Skip to main content

रायडिंग नॉस्टॅल्जिया

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 26/10/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
रॉयल एनफिल्डच्या धाग्यावर मी एक कमेंट केली होती. त्यातच नवीन धागा असावा असे मला (उगाचच) वाटून गेलं. म्हणून हा प्रपंच. तुमच्या आठवणीच्या जुन्या बाईक्स/स्कूटर्स असतीलच ना. त्यातलं काय आवडलं, काय आता हवं आहे त्यासाठी हा नवीन धागा.
जावा, येझ्दी या बाईक्सचा एक काळ होता. नंतर राजदूतने त्यांचं मार्केट खाल्लं. पण अजूनही त्या गाड्या पाहिल्या की कुठं तरी काळजाचा ठोका चुकतो राव. आजच्या जेन-वायच्या पोट्ट्यांना खरेच या गाड्या किती अपील होतील कुणास ठाऊक. टाईमलेस क्लासिक डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ साधून महिंद्राला काही जादू करता येईल काय?

वेटिंग फ़ॉर गोडोट

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 26/10/2016 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
वेटिंग फ़ॉर गोडोट म्हणजे काय? कधीच न येणा-या आपल्या माणसाची वाट पाहतं राहणे? व्यर्थ व निष्फळ प्रतीक्षा करत राहणे?? त्या कातर सायंकाळी तू अचानक म्हणालीस.. कंटाळले मी..कायमची जात आहे अमेरिकेस..सॅन फ्रान्सिस्को मध्ये.. पायाखालची जमीन सरकली..एक हताश पणाची जाणीव स्पाइन मधुन सरसरत गेली.... माझं काय... आपल्या स्वप्नांचे काय??? ? काय सांगू?? वाट पहा ..कदाचित परत येईन ही... वेटिंग फ़ॉर गोडोट म्हणजे काय? कधीच न येणा-या आपल्या माणसाची वाट पाहतं राहणे? व्यर्थ व निष्फळ प्रतीक्षा करत राहणे

दिवाळी

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 26/10/2016 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी गिरणीत वेगवेगळ्या भाजण्यांचा खमंग दरवळतोय, अनेक छोट्या छोट्या डब्यात छोट्या छोट्या प्रमाणात गृहिणींची लगबग आहे, त्यापेक्षा जास्त गडबड गिरणीवाल्या काकांची आहे, तुफान गर्दी माजली आहे. जिन्नस एकसारखे पण प्रत्येकीचे प्रमाण वेगळं ठरलेलं आहे. धडधड डबे रिकामे होतायत.. सटासट भूरभुर करत पिठं बाहेर पडतायत... "दोन किलो आहे, आईने सांगितलंय भाजणीवरच टाका" कशावर काय जातंय बघतच नाही काका, एकावर एक, दुसऱ्यावर तिसरे, इकडून टाकलं कि तिकडून पसार, काकांची गिरणी लै फास्ट आहे, पाव-अर्धाकिलो कुठे तिला जास्त आहे? आपला डबा गिरणीत टाकायला काका उचलतायत असं पाहून एक ताई म्हणते, 'काका, लाडवाचं आहे बरंका, जरा

शैशव...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 26/10/2016 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
शैशव... जे सुख लाभले शैशवास पुन्हा ना लाभे मानवास अन्न वस्त्र अन निवारा ह्याचाच लागे ध्यास कोठे हरवले ते निरागस बालपण अन विश्वास जसेजसे वाढू लागलो वाढू लागला अविश्वास जन्मताच काय तो घेतला एक मोकळा श्वास आता मात्र घुसमटतोय प्रत्येक श्वास प्रत्येक श्वास राजेंद्र देवी

आरक्षण!

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 26/10/2016 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्षण ह्या विषयावर काहीही बोलायचं किंवा लिहायचं म्हणजे हल्ली जरा अवघडच झालं आहे. यामधून आरक्षण विरोधी किंवा आरक्षण समर्थक अशा दोन्हीकडच्या लोकांच्या शिव्या खायला मिळण्याचाच संभव अधिक कारण मी आरक्षण समर्थक नाही तसाच सरसकट आरक्षण विरोधकही नाही पण मी यावर बरंच वाचलं आहे.(चर्चा करण्या पेक्षा का कोण जाणे मला हा मार्ग जास्त भरवशाचा वाटतो) आणि आरक्षणाची गरज मला पटलीही आहे.सर्वसाधारणपणे आरक्षण समर्थनाची भूमिका घेणे तुम्हाला पुरोगामी म्हणून सादर करते आणि बऱ्याच लोकांना स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणे आवडते.

चीज शंकरपाळे

लेखक इशा१२३ यांनी मंगळवार, 25/10/2016 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
शंकरपाळे साहित्य : मैदा :दोन वाटी चीज किसलेले :एक वाटी जिरे जाडसर पुड :एक चमचा मीठ : चविनुसार तेल :दोन चमचे खायचा सोडा : चिमुटभर Sahity कृती : प्रथम मैदा व सोडा चाळून घेणे.त्यात किसलेले चीज,जिरे पुड,मीठ घालून एकत्र करावे.या मिश्रणात तेल गरम करुन घालावे.आता हे तेल मैद्यास चांगले चोळून घ्यावे. या मिश्रणात बेताने पाणी घालत घट्ट मळू

खेल कबड्डी

लेखक रुस्तुम यांनी मंगळवार, 25/10/2016 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच भारतात झालेल्या आणि भारताने विजेतेपद राखलेल्या कब्बडी विश्वचषकानिमित्त मनात आलेले विचार खरडतोय. मिपा वर हा माझा लेखाचा पहिलाच पर्यटन.चू.भू. द्यावी घ्यावी :) "जिता दिल इंडिया का , अब जीत गये दुनिया, प्रेम के साथ देखो, जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!!" टीम इंडियाचा कबड्डी संघ विश्वचषक उंचावत असताना ह्या जिंगलचे पार्श्वसंगीत वाजत होते.त्या आधी अंतिम सामना जिंकल्यावर हिंदी समालोचक अपना खेल, अपना देश, अपना कप असे काहीसे उत्साहात ओरडत होता. मनात विचार आले की किती खऱ्या आहेत ह्या गोष्टी ..

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/10/2016 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire पिसूक.... (पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्‍या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.) पहाटे पडलेल्या चित्रविचित्र स्वप्नांमुळे ग्रेगॉर दचकला व गाढ झोपेतून उठला. त्याने हात ताणायचा प्रयत्न केला आणि तो उडालाच. त्याचे ह्रदय धडधडू लागले. त्याचे चक्क एका मोठ्या किड्यात रुपांतर झाले होते.

का कळत नाही तुला

लेखक सोहम कामत यांनी मंगळवार, 25/10/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
का कळत नाही तुला.. माझ्या प्रेमाचे तराणे.. तुझ्यासाठी केलेले ते.. वेडपट निरागस बहाणे.. तु जवळ नसताना ती.. होणारी असह्य तडफड.. अन् तुझ्या सुखासाठी.. केलेली विचित्र धडपड.. का कळत नाही तुला.. तुच माझी राणी.. तुच माझी कविता.. माझ्या ओठांवरली गाणी.. माझा प्रत्येक श्वास.. माझा एकला ध्यास.. माझ्या वाटेवरली तु.. प्रेमाची ती आस...