Skip to main content

मृगजळ...

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 14/03/2015 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदेशी फिरताना जेव्हा नवलाईची हौस फिटलेली असते कर्तृत्वाच्या अश्व्मेधावर पळताना घरचे अंगण दूरावलेले असते कमावले काय,गमावले काय आयुष्याचे सगळे गणितच चुकलेले असते तेव्हा कळते कि, ज्याच्यामागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते इथल्या माझ्या राजवाड्यात आता माझ्याशिवाय कुणीच बोलत नाही उशिरा उठल्याबद्दलचा आईचा ओरडा आता दूरुनही ऐकू येत नाही मिळवलेल्या यशाबद्दलची बाबांची शाबासकी आता पाठीवर पडत नसते तेव्हा कळते कि, ज्याच्यामागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते रस्त्यावरच्या गर्दीतुन मिसळताना,मन मात्र एकाकी होउन जाईल तेव्हाच समोरुन आपल्या मित्रांची छबी हलकेस ओझरून जाईल वळुन पाहिले तर ती अनोळखी गर्दी आपा

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 13/03/2015 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत
अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

महात्मा जोतिबा साहित्य नगरी (वर्धा) :

काय करावे? धंदा-उद्योग की?

लेखक उडन खटोला यांनी शुक्रवार, 13/03/2015 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मंडळी. माझ्या "नक्की किती पैसे पुरेसे?" या धाग्यावर ज्या मिपाकरांनी सल्ले दिले होते त्यांचे मनापासून आभार मानून आज एक नवीन मुद्दा उपस्थित करत आहे. तर मंडळी सध्या मी कोकणातील घरी निवृत्त जीवन जगत आहे. जोडीला एम्टीडीसी च्या न्याहरी निवास योजनेमध्ये सहभागी होवून घरातील काही खोल्याचा वापर पर्यटकांसाठी देवून त्यातून महिन्याला काही रक्कम उभी राहते. ज्याना या उन्हाळ्यात कोकणात यायचे असेल अशानी जरूर संपर्क करावा! तर आमच्याकडे वरील न्याहारी निवास योजने अन्तर्गत काही पाहुणे गेल्या आठवड्यात आले होते . त्यातील एक सुमारे चाळीशीचा दाढीधारी इसम होता .

माझे पहिले रक्तदान (?)

लेखक सौन्दर्य यांनी शुक्रवार, 13/03/2015 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा ओलांडून कॉलेजमध्ये पाय ठेवला आणि जणू पंखच फुटले. शाळेतील शिस्त, तो कंपल्सरी करावा लागणारा गृहपाठ, तो युनिफॉर्म,कश्श्या कश्श्याचं मुळी बंधनच उरले नाही. त्यात आसपास विहरत असलेली फुलपाखरे बघून, “धरतीपर अगर कही स्वर्ग है, तो वो यहीं है, यहीं है, यहीं है” म्हणावेसे वाटू लागले होते. त्यातच एक, पु.लं.च्या ‘म्हैस’मध्ये वर्णन केल्यासारखी एक ‘सुबक ठेंगणी’ मनात भरायला लागली होती. आम्ही तिचे नामकरण ‘साठे’ केले होते, म्हणजे ‘साजेशी ठेंगणी’चा शॉर्टफॉर्म. ती आमच्याच वर्गात होती त्यामुळे तिच्या निमित्ताने का होईना वर्गात बसायला लागलो होतो. ती हुशार होतीच आणि त्याच बरोबर कॉलेजमध्ये फार अॅक्टिव्ह होती.

तरीसुद्धा ...

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 13/03/2015 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
सारं तसं ठीक आहे संथ जीवन चालले आहे तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे । तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …। दूर तू गेलीस त्याला एक तप उलटून गेले पाण्यासारखे क्षण सुद्धा इकडे तिकडे वहात गेले तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे । तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …। लग्न संसार मुलं-बाळं दोघं गुंतून गेलो आहोत रुळलेल्या वाटेवरुन खड्डे टाळत चालत आहोत तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे । तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …। मेघ कधी बरसत नाही , दूर ही निघून जात नाही सावली देणं टाळत नाही, साथ देणं विसरत नाही मनाच्या आभाळात होतीस तिथेच तू आहेस तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।

विलंब शुल्क.

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 13/03/2015 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझे भ्रंमण संचाचे महिन्याला बील ( देयक) येत असते आणि मी किती पैसे भरायचे हे पाहुन संकेतस्थळाच्या साह्यानेच भरत असतो. यावेळेस नकळतच मी सर्व रकाणे पाहत होतो, उदा. मागचे देयक, भरलेले पैसे, या महिन्याचे देणे, किती तारखेपर्यंत भरावयाला हवे आणि न भरले तर विलंब शुल्क. यात पाहता पाहता माझ्या लक्षात आले की देयक ४०० रुपये होते आणि विलंब शुल्क १०० रु जास्त असे दाखवलेले होते. सहज सहज हिशोब करता लक्षात आले की अंदाजे २० % विलंब शुल्क म्हणून लावलेले होते, पूर्वीही वीज देणे / दूरध्वनी चे देयक रु.१५० असेल तर ५ / ७ रु विलंब शुल्क असे. मोबाईल कंपन्या इतके विलंब शुल्क कसे लावु शकतात याचाच मला अचंबा वाटत आहे.

प्रतिशब्द

लेखक आकाश खोत यांनी शुक्रवार, 13/03/2015 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
"मंडेला ऑफिसला जायला खूप बोर होतं यार…" "यावेळेस दिवाळी कोणत्या डेटला येतेय?" "अक्खा विक मला ऑफिसमध्ये खूप उशीर झाला… इतका लोड आहे कामाचा. वर्क प्रेशर आहे. सगळेच टेन्शनमध्ये आहेत. " हि आपल्या रोजच्या बोलण्यातली अगदी साधीसुधी वाक्ये. ऑर डेली लाईफमधली युज्युअल सेंटेंसेस. ह्यात मराठी किती आणि इंग्लिश किती ते पहा. आपल्या कळत नकळत आपण आपल्याच भाषेतले साधे सोपे शब्द बाद करत चाललो आहोत. हे मराठीचं रडगाणं ऐकवायला मी सांगत नाहीये.

असा मी अबब मी - ३

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 13/03/2015 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ लेखांकाला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. पट्टरुंदी अर्थात बॅण्डविड्थ कमी पडल्यामुले चित्रेच चढवता येत नव्हती. माझ्या खेडेगावातल्या २जी सेवेवर जमलेच नाही. शेवटी सायबर कॅफेमधून हे काम करावे लागले. असो. गेल्या लेखात चढवू शकलो नाही ते चित्र.

मत्कविता चालली ही!

लेखक पदकि यांनी गुरुवार, 12/03/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मनवनात पातलीस.. मन्मनात मधुगडबड मन्मानस-हंसिनीस हृत्कोमल मधुबडबड! (मत्कविता चालते ही आगगाडी जर धडधड मद्रसिका का करिसि व्यर्थ अशी ती रडरड ?) : मिलिंद पदकी