खुलेआम अफ़गाण जलेबी धागा- आपला आवडता स्तंभ कोणता ?
जलेबी धागा हि अतिशय उपयुक्त संकल्पना आहे. जलेबी खाणे जलेबी पाडणे या अत्यंत मधुर गोष्टी आहेत. या गोड उपक्रमाला जाहिर व जोरदार पाठींबा म्हणुन मी हा धागा काढत आहे. तसा प्रत्येक धागा हि जलेबी च असते असे माझे मत आहे. तर यात लपवाछपवी कशाला उगाच ? म्हणुन मी आज सर्व जलेबी धागालेखकांना विनंती करतो की त्यांनी उजळ माथ्याने समाजात वावरल पाहिजे, जलेबी चा प्रचार प्रसार हा झालाच पाहीजे. जलेबी धागालेखकांनी विडंबक क्रुर कंसांना भिउन आपल्या जिलबीय संवेदनांना आवर घालु नये खरी अस्स्ल मुक्त उधळलेली जिलेबी कुठल्याही विंडंबक कंसाच्या कढाईच्या अर्धगोल कुंपणाकडुन रोखली जाउ शकत नाही.
तर आजच्या जलेबी धाग्याचा विषय आहे मराठी वर्तमान पत्र. साप्ताहिक, मासिके यातुन अनेक दर्जेदार स्तंभ आजतागायत चालविण्यात आलेले आहेत. व सध्याच्या काळात हि फ़ार सुंदर स्तंभ चालविव्यात येतात ( स्तंभ फ़ार वजनदार शब्द आहे त्यामानाने सदर शब्द फ़ार चिल्लर वाटतो शिवाय सदर लेखक म्हणजे सदर कारणास्तव अस काहीतरी शासकीय मराठी टाइप वाटत शिवाय जलेबी धाग्यात वजनदार शब्द नकोत याचा निषेध म्हणुन स्तंभ आणि स्तंभ सारखा जड शब्द वापरल्याने दंभ तृप्त होतो हा एक फ़ायदा ) त्यातील काही अत्यंत दर्जेदार स्तंभ आहेत. अनेक स्तंभलेखनाची नंतर एकत्रित करुन पुस्तके पण प्रकाशित झालेली आहेत. स्तंभा च स्वरुप सहसा एखादा विषय केंद्रीत स्तंभ किंवा मुक्त ललित लेख अस असत. अनेक दिग्ग्ज्जांनी स्तंभलेखन केलेल आहे. आमच्या काळीच्या चालीत ही व आजके जमानेमे च्या चालीत कस ही गाऊ शकता पण आपले आवडते स्तंभ कोणते का आवडले त्यात काय खास होत आदि मांडावे, त्यांची पुस्तक बनलेली असतील तर ती सांगा म्हणजे वाचता येईल. कारण गेलेला स्तंभ फ़क्त पुस्तक रुपात जिवीत असेल तरच भेटतो दुसरा मार्ग नसतो. स्तंभ नही आते उनकी किताबे आती है.
एक स्तंभ होता महेश एलकुंचवारांचा पश्चिमप्रभा नावाचा लोकमत मध्ये बहुधा अत्यंत सुंदर प्रगल्भ असा स्तंभ यात एलकुंचवारांनी त्यांच पाश्चात्य साहीत्याच केलेलं वाचन यावर आधारीत अस लिखाण होत. फ़ार च सुंदर यात त्यांच नाटकावरच लेखन येत असे (ते इथेच की अजुन कुठे नेमक आठवत नाही ) पण एका लेखातील एक अजुनही आठवतय त्यात ते चांगल्या नाटकासाठी काय लागत नेपथ्य संगीत नाट्यगुह अस एकेक खोडत नेती नेती करत ते येतात एक प्रेक्षक एक नट बास. फ़ार मार्मिक विवेचन होत पुढच सर्व.
एक विजय तेंडुलकरांचा लाइव्ह वाचला नाही पुस्तक रुपात वाचलेला स्तंभ आहे रामपहाट (नाव गंडतय काहीतरी) खुप सुंदर स्तंभ मराठीतला सर्वात्कुष्ठ कदाचित त्यातले लेख आठवतात एक वेटींग फ़ॊर गोदो नाटक समजावुन सांगितलेला अप्रतिम लेख एक बाबावरचा लेख त्या पुस्तकात श्री पु भागवतांचे एक खोचक कमेंट होती रोज लिहाव लागत असल्यामुळे मर्यादा येते का अस काहीतरी,
एक होता कवी ग्रेस यांचा जुना सामना च्या उत्सव पुरवणीत यायचा संडे ला कधीकधी एक एक संडे चुकवुन यायचा बहोत ही सुपर्ब नाव मृगजळाचे बांधकाम ( मेमरी स्तंभ या विषयात खुप धोका देते ) नंतर त्यातच नाव बदलुन त्यांनी वार्याने हलते रान या नावाने पण चालवला होता. मी बरेच कात्रण जमवले होते आता ते ही सापडत नाही,
एक सध्याच्या काळात दिव्य मराठी ची रविवार पुरवणी सर्वात श्रीमंत आहे एकेकाळी उत्सव होती एकेकाळी मंथन होती कधीतरी चतुरंग होती. ते मला वाटत दरवर्षी एकेकाची टीम जुळून येते. तर सध्यामध्ये एक अनोखा स्तंभ होता श्रीधर तिळवे चा तिसरी नवता लय जबराट वेगळाच काहीतरी होता.
एक राजु परुळेकरांचा क्लोज शॉट सुंदर स्तंभ होता त्यात परवीन बाबी च्या मृत्युवरचा लेख ,ओशो वरचा अनंत सामंतवर चा सुंदर लेख होते त्यांच्या अलकेमेस्ट्री पेक्षा हा स्तंभ ग्रेट होता.
त्यांच्या साइट वर सर्व मोकळ उपलब्ध करुन दिलेल आहे लुटा लेकहो लुटा.
एक दिव्य मराठी त अत्यंत युनिक असा स्तंभ होता रॉक म्यु्झिक वर लेकक नेहमीचे यशस्वी मधील नव्हता पण काय अफ़ाट सुंदर लेखन रॉक म्युझिक व त्यातील शिलेदारांवर आधारीत
फ़ार च सुंदर
एक काही काळापुर्वी संपलेला मैत्री पर्व हा पण फ़ार वेगळ अनुभवविश्व मांडणारा स्तंभ अस त्या बर्फ़ाळ प्रदेशातल अनोख लाइफ़ ज्याने जगल त्याने मांडलेल म्हणुन अधिक जीवंत जोशी का काय नाव
शशिकांत सावंत चा पुस्तकांवरचा अगोदरचा स्तंभ खुप सुंदर त्यामानाने सध्याचा एरोटीका विषयावरील स्तंभ जमुन नाही आला
अजुन काय तुटक तुटक आठवणी द्वारकानाथ संझगिरीचा क्रिकेट वरचा सामनातला, कणेकरांचे सर्वच ( मनातला अंधार थिएटरच्या अंधारात मिळवुन ) संजय मोने एक जीनीयस माणुस फ़ार सुंदर लिहीतो पण त्याच पुस्तक छान आहे.
चित्रलेखा मधला सागर राजहंस चा अत्यंत मनापासुन वाचावस वाटणारा राजकारण हा तसा भंगार विषय पण सागर राजहंस चा लेख वाचावासा वाटतो दोन पानांत इतकी मार्मिक व अभ्यासु संदर्भ संपन्न टिप्प्णी असते की बस
चित्रलेखा मधील च ती पुर्वा नगर कर एकदम क्लास क्लास क्लास
आपले तंबी दुराइ दोन फ़ुल एक हाफ़ वाले त्यांनी तर दर्जा ची विनोदाच्या दर्जाचे अंतिम पातळी च गाठलीय जणु
दवणे चं एक यायच थेंबातल आभाळ ते मी त्यातील सुवीचारांच्या जिलेब्या खाण्यासाटी वाचत असे त्याने रुचिपालट चांगला होत असे दवणे जिलेबीवाल्यांचे आयडॉल आहेत. दवणे सतत वाचला की ढसाळ चकण्यासारखा घ्यावा ढसाळ जास्त वाचला तर दवणे तोंडी लावावा संतुलन आत्म संतुलन तांबेइश छान साध्य होते.
एक यु म पठाण चा चिमुकला स्तंभ होता मराठीत आलेले पर्शियन उर्दु शब्द लय भारी होता आपले अनेक आवडते घरगुती मराठी शब्द मुळ एकदम विदेशी लय मजा यायची लोकमत मध्ये होता. तो स्तंभ.
तर असो जिलेबी अशीच पसरट अस्त्यव्यस्त असते जितकी पसरट तितकी छान लागते तुकडे पण गोडच लागतात म्हणुन माझी जिलेबी गोड मानुन घ्यायची गरज नाही
आपले आवडते स्तंभ याविषयी सांगा शेअर करा
वाचन
15125
प्रतिक्रिया
0