Skip to main content

हाक! (शतशब्द्कथा)..भाग २

लेखक चिनार
शनिवार, 12/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग शतशब्द्कथा स्पर्धेसाठी लिहिला होता. खालील दुवा बघावा.. http://www.misalpav.com/node/32313 "आई...........आई...बाळाला काय झालंय? तो का उठत नाहीये ? रागावलाय का तो ? मी तर भांडलो पण नाही त्याच्याशी आज..भांडणारही नाही कधी..त्याला उठायला सांग ना आई......सगळे खेळणे त्याचे.....त्याचीच पहिली बॅटिंग!...सांग ना त्याला.. बाबा..तुम्ही सांगा ना काय झालंय? आजी बघ ना आपल्या बाळाकडे...तुझा जास्त आवडता आहे ना तो..चालेल मला..मी नाही चिडणार बाळा..रोज किती वेळा हाका मारतो मला 'दादा दादा' म्हणून..आता मी हाका मारतोय तर का उठत नाहीये तू? बाबा..बाळाचा हात हालतोय बघा..आई बघ ना...काका डॉक्टरांना बोलवा बाळा उठतोय...... आई मी हाक मारल्यावर उठलाय बघ तो..मी परत हाक मारू का?” "हो रे सोन्या...बाळा शुद्धीवर आलाय ..मार तू हाक.. मला ऐकायचीये ती हाक" "चि...........ना............र !!!!!!!!!!!!!!! (सत्यकथा)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1806
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

शेवट चांगला केलात पण नेहमी सारखी मजा नाही आली. म्हणजे नेमक सांगायच झाल तर तुमच्या लिखाणाच एक वेगळेपण आहे ते जाणवल नाही. बाक़ी काही नाही

मस्तं! सुखांत असलेली ही सत्यकथा खूप आवडली.