तीर्थ
तीर्थ कुठले ? इथे कसे?
कुणी आणले?
काय तो आस्तिक!
कोण त्याचा देव?
काssssही विचारु नका.
तीर्थ घ्या.
ठरले एकदा तीर्थ आहे! तर आहे.
वाद नको. विचार नको.
गंगा काय न् नर्मदा काय....
याच समुद्रात मिसळतात!
बसा निवांत.
तीर्थ घ्या.
बाहेर दंगा आहे फार.
जरा मनातच लोळा.
आकांत नका मांडू
एकांताचा.
तीर्थच ठेवा ना उशाला!
रात्र टाका पायथ्याला.
तीर्थ घ्या.
तीर् घ्या.....
मिसळपाव
आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी,
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋूतू तरी
काळ्या ढेकाळांच्या गेला
गंध भरुन कळ्यात
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत
कविवर्य बा.सी.मर्ढेकरांनी श्रावणाचे केलेले हे वर्णन प्रत्येक वर्षी श्रावण आला आठवत राहते. श्रावणाचे हे मोहक रुप कथा कादंबऱ्या, कवितांमधून वाचताना होणारा आनंद कुठे हिरावलाय कोण जाणे? श्रावण सरी कुठे लोप पावल्या?