Skip to main content

मराठी भाषा दिन लघुकथा स्पर्धा -निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी शनिवार, 28/02/2015 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मराठी भाषा दिनानिमित्त आपण लघुकथा स्पर्धा आयोजित केली होती.तिला सदस्यांचा छान प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यास आनंद होत आहे. या स्पर्धेसाठी सदस्यांपैकी स्पा,स्वॅप्स,प्रभाकर पेठकर,इनिगोय, स्पार्टाकस आणि संपादकांमधुन पैसा,लीमाउजेट,अजया,विकास यांनी परीक्षण केले. परीक्षणाचे थोडक्यात निकष(स्वॅप्स यांच्या शब्दात) पुढीलप्रमाणे: लघुकथा ही किस्सा आणि कादंबरी यांच्यामधला साहित्यप्रकार म्हणून गणला जातो, तसेच त्याला स्वतंत्र आविष्कार म्हणूनही गणले जाते.

वख्तने किया क्या हसीं सितम

लेखक शरद यांनी शनिवार, 28/02/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
वख्तने किया क्या हसीं सितम भातुकलीच्या खेळातील राजाराणींची ताटातुट काही नवीन नाही. या विश्वातील व्यापार इतका अतर्क्य, अनाकलनीय, असतो की जे घडत असते ते हताशपणे पहाणे एवढेच माणसाच्या हातात असते. भातुकलीतील लाकडी बाहुल्यांप्रमाणे ! कवी ही घटना कशी हाताळतो हे त्याच्या तरल कल्पनाशक्तीवर, शब्दप्रभुत्वावर, त्याने योजलेल्या कवितेच्या घाटावर, वापरलेल्या शब्दांवर, त्यांच्या चपखलपणावर, अचुकतेवर, काय सांगितले यांपेक्षा काय सांगितले नाही -फक्त सुचवले आहे यांवर अवलंबून असते. तुमचा आक्षेप, " हे तर सर्व कवितांमध्येही अधोरेखितच असते", मान्य आहे.

चांगदेवपासष्टी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 28/02/2015 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवांना अनेकानेक शुभेच्छा ! माझा मराठाचिये काय बोलु कौतुके ! अमृता तेही पैजा जिंके ! ऐसी अक्षरे रसिके ! मेळवीन !! मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे/ समृध्दीस्थळे म्हणल्यावर मनात पहिला विचार आला तो माऊलींचाच . संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवदगीतेवर मराठी भाषेतील टीका जी की भावार्थदीपीका अर्थात ज्ञानेश्वरी लिहुन सर्वसामान्य जनांवर जे उपकार केले आहेत त्याचे वर्णन करावे तरी कसे ? जशी जशी ज्ञानेश्वरी वाचत जातो आणि जशी जशी ती उमगत जाते तसे तसे संत ज्ञानेश्वरांना पुरुष असुनही "माऊली" असे का म्हणतात ते कळायला लागते .

दिन्याचा राजा

लेखक म्हया बिलंदर यांनी शुक्रवार, 27/02/2015 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिन्याच्या राजाला काळी प्यांट इन केलेला शर्ट घालून एका उंच स्टुलावर चढून आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घराच्या पत्र्यावरून काढताना पाहून मजा वाटली. दुसरा कोणी असता तर लक्ष्य गेलं नसतं पण हा दिन्याचा राजा होता दिन्याचा राजा. हा तसा माझ्या हून वयाने लहान. आम्ही घर बदलून ह्या वस्तीत येऊन नुकतेच राहू लागलो होतो. नवे मित्र बनवत होतो. आमच्या क्रिकेट खेळायची जागा म्हणजे दारा समोरून जाणारी वाट. तिच्या शेवटी भंगारचा धंदा करणार्‍या खान अंकलचं घर आडवं गेलेलं. त्याच्या भिंतीला लागला की सिक्स. सगळी घरं बैठी.

म्हण (शतशब्द्कथा)

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 27/02/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
''बाबा , फॉक्स तर फ्रूट्स नाई खात ना?'' नाही बेटा . ''मग इथं गोष्टीत कसं लिहिलंय ?'' बघू . ती म्हण आहे, म्हण . ''काय म्हणू?''' अगं तू काई म्हणू नकोस, त्याला 'म्हण' असं म्हणतात. लहानशा गोष्टीतून काहीतरी सांगितलेलं असतं . ''पण फॉक्स तर नॉनवेज खातो ना?'' तसं नाही बेटा - कुणाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तो म्हणतो ना -'' मला तर ती नकोच होती '' - त्याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षं आंबट - कारण कोल्हा पण असाच लबाड असतो. *** जयाकाकू आलेल्या. सारखं बोलतच रहातात .

चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 27/02/2015 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला गर गर फिरणारा भोवरा.. बनुन बघायचय मला भरारणारा तो पतंग- त्याची ती उंची; वा-याशी दोस्ती काटाकाटीची मस्ती... वेगळच जगण अनुभवायचय मला! चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला! Born clerk... died clerk सगळेच असतात; वेगळा option click फ़क्त थोडेच करतात; त्या थोड्यांमद्धे रहायचय मला... चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला! White color job आपला फंडा नाय... कोप-यावरच्या पक्याचा रुबाबसुद्धा जमत नाय.. एक वेगळ आयुष्य जगायचय मला... काय अन् कस कोणी सुचवतय का ज़रा? I.A.S., I. P.S.

मराठी भाषा दिनानिमित्त

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 27/02/2015 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज कविवर्य कुसुमाग्रजांचा म्हणजेच वि. वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. साजरा म्हणजे कसा? व्हॉट्सॅप फेसबुक ट्विटर वर हे शेकडोच्या शेकडो संदेश. मोठाले मोठाले संदेश. कविता काय, चित्रं काय, सुमार नाही. आजही तसंच चालू आहे. नाही नाही; माझा त्याला आक्षेप नाही. मुळीच नाही. पण शंभर संदेश पाठवल्यावर एकदा तरी आपण विचार करावा असं वाटतं. विचार हा, की संदेश पाठवण्यापलिकडे आपण खरोखर आपल्या भाषेवर प्रेम करतो का? 'अभिमान नव्हे; माज आहे' म्हणणा-या आपल्या वागण्यात तो माज दिसतो का?

मदतकेंद्र: सल्ला , मार्गदर्शन, साहाय्य, समुपदेशन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 27/02/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लग्नाला १० वर्षे झालीत मला दोन मुले आहेत माझे मि खूप दारू पितात घरात सारखे तणाव राहतात मि ग्राम प कामाला आहे मि शाळे वर कामाला जाते पार्लर टाकले पण चालत नाही ते घरात आम्हाला पैसे देत नाहीत आई वडील काही म्हणत नाहीत माझे सासरे देखील दारू पितात गांजा पितात पता खेड तात तसेच मासाहार करतात पै कमी पडले कि बहिण आई त्या दोघांना देते .कृपया मला मदत करा त्यावर उपाय सागा सेवा काय करू कि वाद होणार नाहीत माझ्या जवळ पैसे येतील . -सौ स. श. रा.

मायमराठीची लेणी: स्त्रीगीते (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक पैसा यांनी शुक्रवार, 27/02/2015 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
"माझा मराठाचि बोलु कवतुके, परि तो अमृतातेहि पैजा जिंके|" असं ज्या मर्‍हाटीचं वर्णन ज्ञानोबामाऊलींनी केलं त्या मायमराठीला तिच्या ज्ञात अज्ञात लेकरांनी असंख्य लेणी चढवली. पूर्वापार म्हणी, वाक्प्रचार, लावणी, पोवाडे, आर्या, गण-गौळण, गोंधळ, भारुड, बतावणी, अभंग, भजने, कटाव, फटके एक ना अनेक. त्यात एक महत्त्वाचे लेणे म्हणजे स्त्रीगीते. मर्‍हाटमोळ्या स्त्रियांच्या कष्टाचा उद्गार या स्त्रीगीतांतून नानापरीने व्यक्त झाला आहे. ज्ञानदेवांच्याही पूर्वी महानुभावी पंथातील धवळे रचणारी महदांबा ही पहिली ज्ञात मराठी कवयित्री मानायला हरकत नसावी.