Skip to main content

चला अंताक्षरी खेळूया....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 13/09/2015 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
जुनाच पण सदाबहार खेळ !! इच्छुकांनी सहभागी व्हावे...... मेरे मेहबूब कयामत होगी.... आज रुसवा तेरी गलियोमे मोहब्बत होगी... मे री न ज रे तो गि ला क र ती है.... तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी.... पुढचे अक्षर "ग"....
काव्यरस

लखलाभ!

लेखक रातराणी यांनी रविवार, 13/09/2015 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
तू ये वाचली आणि त्यातला आव्हानाचा टोन भयंकर आवडला. त्यात आज आमच्या राशीत जिलबी पाडू योग आलेला दिसत असल्याने आम्ही लगेच वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. चू. भू. द्या. घ्या. रानोमाळ भटकणारे तुझे निर्णय, आणि जर तरच्या लाटांवर हेलकावे खाणारी तुझी नौका, तुझा किनारा असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे! माझी नौका तारून न्यायला क्षितीजाच्याही पार! पेन्सील वापरायची तुझी जुनी सवय, कारण झालेल्या चुका खोडता येतात, बरोबर उत्तर लिहण्यासाठी तुझी कोरी वही असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे!
काव्यरस

शिंदळ : आक्रमकांची नवी फळी

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 13/09/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
( १.यल्लम्माच्या आवारातल्या कथा आता 'शिंदळ' याच नावानं टंकत जाईन, प्रत्येक कथा स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न असेल, अर्थात वाचकांना आवडले तरचं, उगाच मिपाची बँडविड्थ खर्ची नको- आभार २. केवळ एक पार्श्वभुमी म्हणुन 'शिंदळ' ही कथा वाचा. www.misalpav.com/node/32762 ) शिंदळ : आक्रमकांची नवी फळी यल्लम्माचं देऊळ गर्द अंधारात उभं होतं. देवळाच्या चहुबाजुंनी प्रदक्षिणेसाठी कठडा होता. देवळासारखाच लहान. त्यावरच दत्ता पहुडला होता. देवीची ओवाळणी लुटणारे इतर लहानगे चोर कधीच घरी परतले होते.

चाय पे चर्चा/ आवळ्याचे तेल देशी/ विदेशी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 13/09/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली. चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली.

खुलेआम अफ़गाण जलेबी धागा- आपला आवडता स्तंभ कोणता ?

लेखक मारवा यांनी रविवार, 13/09/2015 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
जलेबी धागा हि अतिशय उपयुक्त संकल्पना आहे. जलेबी खाणे जलेबी पाडणे या अत्यंत मधुर गोष्टी आहेत. या गोड उपक्रमाला जाहिर व जोरदार पाठींबा म्हणुन मी हा धागा काढत आहे. तसा प्रत्येक धागा हि जलेबी च असते असे माझे मत आहे. तर यात लपवाछपवी कशाला उगाच ? म्हणुन मी आज सर्व जलेबी धागालेखकांना विनंती करतो की त्यांनी उजळ माथ्याने समाजात वावरल पाहिजे, जलेबी चा प्रचार प्रसार हा झालाच पाहीजे.

CDC सुपर संगणकाची माहिती थोड्याशा तपशिलात

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/09/2015 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
CDC-3600 संगणकाच्या तंत्रज्ञानासंबंधी माहिती अगदी तपशीलवार देता येईल, पण तपशीलवार माहिती क्लिष्ट असल्याने ती वाचण्यात ज्यांना स्वारस्य नसेल, त्यांना लक्षात घेऊन सर्वांनाच माहिती वाचायला रोचक होईल असं लिहिण्याचा मी प्रयत्न करीन. CDC-3600 ह्या मूलभूत सिस्टीममधे मध्यवर्ती प्रोसेसर, input/output चॅनल, मॅग्नॅटिक कोर स्टोअरेज, कन्सोल, टेप युनिट्स, कार्ड रिडर आणि प्रिंटर ह्या गोष्टी आहेत. संगणकाचं एकूण काम ह्या गोष्टीचा वापर करून होतं. मॅग्नेटिक कोर मेमरी आणि स्टोअरेज कॅबिनेट्स. कोर मेमरीमधे ३२ हजार वर्ड्स (३२,७६८ वर्ड्स) स्टोअर करता येतात.

(तुझे पाशवी बोलणे ते अवेळी)

लेखक चतुरंग यांनी रविवार, 13/09/2015 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
विशाल कुलकर्णींची सुरेख गजल 'तुझे मजवरी भाळणे ते अवेळी वाचली आणि लगोलग वेगळ्याच अवेळा आठवल्या. सादर आहे ... ;) तुझे पाशवी बोलणे ते अवेळी तुझे चक्रमी हासणे ते अवेळी जसे नासिकेचे अकाली बरसणे तुझे काहिही बरळणे ते अवेळी लपे 'चंद्र' केसांमध्ये तातडीने तुझे वीग शाकारणे ते अवेळी नको आप्त, वीकांत हा फक्त माझा तुझे तात का 'बैसणे' ते अवेळी? नको स्वर्ग, मी कुंभिपाकीच जातो तुझे रातचे घोरणे ते अवेळी मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे हालती पाळणे ते अवेळी!! 'लगावली' : अगागा अगागा अगागा अगागा वृत्त : भुजंगप्रपात -चतुरंग
काव्यरस

तू इथे असतीस तर....!

लेखक चांदणे संदीप यांनी रविवार, 13/09/2015 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
विविधभारतीच्या 'आपकी फर्माईश' मधली 'काही' गाणी इच्छा नसताना ऐकणे; त्यात मध्यरात्री हे कुत्र्यांचे भुंकणे; सर्व बाजूंनी गुणगुणना-या डासांची 'अ'मानवी ठरावी अशीच कत्तल करीत बसणे; मध्येच, बाहेरच्या रस्त्यावर, एखाद्या गाडीच्या चाकाला खड्ड्यात डोकावून पाहताना 'ब्रेक' नावाच्या सद्गृहस्थाने हासडलेली शिवी; अचानक लक्ष वेधून घेत पायाकडील भिंतीवरून सरसरत, जणू 'बोल्ट'चा १०० मीं चा विक्रम मोडीत आडोशाला गडप होणारी पाल; विनाकारण! फक्त त्रास द्यायच्या हेतूनेच, विचारलेलं नसतानाही, प्रत्येक सेकंदाला ओरडून वेळ सांगणारं घड्याळ; काय हिंमत होती या सा-यांची, मला त्रास द्यायची..... ....तू इथे असतीस तर....!

द स्केअरक्रो - भाग २६

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 13/09/2015 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २५ द स्केअरक्रो भाग २६ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) एफ.बी.आय.च्या इइआर टीममध्ये तिघांचा समावेश होता. त्यांनी वेस्टर्न डेटामध्ये आल्या आल्या तिथल्या कंट्रोल रूममध्ये जाऊन तीन मुख्य वर्कस्टेशन्सचा ताबा घेतला आणि कामाला सुरुवात केली. कार्व्हर त्यांच्या मागे येरझाऱ्या घालत होता आणि अधूनमधून त्यांच्या खांद्यांवरून पडद्यावर काय येतंय ते पाहात होता. त्यांना काय सापडेल याची त्याला काळजी वाटत नव्हती. त्याला जे त्यांना सापडायला हवं होतं, तेच त्यांना सापडणार होतं. त्याला खात्री होती तशी.

हाक! (शतशब्द्कथा)..भाग २

लेखक चिनार यांनी शनिवार, 12/09/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग शतशब्द्कथा स्पर्धेसाठी लिहिला होता. खालील दुवा बघावा.. http://www.misalpav.com/node/32313 "आई...........आई...बाळाला काय झालंय? तो का उठत नाहीये ? रागावलाय का तो ? मी तर भांडलो पण नाही त्याच्याशी आज..भांडणारही नाही कधी..त्याला उठायला सांग ना आई......सगळे खेळणे त्याचे.....त्याचीच पहिली बॅटिंग!...सांग ना त्याला.. बाबा..तुम्ही सांगा ना काय झालंय? आजी बघ ना आपल्या बाळाकडे...तुझा जास्त आवडता आहे ना तो..चालेल मला..मी नाही चिडणार बाळा..रोज किती वेळा हाका मारतो मला 'दादा दादा' म्हणून..आता मी हाका मारतोय तर का उठत नाहीये तू?