✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपाकरांच्या वाचनखुणा.

ट
टर्मीनेटर यांनी
Wed, 03/31/2021 - 20:10  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे. मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे. आपल्यापैकी अनेकांना आवडलेल्या लेखनाची वाचनखूण साठवून ठेवण्याची सवय आहे तेव्हा आपली व्यक्तिगत आवड म्हणून जपून ठेवलेला हा ठेवा प्रतिसादातून लिंक रूपाने अन्य वाचकांबरोबर वाटून त्यांनाही वाचनानंदाची अनुभूती द्यावी अशी सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती सुरुवात म्हणून मी सगळ्या नाही पण माझ्या तींन वाचनखुणा खाली देत आहे. १) इब्न बतूत - भाग १ जयंत कुलकर्णी साहेबांनीं लिहिलेली १२ भागांची लेखमालिका. २) मोसाद - भाग १ कै.बोका-ए-आझम यांनी लिहिलेली १४ भागांची लेखमालिका. ३) मक्केतील उठाव १ हुप्प्या यांनी लिहिलेली ७ भागांची लेखमालिका. वरील तीनही अभ्यासपूर्ण लेख मालिका मला खूप आवडतात. अजूनही बऱ्याच वाचनखुणा आहेत त्या नंतर शेअर करतो! आता तुमची पाळी! चला तर मग आता पटापट तुमच्या वाचनणखुणा शेअर करा 🙂 आपल्या सर्वांनी प्रतिसादातून शेअर केलेल्या वाचनखुणा सूचिबद्ध करून स्वतंत्र धागा रूपाने ('मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांक) ह्या वर्षीच्या मिपा वर्धापनदिनी म्हंणजेच गणेश चतुर्थीला श्री गणेश लेखमालेच्या बरोबर प्रकाशित करावा अशी विंनंती मिपा प्रशासनास करण्याचा मानस आहे, जेणेकरून ह्या वर्धापनदिनी आपल्या सर्वांना श्री गणेश लेखमालेत नवीन लेखन आणि 'मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांकात आत्तापर्यंतचे वाचकांच्या पसंतीस ऊतरलेले जुने पण दर्जेदार लेखन वाचण्याची दुहेरी मेजवानी मिळेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
58819 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

११.

गणेशा
Tue, 04/06/2021 - 14:07 नवीन
http://misalpav.com/node/46982 बोहेमियम रॅप्सडी - स्टार्क.. पुन्हा पुन्हा वाचावी अशीच.. आज घेतो वाचायला पुन्हा मी..
  • Log in or register to post comments

बोहेमियम रॅप्सडी

ॲबसेंट माइंडेड…
Tue, 04/06/2021 - 15:15 नवीन
बोहेमियम रॅप्सडी अप्रतिम. हा एकच शब्द पुरेसा आहे या कथेची स्तुती करण्यासाठी. खुप म्हणजे खुपच आवडली. धन्यवाद गणेशा साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

बोहेमियम रॅप्सडी

Bhakti
Tue, 04/06/2021 - 15:32 नवीन
बोहेमियम रॅप्सडी अफाट!! लेखनशैली खूपच आवडली.सुंदर कथा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

धन्यवाद कसले.. आणि साहेब काय.

गणेशा
Tue, 04/06/2021 - 16:02 नवीन
धन्यवाद कसले.. आणि साहेब काय.. :-) आपला साधा गणेशा बोला राव..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

बोहेमियम रॅप्सडी

मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 04/10/2021 - 15:17 नवीन
बोहेमियम रॅप्सडी अप्रतिम., खुप सुंदर.,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

१२

गणेशा
Tue, 04/06/2021 - 17:18 नवीन
बारा हा आकडाच वेगळा आहे..:-) आता पुन्हा जुण्या वाचनाखुणा बघायला गेलो आणि माझ्याच कविता मालेची वाचनखुण सापडली.. स्वतःच स्वतःची वाचन खूण देणे बरोबर नसले तरी माझ्याच मला देतो..:-) असुद्या... http://misalpav.com/node/17166 आई .. मिटलेला श्वास.. (संपुर्ण) - गणेशा. उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई - १२मती कर :-)
  • Log in or register to post comments

आई .. मिटलेला श्वास.. (संपुर्ण)

ॲबसेंट माइंडेड…
Tue, 04/06/2021 - 20:35 नवीन
आई .. मिटलेला श्वास.. (संपुर्ण) वाह. सुरेख आहे कविता संग्रह. पार्श्वभुमी सांगीतल्याने जास्त भिडल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

१३

गणेशा
Tue, 04/06/2021 - 19:47 नवीन
http://misalpav.com/node/20895 मुसोलिनीचा उद्य अस्त - जयंत कुलकर्णी (१० भाग )
  • Log in or register to post comments

वाचनखूण सुविधेचा वापर कसा आणि

अनिंद्य
Tue, 04/06/2021 - 21:46 नवीन
वाचनखूण सुविधेचा वापर कसा आणि काय हेच माहित नव्हते :-) अजून 'हॉल ऑफ फेम' कसा करणार आहात ते नाही समजले पण हा धागा आला त्यामुळे मिपावरचे जुने लोकप्रिय लेखन वाचण्याचा चान्स घेणार आता.
  • Log in or register to post comments

१४.

गणेशा
Wed, 04/07/2021 - 08:36 नवीन
http://misalpav.com/node/16319 एअरपोर्ट - गवि मला खुप आवडलेली हि कथा..
  • Log in or register to post comments

एअरपोर्ट

ॲबसेंट माइंडेड…
Wed, 04/07/2021 - 11:17 नवीन
एअरपोर्ट मस्तच आहे कथा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

माझ्याकडे बऱ्याचस्या छान छान

गणेशा
Wed, 04/07/2021 - 08:37 नवीन
माझ्याकडे बऱ्याचस्या छान छान ट्रेकिंग च्या वाचनाखुणा जास्त आहेत, पण फोटो आता दिसत नाहीयेत त्यामुळे त्या देत नाहीये... जास्त वाचनखुणा ट्रेक च्या होत्या
  • Log in or register to post comments

ट्रेकिंग

ॲबसेंट माइंडेड…
Wed, 04/07/2021 - 11:20 नवीन
ट्रेकिंग माझ्या आवडीचा विषय नाही. तुम्ही द्या वाचनखुणा इतरांना कामी येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

आणि मी ट्रेकिंग आणि सायकल

गणेशा
Fri, 04/09/2021 - 00:12 नवीन
आणि मी ट्रेकिंग आणि सायकल वाला..:-) एक कथेची वाचन खूण देतो खाली wt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

१५

गणेशा
Wed, 04/07/2021 - 08:44 नवीन
http://misalpav.com/node/15366 माझी भटकंती - पुर्वोत्तर भारत.. - चिगो
  • Log in or register to post comments

माझी भटकंती - पुर्वोत्तर भारत..

ॲबसेंट माइंडेड…
Wed, 04/07/2021 - 12:35 नवीन
माझी भटकंती - पुर्वोत्तर भारत.. ईशान्य भारताचा धावता आढावा छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

| ॲबसेंट माइंडेड ...

बिपीन सुरेश सांगळे
गुरुवार, 04/08/2021 - 23:54 नवीन
| ॲबसेंट माइंडेड ... आरसा कथेतला कल्पनाविलास आवडला. आणि तिथे काय मिळत नाही ? एकदा तर रेल्वेचं अख्खं इंजिन आलेलं विकायला. या वाक्याला हसु आले. या प्रतिक्रियेसाठी आभार . पण गंमतीचा भाग असा कि ते रेल्वे एंजिन तिथे खरोखर विकायला आले होते . मी ते पेपर मध्ये वाचले आणि प्रत्यक्ष जाऊन पाहिलेदेखील
  • Log in or register to post comments

१६.

गणेशा
Fri, 04/09/2021 - 00:19 नवीन
http://misalpav.com/node/15497 मी आणि नवा पाऊस... - नीधप
  • Log in or register to post comments

मी आणि नवा पाऊस...

ॲबसेंट माइंडेड…
Fri, 04/09/2021 - 10:10 नवीन
मी आणि नवा पाऊस... नीधप यांच्या कथा चाकोरी बाहेरच्या वाटल्या. त्यांची वाचलेली ही तीसरी कथा सुद्धा आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

भारी धागा आहे हा. कधीही उघडा

चौथा कोनाडा
Fri, 04/09/2021 - 13:29 नवीन
भारी धागा आहे हा. कधीही उघडा आणि शिफारस असलेलं, वाचलं नसेल तर वाचायचं, फार पुर्वी वाचलं असेल तर पुन्हा वाचायचं ! अभ्याचं आवडलेलं काही लेखनः जी नाईन सैराट आन सैराटच पोश्टरबॉईज पोश्टरबॉइज -२ लग्नाला यायचं हं!
  • Log in or register to post comments

जी नाईन

ॲबसेंट माइंडेड…
Fri, 04/09/2021 - 15:42 नवीन
जी नाईन वाह, मस्तच लिहीलय. अजुनही जी नाईन पंथाचे सच्चे पाईक आजुबाजुला दिसतात. कित्येकांनी आपल्या मुलाचे नाव मिथुन ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

राईट ! हा गरिबांचा अमिताभ

चौथा कोनाडा
Fri, 04/09/2021 - 17:02 नवीन
राईट ! हा गरिबांचा अमिताभ तळागाळात पोहोचला होता. मी देखील मिथुनचे वेड प्रचंड प्रमाणात पाहिलेय. सध्या तर बंगालच्या निवडणुकीत मोठा स्टार प्रचारक आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

पोश्टरबॉइज

ॲबसेंट माइंडेड…
Fri, 04/09/2021 - 17:35 नवीन
पोश्टरबॉइज खुसखुशीत लेखन मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

कालच त्याला भेटून सगळ्या

गणेशा
Fri, 04/09/2021 - 21:37 नवीन
कालच त्याला भेटून सगळ्या लिंक्स घेतल्या होत्या.. त्याचा काळ आणि मी येथे नसलेलो काळ एक होता..२०११ पासून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

लग्नाला यायचं हं!

ॲबसेंट माइंडेड…
Sat, 04/10/2021 - 12:57 नवीन
लग्नाला यायचं हं! छान माहीती मिळाली वाचुन. बरीच किचकट प्रक्रीया आहे म्हणायची. फोटो तेवढे नाही दिसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

अतिशय सुंदर धागा.,

मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 04/10/2021 - 15:10 नवीन
अतिशय सुंदर धागा., बऱ्याच कथा वाचल्या., आवडल्या., अश्याच सुंदर सुंदर कथा गोष्टींच्या लिंक्स देत चला.. छान वाटतेय वाचून.. वाचतेय.......
  • Log in or register to post comments

शब्द झाले मोती -२

मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 04/10/2021 - 15:15 नवीन
शब्द झाले मोती -२ - गणेशा., ( selective म्हणाल तर - कॉलेज विश्व(१-४)., कंपनी आणि मित्र(१-४), शाळा आणि पावसाबद्दलचे सगळे लिखान हे जास्त वाचनीय., आर्त आहे आणि ते खरे जीवन असल्याने ते जास्तच आवडले)
  • Log in or register to post comments

लिंक्स राहिली द्यायची.

मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 04/10/2021 - 15:26 नवीन
लिंक्स राहिली द्यायची. शब्द झाले मोती -२ http://misalpav.com/node/46749 आणि आणखीन गणेशाचाच Maroon colour https://misalpav.com/node/47318
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगरा

Maroon colour +१

चौथा कोनाडा
Sat, 04/10/2021 - 17:11 नवीन
Maroon colour +१ अतिशय तरल आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगरा

१७.

गणेशा
Sat, 04/10/2021 - 17:56 नवीन
http://misalpav.com/node/15673 बकुळीची फुले - प्राजू(२०१०) ---- @ मोगरा, माझे धागे आवर्जून दिल्या बद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments

बकुळीची फुले...चटका लावणारी!

Bhakti
Sat, 04/10/2021 - 18:42 नवीन
बकुळीची फुले...चटका लावणारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

पहिली वा.खू.

Bhakti
Sat, 04/10/2021 - 18:44 नवीन
शीर्षक आणि शेवट कायम पुरणार आहे. http://misalpav.com/node/48108 नीलकंठ देशमुख.
  • Log in or register to post comments

१८.

गणेशा
Sun, 04/11/2021 - 10:14 नवीन
http://misalpav.com/node/16823 जीवधन नाणेघाट - वल्ली
  • Log in or register to post comments

मस्त.

Bhakti
Sun, 04/11/2021 - 13:34 नवीन
मस्त. मिपावर आल्यापासून मला समजलं की असंही भारी काही असत.म्हातारी व्हायच्या आधी जाईन एकदा.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लक्षात राहिलेली कथामाला ,

सिरुसेरि
Sun, 04/11/2021 - 13:39 नवीन
लक्षात राहिलेली कथामाला , लेखन धागे - http://www.misalpav.com/node/32509 http://www.misalpav.com/node/34681
  • Log in or register to post comments

विजूभाऊ यांची शाळकरी

चौथा कोनाडा
Sun, 04/11/2021 - 14:57 नवीन
विजूभाऊ यांची शाळकरी विद्यार्थ्याचे भावजीवन आणि शालेय दिवसांविषयीची ५७ भागांची सर्वांगसुंदर मालिका:

दोसतार...

मला काही भाग बेहद्द आवडले. बर्‍याच भागांवर प्रतिसाद दिले आहेत ! अर्थात ही मालिका "मिपा पुस्तकं"च्या अंतर्गत "मिपाकरांचे दीर्घलेखन" यात समाविष्ट केली गेली आहे ! (पण अनुक्रमणिकेच्या ड्रॉपडाऊन यादीत फक्त १६ भागच दिसतात, त्यामुळे पुढचे भाग शोधयला जड जाते. समं या वर काही करता येतंय का ते बघा)
  • Log in or register to post comments

मस्त धागा ... वाचनीय खजिना

अमर विश्वास
Sun, 04/11/2021 - 15:04 नवीन
मस्त धागा ... वाचनीय खजिना मिळाला आमची मिपा वरची पहिली वाचनखूण होती "रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा" सोन्याबापूंचा हा धागा होता. आवडत्या विषयावर उत्तम चर्चा https://misalpav.com/node/29011 आणि त्यांनत एक महत्वाची लेखमाला डॉक्टर सुबोध खरे सरांची "काटा वजनाचा " https://misalpav.com/node/34300
  • Log in or register to post comments

१९.

गणेशा
Mon, 04/19/2021 - 08:27 नवीन
http://misalpav.com/node/24071 आमचं गोयं..- पैसा,.प्रीत मोहर..बिपीन कार्यक्रते
  • Log in or register to post comments

वाह! मस्त गोवा ललितलेख!

Bhakti
Mon, 04/19/2021 - 20:57 नवीन
प्रस्तावना १ /२ वाचली.लिखाणातील सुंदर प्रयोग! निवांत वाचत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

एका गारुड्याची गोष्ट

अनन्त अवधुत
Mon, 04/19/2021 - 23:14 नवीन
जेडी यांची ही सापांबद्दलची अप्रतीम लेखमाला: http://www.misalpav.com/node/24830
  • Log in or register to post comments

+१ भन्नाट आहे ही मलिका !

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/22/2021 - 22:13 नवीन
+१ भन्नाट आहे ही मलिका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

https://www.misalpav.com/node

स्वराजित
Fri, 04/23/2021 - 14:04 नवीन
https://www.misalpav.com/node/5323 https://www.misalpav.com/node/5127 https://www.misalpav.com/node/3957 छान कथा ब्रिटिश
  • Log in or register to post comments

https://www.misalpav.com/node

स्वराजित
Fri, 04/23/2021 - 14:24 नवीन
https://www.misalpav.com/node/31949 कासरा https://www.misalpav.com/node/31115 अकादमी https://www.misalpav.com/node/34637 पॉर्नची गरज आहे का? https://www.misalpav.com/node/21124 कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 2) https://www.misalpav.com/node/15190 पाशवी प्रतिशोधाची कहाणी https://www.misalpav.com/node/1958 कविता एक लांबचा प्रवास https://www.misalpav.com/node/23629 सियाचीन ग्लेशीयर.....शेवटचा भाग ......आयुष्याची दोरी https://www.misalpav.com/node/48449 गावाच्या गोष्टी : मना सज्जना भक्ती पंथेची जावे. https://www.misalpav.com/node/18342 देरसू उजाला
  • Log in or register to post comments

गेले सुमारे तीन महिने

टर्मीनेटर
Tue, 07/06/2021 - 13:56 नवीन
गेले सुमारे तीन महिने वाचनमात्र राहून मिपाकरांनी प्रतिसादातून शेअर केलेल्या त्यांच्या सर्व वाचनखुणा वाचून काढल्या. काय जबरदस्त लेखन केलंय मिपाकरांनी, फारच छान 👍 प्रतिसादातून हा साहित्य खजिना वाचकांसाठी खुला करणाऱ्या सर्वांचे आणि गणेशा भाऊंचे विशेष आभार 🙏
  • Log in or register to post comments

इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी

टर्मीनेटर
Wed, 07/07/2021 - 13:16 नवीन
इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी बद्दल इंग्रजी मध्ये भरपूर लेखन वाचायला मिळते पण दुर्दैवाने त्याच्याबद्दल सविस्तर, तपशीलवार माहिती मराठीत वाचायला मिळत नाही, ती आपल्या मिपावर उपलब्ध आहे. इतिहासाची आवड असलेल्या प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी 'मुसोलिनीचा उदयास्त' ह्या जयंत कुलकर्णी साहेबांच्या मालिकेची माझी वाचनखुण इथे शेअर करत आहे. आता बरेचसे फोटो दिसत नाहीयेत पण माहिती फार छान आहे! https://www.misalpav.com/node/20263
  • Log in or register to post comments

मिपावरती हॉल ऑफ फेम अथवा

गॉडजिला
Wed, 07/07/2021 - 14:03 नवीन
बेस्ट ऑफ मिपा हा सेक्शन ठळक लिंक द्वारे ठेवायला हवा जेणे करून नव्या सदस्यांना मिपाच्या वास्तव रूपाची अतिशय चटकन ओळख होऊ शकेल
  • Log in or register to post comments

१०००% सहमत!

टर्मीनेटर
Wed, 07/07/2021 - 15:02 नवीन
१०००% सहमत! मी अनेक मित्रमंडळीना मिपा बद्दल सांगत असतो, परंतु त्यातल्या कित्येकांनी सदस्यत्व घेणे तर दूरच, वाचनमात्र राहणेही पसंत तर केले नाही. उलट मलाच "त्या निवृत्त लोकांनी चर्चा करण्यासाठी असलेल्या फोरमवर तू काय करतोस?" असा प्रश्न विचारला होता 😔 'फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन' म्हणतात त्याप्रमाणे नव्याने इथे येणाऱ्यांचा गैरसमज होऊन त्यांनी मिपाकडे पाठ फिरवू नये ह्यासाठी आपण म्हणता त्याप्रमाणे नव्या सदस्यांना मिपाच्या वास्तव रूपाची ओळख करुन देणे खरोखर आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

+ ११

हेमंतकुमार
Wed, 07/07/2021 - 15:46 नवीन
मिपाच्या वास्तव रूपाची ओळख करुन देणे खरोखर आवश्यक आहे. >>+ ११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

सहमत

गुल्लू दादा
Wed, 07/07/2021 - 17:30 नवीन
अगदी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

विमान अपहरण यावर पन एक धागा

diggi12
Fri, 09/24/2021 - 01:43 नवीन
विमान अपहरण यावर पन एक धागा होता ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा