Skip to main content

भ्रांत....?

लेखक psajid यांनी शुक्रवार, 30/08/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.

सुना एकांत
मनांत भ्रांत,
कसे जगावे
तुझ्यासवे ?

तू गुणांची
'माया' मनाची,
ओंजळ फुलांची
सुगंधित !

प्रेम मनांत
मन बंधनात,
विरह आघात
पिढ्यानपिढ्या !

मन पारवा
ओला गारवा,
तरी हा आघात
वारंवार !

खंबीर होई
विरुद्ध लढाई,
तन बंबाळ
जखमांनी !!

श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी (सान्गली)

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 744
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मन पारवा
ओला गारवा,
तरी का दूरावा
वारंवार !
असे असते तर....बाकी कविता आवडली.