Skip to main content

कुरुडुमळे आणि मुलबागल

लेखक पॉइंट ब्लँक यांनी गुरुवार, 12/03/2015 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
कुरुडुमळे हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, बेंगलोरपासून अवघ्या १०० किमीच्या आत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच. कौडिण्य ऋषींनी येथे एका टेकडीवर तपश्चर्या केलली. बेंगलोरहून कोलार आणि तेथून जवळपास तीस किमी हायवेवर जायचे. मुलबागल हायवे सोडून तीन किमीवर आगे. मुलबागालहून कुरुडुमळे अवघ्या आठ किमॆवर आहे.. ह्या गावात एक गणपतीचे आणि एक सोमेश्वराचे मंदिर आहे. गणपतीची मूर्ती अंदाजे बारा (काहि ठिकाणी चौदा लिहिले आहे) फूट उंचीची असून एका अखंड शाळिग्राम दगडात कोरली आहे. ही मूर्ती किती जुनी आहे ह्याची कुठेही नोंद नाही. चौदाव्या शतकापर्यंत हा गणपती उघड्यार होता.

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 12/03/2015 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
आळस देत मान वर काढता आली असती जग म्हणजे काय ते बघता आलं असतं हुशारपणाचं ओझं जरा हलकं झालं असतं कधी वाटतं ढ असतो तर बरं झालं असतं ||धृ|| पुस्तकांच्या उगाचच राशी जमल्या नसत्या गणित बिणीत गोष्टी मुळीच गमल्या नसत्या धरल्या असत्या रोज खपल्या हाता पायांवर क्रिकेट खोखोच्या मॅचेस रोज रंगल्या असत्या कट्ट्यावर मग गप्पा मारत बसता आलं असतं ||१|| शाळेपुरतीच नसते हुशारपणाची जोखड नोकरीमध्ये सुद्धा होत रहाते धडपड डिग्र्या हव्या, पोझिशन हवी, पैसे हवे नाही का! हुशार असून वाया गेला लागायला नको शिक्का तेंव्हा वाटत असून बरंच काही करता येत नसतं ||२|| ढ असणं कधी कधी वरदानच मुळी असतं तुमच्याक
काव्यरस

हात झाले काळे!

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 12/03/2015 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव बुधवारी कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी म्हणून निश्चित झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २००५ मध्ये कोळसा खाणींचे वाटप झाले होते. कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को समूहास ओडिशातील तालिबारा दोन व तीनमधील खाणींचे वितरण करण्यात आले होते. यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. त्यात मनमोहन सिंग यांना आरोपी करण्यात आले नव्हते. गतवर्षी ऑगस्टमध्ये सीबीआयने सादर केलेला 'क्लोजर' अहवाल न स्वीकारता न्यायालयाने मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्याची सूचना केली होती. या पाश्र्वभूमीवर मनमोहन यांना बुधवारी विशेष न्यायालयाने 'आरोपी' म्हणून समन्स पाठवले.

पुण्यनगरी !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 12/03/2015 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते. एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा." समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?" ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने" आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ? काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या.

पासवर्ड कसे सांभाळावेत

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 12/03/2015 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
इमेल -पासवर्ड इमेल आणि इतर नेटवर्क साइटस यांचे पासवर्ड तसेच काहींचे सिक्यूअरटी क्वेश्चन वगैरे कुठे साठवायचे? कसे लक्षात ठेवायचे? लिहून ठेवणे योग्य होईल काय? कृपया माहितगारांनी आपले उपाय सुचवावेत.

एक संवाद - १

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 12/03/2015 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
एक नामांकीत सॉफ्टवेअर कंपनी. संगणकावर चॅटींग सोफ्टवेअरवर चालू असलेला संवाद - तो - हाय ती - हेलो तो - कधी आलीस ? ती - आत्ताच आलीय. १५ मिनिटे झालीत. ट्राफिक जास्त होते आज. तो - ओके, चहा झाला का? ती - नाही जातेय आता. तो - मीपण जातोय चहासाठी, कँटीन मध्ये येतेयस का? ती - नाही मी जागेवरच चहा घेऊन येतेय. तो - ठीक आहे. डब्यात काय आणलं आहेस ? ती - कालचा उरलेला भात होता त्याला नवऱ्याने फोडणी दिली, तोच घेऊन आलेय. तो - ओके. लकी आहेस. ती - का ? तुला नाही का करून दिले काही बायकोने? तो - तीचे जाउदे गं…. तुला माहीत आहे ना.

दीक्षितांचा दणका

लेखक पिंपातला उंदीर यांनी गुरुवार, 12/03/2015 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्ट ,अन्यायी आणि कुणालाही आपल्या पाशवी शक्तीने चिरडून टाकण्याची क्षमता असणारी सिस्टम आणि या सिस्टम विरुद्ध उभा ठाकलेला एक सर्वसामान्य माणूस. हा लढा अर्थातच खूप विषम आहे . पण सगळ्यात भारी गोष्ट ही की कधी कधी या युद्धात सर्वसामान्य माणूस पण जिंकू शकतो . प्रचलित सर्वशक्तिमान व्यवस्थेने कितीही आसुरी बळाचा वापर केला तरी . या लढ्यात रोजच्या अवघड जगण्याला पिचलेली आणि कुठल्याही कामासाठी चिरीमिरी द्यावी लागणारी जनता नेहमी व्यवस्थे विरुद्ध उभा ठाकलेल्या माणसाच्या मागे उभी राहते हा जागतिक नियम .

गृहिणी......आदरांजली-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2015 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आदरांजली-२ इस्मत चुगताई : (१९११-१९९१) त्यांच्या काळातील बंडखोर व रुढींवर, ढोंगीपणावर विनोदाच्या अंगाने आसूड ओढणारे लेखन ही यांची खासियत. त्यासाठी त्यांनी बरीच किंमत मोजली पण चातुर्याने त्या त्यातून सहिसलामत पार झाल्या. त्या काळात असे लेखन करणे किती अवघड असेल याची आपण कल्पना करु शकतो.... का आजच्या काळात ते त्याहून कठीण आहे ......? या कथेत पुरुषी अहंकार, एका स्त्रीकडे माणूस म्हणून न बघता स्त्री म्हणूनच बघण्याचा समाजाचा हट्ट, चांगल्या घरची व वाईट घरची हा भेदभाव, नैसर्गिक भावना, बंधने, माणसाच्या मनात चाललेले खेळ..... इ.वर इस्मतआपाने चांगला प्रकाश टाकला आहे.

" The Original Love Story" ( Part 2)"

लेखक विनित राजाराम धनावडे. यांनी गुरुवार, 12/03/2015 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
" सुची भेटलेली ...... ? पुण्याला ..... ? " थोडावेळ विनू तसाच उभा होता गोंधळलेला , काहीच कळलं नाही त्याला , अचानक एक वीज कडाडली , तसा विनू दचकला . , " बापरे , किती मोठयाने वीज कडाडली , पडली असेल कूठेतरी नक्कीच . " विनू भानावर आला . " आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत ? खरंच फोन आलेला की भास झाला ? " काहीच समजत नव्हतं. अश्यातच १० मिनिटं गेली , फोन काही वाजला नाही, " आपल्याला भासच झाला असणार ." असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोडयावेळाने पुन्हा फोन वाजला , " hello , ....... अरे आहेस का विनू . " , " हो .....