Skip to main content

अजाणता

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 29/08/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
अजाणता जाणले कसे इप्सित शब्दांनी मनातले भातुकलीने लक्ष्य वेधले गतकाळात विखुरलेले चिमणी पोपट बुलबुल आदी सवंगडी सारे जमले चित्त हरखले हरली चिंता वय उरले शैशवातले बडबडगाणी हिरव्या रानी राज्य परीचे सापडले नितळ मोगरी अवकाशावर बाळ निरागस बागडले …………… अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1189
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

बडबडगाणी हिरव्या रानी राज्य परीचे सापडले नितळ मोगरी अवकाशावर बाळ निरागस बागडले
हे खासचं!! आवडले.

बडबडगाणी हिरव्या रानी राज्य परीचे सापडले नितळ मोगरी अवकाशावर बाळ निरागस बागडले हे मला़ही आवडले !