हे स्वप्न भग्न माझे गुंतेल जीव असला मज वाटले ही नव्हते खोटाच तो जिव्हाळा, ते बेगडीच नाते का व्यर्थ दोष द्यावा, सारी अशीच नाती ह्रुदयी विसावली ती , माझी कट्यार होती उधळुनी स्वत्व आता, झाले रिती मनाने तु वाट वेगळी ती ,बघ चालशी सुखाने

कृष्णलीला..

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 29/08/2013 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे दोन-चार स्पीकर्स तर कुठे दहा फुटांच्या डॉल्बीच्या अजस्त्र भिंती.. कुठे पाच-दहा हजाराचं शुल्लक बक्षीस तर कुठे एक कोटीचं.. कुठे भगव्या टि-शर्टमधल्या कार्यकर्त्यांचा घोळका तर कुठे पांढर्‍या... कुठे गोविंदा रे गोपाळा तर कुठे मच गया शोर सारी नगरी रे.. कुठे चार-पाच थरांचा तर कुठे विश्वविक्रमाशी बरोबरी करणार्‍या नऊ-दहा थरांचा थरार.. कुठे हाता-पायावर निभावतं तर कुठे जिवाशी जातं.. कुठे मानाची तर कुठे जगातली सर्वात मोठी.. कुठे हिंदी तारे-तारका तर कुठे मराठी.. कुठे लावणीतलं या रावजी तर कुठे हिंदीतलं चिकनी चमेली.. उत्तराखंडमधली मोठ्ठी नैसर्गिक आपत्ती..पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी दाभोळकर

सुदामा

लेखक सार्थबोध यांनी गुरुवार, 29/08/2013 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
काय वर्णन करू, त्या पामराचे सदनी दारिद्र्य, अठरा विश्वाचे जाहला गृहस्थ, पाश गरिबीचा स्मरे परंतु मेळा, गोकुळाचा ll १ ll दशा वाईट, भविष्य होय अंध उदर भरण्या, रोजचा आक्रंद स्मरणात तरी, होता गोपालवृंद इच्छा पाहण्या, पुन्हा तो मुकुंद ll २ ll करुनी विचार, निश्चय केलासे मनोमनी स्मरण, माधवाचे भेटस्वरूप काय, मित्रास न्यावे? कल्लोळ मनी, त्यास काय आवडावे ll ३ ll घरात नाही, एकही उपलब्ध दाणा कृष्णाचा मित्र, उगीच का रे म्हणा ! शिळे पोहे पुरचुंडी, घेतली शेवटी त्याच्या ठायी, तीच शक्य होती ll ४ ll आला द्वारकेस, उपाशी थकलेला काम टाकून, माधव भेटीस धावला धरिले पाय, हतबल सुदाम्याने तो सावळा मित्र, आलिंगन

अजाणता

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 29/08/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
अजाणता जाणले कसे इप्सित शब्दांनी मनातले भातुकलीने लक्ष्य वेधले गतकाळात विखुरलेले चिमणी पोपट बुलबुल आदी सवंगडी सारे जमले चित्त हरखले हरली चिंता वय उरले शैशवातले बडबडगाणी हिरव्या रानी राज्य परीचे सापडले नितळ मोगरी अवकाशावर बाळ निरागस बागडले …………… अज्ञात
काव्यरस

ज्ञानदीप उजळू दे..

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 29/08/2013 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा? नूतन समर्थ विद्यालय, विजय मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २. विद्यार्थीवर्ग? आजूबाजूच्या वेश्यावस्तीतील आणि इतर कामकरी वर्गातील मुले. दुसर्‍या एका संस्थळातर्फे चालवल्या जाणार्‍या काही चांगल्या उपक्रमांमध्ये मला सहभागी व्हायची संधी मिळाली आहे, त्यापैकी हा एक उपक्रम. ह्या उपक्रमातून गेली काही वर्षे ह्या छोट्यांना शिक्षणासाठी मदत करत आहोत आणि सातत्य राखण्याचाही प्रयत्न करत आहोत.सावली सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ही मदत केली जाते.